आज जगभरात गुंतवणूक आणि आर्थिक सुबत्तेसाठी विविध मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. अशावेळी हे प्रकल्प अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरकही असतील, याकडेही विशेष लक्ष दिले जाते. असाच एक महत्त्वपूर्ण रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प ऑस्ट्रिया आणि इटली दरम्यान उभारण्यात येत आहे. ऑस्ट्रिया आणि इटली दरम्यान ६४ किमी लांबीचा भूमिगत रेल्वेमार्ग उभारला जात आहे. हा केवळ एक रेल्वे प्रकल्प नाही, तर २०३० साली पूर्ण झाल्यावरही जगातील सर्वाधिक लांबीचा भूमिगत रेल्वे लिंक प्रकल्प ठरणार आहे.
Read More
दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ ऑस्ट्रियाला पोहोचले. तेथे ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी ट्विट केले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे व्हिएन्नामध्ये स्वागत आहे. ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करणे ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे मित्र आणि भागीदार आहेत. मी तुमच्या भेटीसाठी उत्सुक आहे."
गेल्या ४० वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासह अनेक नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी यावेळी चर्चा होतील. या पार्श्वभूमीवर भारत-रशियादरम्यानचा नवा व्यापारी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. त्याविषयी...
वस्त्रोद्योग क्षेत्रात दर्जात्मक उत्पादन व उत्पादकतेच्या जोडीलाच नावीन्य-कल्पकता, संशोधन स्थायी स्वरुपातील विकास व त्याशिवाय उद्योजकतेवर भर दिला जातो. याच धोरणांना अनुसरून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने विशेष बाब म्हणून, वस्त्रोद्योगाशी संबंधित स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. या नव्या उपक्रमाविषयी...
टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क हे आता नवीन व्यवसायात नशीब आजमावत आहेत. काही दिवसापुर्वी मस्क यांनी परफ्युम इंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बाजारात बिअर आणली आहे. ही माहिती टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन टेस्ला गीगाबिअरची माहिती देण्यात आली आहे. या बिअरची किंमत भारतीय चलनात ८००० रूपये आहे. या बिअरमध्ये अल्कोहलचे प्रमाण कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अल्पावधीत पदकविजेत्या सायनाला हरवून प्रसिद्धीझोतात आलेल्या नागपूरच्या मालविका बनसोडच्या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...
कोरोना महामारीमध्ये आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणारे देशही कोरोनाच्या तडाख्याने पुरते कोलमडले होते. केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रालाही त्याचा जोरदार फटका बसला. भारतालाही कोरोनाचा प्रकोप प्रारंभी सहन करावाच लागला. मात्र, कालांतराने कोरोना महामारीत आपली आर्थिक बाजू आणि देशभरातील परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळण्यात आपला देश मात्र यशस्वी ठरला.
गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळातही ‘कोविड’मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुसलमान रुग्णांचे दफन न करता, दहन करावे, असा नियम श्रीलंकेत लागू करण्यात आला. त्या निर्णयाला अमेरिकेसह इस्लामिक देशातून विरोेध झाल्यानंतर श्रीलंकेने तो निर्णय रद्द ठरवला खरा; पण बुरखाबंदीच्या निर्णयाबाबत तसे होण्याची शक्यता ही धुसरच!
येत्या काही दिवसांत ऑस्ट्रियादेखील धर्मांध जिहाद्यांविरोधात कडक कारवाई करायला लागला, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे; अन्यथा धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादाच्या धुंदीत आपण आपलाच देश आणि जनतेच्या विध्वंसाला कारण ठरल्याचे ऑस्ट्रियातल्या राज्यकर्त्यांना पाहावे लागेल व तोपर्यंत वेळही टळून गेलेली असेल.
ऑस्ट्रियाचे चान्सलर सबॅस्टन कुर्ज यांच्या सरकारने देशातील ७ मस्जिद बंद करून ४ इमामांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला