मुंबईतील एका माजी मंत्र्याची आणि त्याच्या वडिलांची अवस्था सध्या ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे,’ अशीच झालेली दिसते. मुंबई पालिकेत एक लाख कोटींची लूट करून ती पचवल्याच्या आनंदात असताना, एका प्रकरणाने त्यांच्या आनंदावर विरजण घातली. मिठी नदी स्वच्छता घोटाळा! तब्बल १ हजार, २०० कोटींच्या या घोटाळ्यात या पिता-पुत्राचा उघड सहभाग आजवर कुठेच सापडत नव्हता. ना कोणत्या कागदावर सही, ना मर्जीतील ठेकेदारांना कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली शिफारसपत्रे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी पक्ष आपल्याला भ्रष्टाचाराच्या खोट्या
Read More
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता दिनो मोरियाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीशी त्याचे संबंध असल्याचे तपासात पुढे आले असून आता याप्रकरणी त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात गोड्या पाण्यात आढळणार्या डॉल्फिनच्या सर्वेक्षणाचा पहिला अहवाल नुकताच प्रकाशित केला (indus river dolphin). या अहवालाच्या माध्यमातून ‘इंडिस रिव्हर डॉल्फिन’ म्हणजेच ‘सिंधू नदी डॉल्फिन’च्या संख्येबाबत भीषण वास्तव समोर आले (indus river dolphin). देशात केवळ तीनच्या संख्येत डॉल्फिनची ही प्रजात शिल्लक राहिलेली आहे (indus river dolphin). त्यामुळे डॉल्फिनची ही प्रजात देशात शेवटची घटका मोजत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे (indus river dolphin). त्यानिमित्त या प्रजातीवर संवर्धना
गोड्या पाण्यात अधिवास करणाऱ्या डाॅल्फिनमधील इंडस रिव्हर डाॅल्फिन या प्रजातीमधील केवळ तीन डाॅल्फिन हे भारतामध्ये शिल्लक राहिले आहे (indus river dolphin). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि. ३ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या डाॅल्फिन गणना अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे (indus river dolphin). शिल्लक राहिलेल्या तीन इंडस रिव्हर डॉल्फिनचा पंजाबमधील बियास नदीत अधिवास आहे. (indus river dolphin)
महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना सर्वस्वी दुर्दैवीच. पण, त्यावरुन राजकीय डाव साधत, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अखिलेश यादवांनी केलेला प्रकार त्याहूनही अश्लाघ्य! पण, अखिलेश यांच्या पिताश्रींच्याच आदेशावरुन कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारातून शरयू नदी बलिदानाच्या रक्ताने लाल झाली होती. त्या रक्ताळलेल्या शरयूची आठवण तुम्हाला येते का हो अखिलेश?
पंतप्रधानांच्या हस्ते नुकताच पायाभरणी झालेला केन-बेतवा नदीजोड प्रकल्प ( River Link Project ) मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील लाखो लोकांसाठी वरदान ठरणार आहे. पण, लाखो लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी आणणारा हा प्रकल्प अखेरीस मार्गी लागला, ही समाधानाची बाब. पण, त्याचा शुभारंभ होण्यास एवढा विलंब का झाला, याचाही विचार व्हायला हवा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी केली, तर महाराष्ट्राचा कायापालट करणारे सहा नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी केली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त आणि जलयुक्त करणारे हे नदीजोड प्रकल्प महाराष्ट्राचे अर्थचक्र सर्वस्वी गतिमान करणारे ठरतील, यात शंका नाही.
भोपाळ : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन- बेटवा ( Ken Betwa ) या नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी केली. राष्ट्रीय दृष्टीकोन योजनेअंतर्गत हा देशातील पहिला नदी जोडणारा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथे पोहोचले. त्यांनी तेथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले व पायाभरणीही केली.
नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या भागात मांस आणि मद्य विक्री होणार नाही, असा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. नदीकिनारी असलेल्या शहरे आणि गावांमध्ये आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी मांस, मद्यविक्री थांबवावे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.
सांगलीमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी ४१ फुटाजवळ आली आहे. तसेच दुसरीकडे कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि तेथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसाने ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असुन आजपासुन तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.
मिठी नदी रूंदीकरण प्रकल्प कार्यक्षेत्रात अडथळा ठरणाऱ्या एकूण १४९ बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने अखेर कारवाई केली आहे. सलग दोन चाललेल्या या तिक्रमण हटाव मोहिमेत १४९ बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे.यामुळे सुमारे ८ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमण मुक्त झाले तर प्रकल्प अंतर्गत रूंदीकरणासाठी ३०० मीटर रूंदीचे क्षेत्र उपलब्ध झाले आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी अतिशय उत्तम समन्वय साधून ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली.
आफ्रिका खंड हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध असलेला जगातील खंड. प्राणी, पक्षी, वनस्पती, मासे अशा जगभरातील परिचित प्रजातींपैकी दहा टक्के प्रजाती केवळ आफ्रिकेत आढळतात. शिकारी आणि वृक्षतोड यांबरोबरच इथल्या जैवविविधतेला अनेक धोके सध्या निर्माण झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत सर्वाधिक मूल्यवान असलेल्या तेलाच्या उत्खनन प्रक्रियेत जैवविविधतेचा मात्र विचार होतोच असे नाही.
पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात नद्यांचे संरक्षण, संवर्धन व स्वच्छता या विषयासंबंधी ’धारा-२०२३’ ही विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय पातळीवरची ही दोन दिवसीय परिषद सर्वार्थाने गाजली. ‘पाणी व नदी स्वच्छता’ या विषयात काम करणारे सर्व तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, जलतज्ज्ञ, अभ्यासक, सेवाभावी कार्यकर्ते आणि पर्यावरण जागृतीमध्ये अग्रेसर असलेल्या स्वयंसेवी संस्था असे यात सहभागी झालेले सर्व जुने-जाणते यांना ही परिषद अंतर्मुख करणारी ठरली.
पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली,वर्धा,यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
'चांदोली राष्ट्रीय उद्याना'तील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नदी सुरय ( river tern ) पक्ष्यांनी आपली वीणवसाहत तयार केली आहे. धरणाचे पाणी आटल्यामुळे पाण्याबाहेर आलेल्या छोट्या बेटांवर या पक्ष्यांच्या वीण वसाहती आढळून आल्या आहेत. जागतिक स्तरावर नदी सुरय ( river tern ) संख्या कमी होत आहे.
मुंबई महानगर पालिका आणि एमएमआरडीए यांनी एकत्रितपणे एक हजार कोटी खर्च करूनही मिठी नदीचे काम अपूर्णच राहिल्याची धक्कादायक गोष्ट माहिती अधिकरात उघड झाली आहे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर उपनगरातील नदी शुद्धीकरणाच्या कामांनाही एकाएकी वेग आलेला दिसतो. त्यानिमित्ताने एकूणच मुंबईतील नद्यांवरील शुद्धीकरण, सौंदर्यीकरण प्रकल्पांची सद्यस्थिती आणि पालिकेची कोट्यवधींची उधळपट्टी यामागचे गौडबंगाल मांडणारा हा लेख...
‘मीडियम स्पाइसी’ ८ डिसेंबर रोजी इटलीमधील, फ्लॉरेन्स येथील ‘ला कॉंपाग्निया’ या आकर्षक चित्रपटगृहात थेट ऑन-ग्राउंड दाखवला जाईल.
तीघांवर गुन्हा दाखल
जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडमधील 'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईतही "मुंबई आय" उभारण्यात येणार आहे. मुंबई आयमधून पर्यटकांना ८०० फुटाच्या उंचीवरून मुंबई पाहता येणार आहे. मुंबई हे संपूर्ण जगाच्या आवडीचे पर्यटन केंद्र आहे.
यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची दरवर्षीप्रमाणे तुंबई झालीच. तेव्हा, पुढच्या वर्षी पुन्हा हीच परिस्थिती ओढवू नये, म्हणून मुंबईतील पाणी गळती कमी करुन त्यासंबंधित उचित दुरुस्ती व जलमापन करणे अत्यावश्यक आहे.
२०१८ मध्ये ६८ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. नर्मदा शिप्रा लिंकद्वारे उज्जैनच्या त्रिवेणी संगमपर्यंत १३२५ एमएम आकाराची ही पाईपलाईन करण्यात आली असून यासाठी १३८ कोटी रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली
केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळमुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
राज्यातील नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी आणि ज्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे,
पुण्याच्या मुळा-मुठा नद्यांना एकेकाळी असलेलं स्वच्छ, शुद्ध आणि प्रवाही रूप पुन्हा मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेली ‘जीवितनदी’ संस्था ही ‘नदी पुनरुज्जीवन’ या पर्यावरणातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची जननी ठरली आहे. २०१४ साली स्थापन झालेल्या या एका सकारात्मक पर्यावरण चळवळीचा प्रवास जाणून घेऊया ‘जीवितनदी’च्या संस्थापक सदस्या शैलजाताई देशपांडे यांच्याकडून...
मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी व नदीतून निर्मल पाणी वहावे हे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नौकानयन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मागील लेखात आपण गाळाच्या व रूपांतरित खडकांबद्दल माहिती घेतली. या लेखात आपण नद्या व हिमनद्यांविषयी माहिती घेऊ. नदीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांना परिचयाचे आहेच. जगातील अनेक पुरातन संस्कृती नदीकिनारीच उदयास आल्या. इथपासून नद्यांना येणार्या पुरांमुळे झालेल्या हाहाकारापर्यंतची माहिती ढोबळमानाने सगळ्यांनाच असते. आता आपण नदीचे भूशास्त्रीय कार्य बघू.
भारतातील भूजलसाठा संपत चालल्याचे नीति आयोगाच्या एका अहवालातील आकडेवारीवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. तेव्हा, जलसंपत्तीच्या नियोजनाचा आणि वापराचा ताळमेळ कसा बसवायचा, याचा आढावा घेणारा हा लेख...
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतर्गत नाशिक येथील दमणगंगा-एकदरे आणि अप्पर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.