रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.
Read More
सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली कॅनरा बँक क्लस्टर आधारित कर्ज देण्यावर विचार करत आहे. या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना(एमएसएमई) मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्लस्टर आधारित कर्ज देण्यावर भारत सरकार भर देत असून वित्त सेवा विभाग(डीएफएस) अर्थ मंत्रालय, सिडबी आणि आरबीआयने एमएसएमईमध्ये २५ टक्के वाढ देण्यासाठी क्लस्टर आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या दशकभरात भारतीय बँकिंग क्षेत्रात उच्च कामगिरी दिसून आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकने आपल्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, मागील आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक समावेशन निर्देशांक(FI-Index) मार्च २०२३ मधील ६०.१ च्या तुलनेत ६४.२ इतकी बँकिंग उप-निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आल्याचे आरबीआयने जाहीर केले आहे.
अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली फायनांशियल सर्विसेसचे सेक्रेटरी विवेक जोशी यांनी बँकिंग व वित्तीय सेवेच्या मान्यवर अधिकारी वर्ग व तज्ज्ञांची भेट मंगळवारी घेतली होती. यावेळी बँकिंग क्षेत्रातील चालू परिस्थितीचा आढावा यामध्ये घेण्यात आला.भविष्यात काय उपाययोजना करता येतील व त्यातील सद्यस्थितीतील त्रुटी यावर विवेक जोशी यांनी विस्तृत चर्चा केली आहे.
'युनियन बँक' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. युनियन बँकेकडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार युनियन बँकेतील एकूण ६०६ विविध रिक्त पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून विविध पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ८वी उत्तीर्णांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
नागरी सहकारी बँका अस्तित्वाचा लढा लढत असून, त्यांना मदतीचा हात देणे ही काळाची गरज. ही बाब लक्षात घेता, राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणींचा अभ्यास करून, त्यांना सरकारकडून कोणती मदत करता येईल, याबाबत अहवाल सादर करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचे म्हणून स्वागत करायला हवे.
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी करण्यात येत आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. स्टेट बँक अंतर्गत 'ज्यूनियर असिस्टंट' या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून ८,२८३ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
'इंडिया एक्झिम बँक'अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एक्झिम बँकद्वारे विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अधिकृत वेबसाईट लिंक खुली करण्यात येणार आहे.
"महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड" अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने प्रशिक्षणार्थी लिपिक आणि इतर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन संस्थांचे विलीनीकरण होत आहे. ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था येथून पुढे वायदे बाजारामध्ये कार्यान्वित असणार नाही. ही बहुचर्चित अशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात तिची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे अर्थजगतात होणार्या घडामोडींवर टाकलेली नजर...
रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात