मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्
Read More
"भारतीय संस्कृती जगाच्या मार्गदर्शनाचे केंद्रबिंदू बनली आहे. भारत हा जागतिक नेता राहिला आहे आणि आज पुन्हा जगातील लोक भारताच्या चालीरीती, तत्त्वे, परंपरा आणि संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. कानपूर येथे कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण संरक्षण गतिविधीतील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व, कौटुंबिक जवळीक आणि पर्यावरण संरक्षण यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. Sarsanghachalak Kanpur Swayamsevak Meeting
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
Hindu New Year पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील संस्कृती कलादर्पण संस्था आणि समस्त सातपाटीकर ग्रामस्थ यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४७,विक्रमसंवत २०८१ रविवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी रोजी हिंदू नव वर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले . संस्कृती कलादर्पण संस्था, सातपाटी वर्षभर गावात अनेक शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते.जसे ..२६ जानेवारी विद्यार्थी कवायत संचलन - जागर प्रजासत्ताक दिनाचा,तिथीनुसार शिवजन्मोत्सव,हिंदू नववर्ष शोभायात्रा ,हुतात्मा दिन - वक्तृत्व स्पर्धा,दिवाळी पहाट
Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्या वतीने यंदाच्या हिंदू नववर्ष शोभायात्रेतून मराठी भाषा 'स्व'त्वाच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार असल्याची माहिती आहे. रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभागही असणार आहे. Girangaon Shobha Yatra 2025
एक काळ असा होता की, हिंदू धर्मसंस्कृती भारताच्या पलीकडे अगदी दक्षिण आशियाई देशांपर्यंत पोहोचली, रुजली अन् बहरली. त्यामुळे अगदी इंडोनेशियापासून ते मलेशिया आणि पुढे थेट थायलंडपर्यंत हिंदूंचा प्रभाव वाढू लागला. भारतातील पल्लव राजांच्या काळात हे सगळे घडत होते. नवव्या शतकापर्यंत अनेक देशांत राजांपासून प्रजेपर्यंत सर्वांनी हिंदू धर्माचरणास प्रारंभ केला. दहाव्या शतकानंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली. दक्षिण आशियाई देशांतील काही देश मुस्लीम देशांमध्ये धर्मांतरित होत गेले.
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने २००३ साली मोहन सालेकर आणि त्यांचे चार सहकारी एकत्र आले आणि मूल्य शिक्षण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या ईश्वरी कार्यात एकूण दोन हजार साधक कार्यकर्ते ३ हजार ७०० शिक्षक आणि चार हजार परीक्षक सहभागी आहेत. आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे नीतिमूल्य संवर्धनाचे काम डिजिटल माध्यमातून २३ प्रांतात सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अमूल्य कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी च
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
Hindi या देशात हिंदू संस्कृतीवर आघात करण्याची एक वेग़ळीच परंपरा आहे. आक्रांतांनी सुरु केलेल्या या परंपरांचे प्रामाणिक पाईक आजही भारतात आहेत. मात्र, आता विरोध थेट न करता, तो विविध रंगाढंगात केला जातो. विविध रुपांच्या माध्यमातून या पाईकांचा विरोध पुढे येतो. प्रादेशिक अस्मिता हे त्यापैकीचे एक कारण. भारतासारख्य विविधता असलेल्या देशात प्रादेशिक अस्मिता नक्कीच चूक नाही, मात्र त्याचा वापर स्वार्थासाठी व्हावा हे दुर्दैव. नेमके हेच स्टॅलिन यांना न उमगल्याने, त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि त्याच्या आडून संस्कृत भाषा आ
हिंदू संस्कृतीवर टीका करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी डाव्या कंपूची असते. त्यासाठी ते खोटी माहितीदेखील इतिहास म्हणून बेदरकारपणे प्रसिद्ध करतात आणि त्यांची इकोसिस्टम त्यांची लगेचच री ओढते. मात्र, आता जनता जागृत झाली आहे, डाव्यांच्या प्रत्येक आरोपाला संदर्भासहित उत्तर दिले जात आहे. महाकुंभबाबतही डाव्या इकोसिस्टीमने असेच अपप्रचाराचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात ते यंदा सपशेल अपयशी ठरले.
संस्कृती संवेर्धन प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने शालेय शिक्षकांसाठी नुकतीच 'कौन बनेगा रामायण एक्सपर्ट' स्पर्धेअंतर्गत परीक्षा विभाग स्तरावर संपन्न झाली. श्रीमद रामायणावर आधारीत लेखी परीक्षेत एकूण १००० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यापैकी कल्याण विभागाच्या आर.व्ही. नेरुरकर विदयालयातील शिक्षिका सौ. सुनिता सुर्वे, रायगड विभागाच्या शिशुमंदिर कडाव, कर्जत शाळेतील शिक्षिका सौ. पुनम गायकर आणि मुंबई विभागातील सर्वोदय बालिका विद्यालयच्या शिक्षिका सौ. अनिता मिश्रा यांनी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. Kaun Banega
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने रामायण, महाभारतावर आधारित परीक्षा आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक शाळांमधील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी, एकाच दिवशी एकाच वेळी संपन्न झालेल्या या परीक्षांचे नियोजन आणि कार्यवाही करण्यासाठी तीन हजार स्वयंसेवक यात स्वयं स्फूर्तीने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या परीक्षेत मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असून यातील अनेक विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी द
Geography of India म्हणजे काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे.
सध्या भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती यांच्या मिश्रणाने एका वेगळीच समस्या भारतीयांसमोर उभी राहिली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ( Indian Ideology ) असलेले तत्वज्ञानातून त्यांचे मानस तयार झाले आहे, तर नेमके त्याच्या विरोधी विचार असलेली संस्कृती स्वातंत्र्यानंतर समाजात दृढ होत आहे. या समस्येच्या निराकरणाच्या दृष्टीने समस्येचे केलेले चिंतन...
भारत अनेक जनजातींच्या परंपरांनी समृद्ध झाला आहे. या परंपरांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावण्याचे कार्य करणार्या दामोदर थाळकर यांच्याविषयी...
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दि. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभासाठी धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीशी संबंधित विविध कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. याठिकाणी एक महाकाय डमरू सुद्धा तयार होत आहे. महाकुंभ परिसरापासून जवळच उभारण्यात आलेला तीन टन वजनाचा महाकाय डमरू येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. महादेवाची नगरी काशी येथून महाकुंभ परिसरात प्रवेश करण्याच्या मार्गावर झुशी येथे रस्त्याच्या मधोमध महाकाय डमरू बसविण्यात आला आहे. Mahakay Damroo in Mahakumbh
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग , प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय , भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्कृती, आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय पुरातत्त्व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचा दौरा करत आहेत. नायजेरिया सारख्या देशाने त्यांना सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला होता. अशातच ब्राझील मधल्या रिओ दि जानेरोच्या विमानतळावर उतरल्यानंतर मोदी यांचे स्वागत वेदमंत्रांद्वारे करण्यात आले. ब्राझीलच्या वैदिक पंडितांनी मंत्रांचे उच्चार करत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
तुळशीला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत खूप महत्व आहे. त्यामुळेच तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा सुद्धा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. तुलसी विवाह कसा आणि का साजरा केला जातो? आणि यावर्षी तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर आणि बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘संस्कृत बालनाट्य लेखन स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्वलिखित किंवा अनुवादित संस्कृत कथा पाठविता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची १५ ऑक्टोबर रोजी पुनर्चना करण्यात आली आहे. डॉ. सदानंद मोरे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती आणि प्रदीप ढवळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
"आपल्या सर्वांची संस्कृती एकच आहे. अयोग्य, अनुचित आणि अधर्म रूपी राक्षसी शक्तींचा नायनाट करून धर्म आणि उदात्त कृतीतून भारताच्या गौरवशाली परंपरांचे रक्षण करायचे आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. जयपुरच्या झोटवाडा येथे शनिवारी संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पॅरालिम्पिक पदक विजेत्या मोना अग्रवालही उपस्थित होत्या. (Bhayyaji Joshi Vijayadashmi Utsav)
महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला (देशी गाय) 'राज्यमाता' म्हणून घोषित करणारा आदेश जारी केला आहे. राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाकडून सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Gomata Rajyamata Maharashtra)
सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी झटणारे हरेशआनंद आमडेकर यांच्याविषयी...
विश्व हिंदू परिषद थायलंडने बँकॉकच्या मध्यभागी असलेल्या निमुबित्र एरिना येथे गणेशोत्सव साजरा केला. विहिंप थायलंडचे उपाध्यक्ष देव के. सिंह यांनी पट्टायाच्या भारतीय समुदायाच्या सहकार्याने येथील गणेशोत्सव सोहळा आयोजित केला होता. दि. १६ सप्टेंबर रोजी जड अंतःकरणाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भारतीय, थाई आणि इतर मंडळी भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या या सोहळ्यात मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. VHP Thailand Ganeshotsav
मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील वंदना कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यापासून रोखल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सक्षम दुबे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती मिळत आहे. (Sanskrut Shlok News)
आपण आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली नाही तर एक दिवस आपला धर्म नष्ट होईल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले. शनिवार, २० जुलै रोजी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने बी. एन. वैद्य सभागृहात 'स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक' सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, संपादिका अल्का गोडबोले आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश वाड उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. विद्यापीठाकडून ‘सेंटर फॉर हिंदू स्टडीज’, ‘सेंटर फॉर जैन स्टडीज’ आणि ‘सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज’ स्थापन करण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दि. २९ मे २०२४ रोजी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली. ‘स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज’ अंतर्गत ही केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Centre for Hindu Studies JNU)
'संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान'चा (Sanskruti Samvardhan Pratishthan) स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक सोहळा शनिवार, २० जुलै सायंकाळी ४.३० वा. बी.एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे.
रा. ची. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रम, रा. ची. ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषद, काश्मिरी रामायण
संस्कृती परिवार सामाजिक संस्थेतर्फे संपूर्ण भारतात विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिवराज्याभिषेक या घटनेला दिनांक 6 जून 2024 रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणूनच संस्कृती परिवार सामाजिक संस्था ठाणे तर्फे शिवराज्याभिषेक स्मृती सोहळा आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमास नाणेतज्ञ आप्पासाहेब परब यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम संपूर्ण दिवसाचा असून श्री आनंद भारती व्यायाम शाळा ठाणे पूर्व येथे संपन्न होणार आहे.
अहिल्यादेवी होळकर या सत्त्वशील शासनकर्त्या होत्या. राजसत्ता, धर्मसत्ता, संस्कृती आणि मानवता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठाई होता. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील तीर्थक्षेत्री त्यांनी अनेक विकासकामे केली. भक्तभाविकांना सोयीसुविधा पुरविल्या. केदारनाथ येथील भक्त निवास, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसाठी तलाव, गया येथील स्थापत्य, रामेश्वर येथील उदारहस्ते दान प्रक्रिया अशा अनेक थोर कार्यांसोबत मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरीच्या खंडोबा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आणल्या.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत भाषा आणि साहित्य या विषयावर आधारित एका ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गुजरात राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या निलकंठदाम, पोईचा याठिकाणी श्री धर्मजीवन संस्कृत पाठशाला सुरु होत आहे. याठिकाणी मुलांना वेद, पौरोहित्य, कर्मकांड यांसह स्पोकन इंग्लिश, संगणक, विज्ञान, योग, यांसारख्या आधुनिक विषयांचेही धडे देण्यात येतील. (Sanskrut Pathshala)
‘अहिल्या महिला मंडळ’ ही संस्था गेली २७ वर्ष ’स्वयंसेवेतून समाज स्वास्थ्याकडे’ या उद्दिष्टाने समाजातील सर्व थरातील महिलांचा सर्वांगीण विकास करत आहे. महिलांचे सक्षमीकरण करतानाच तिच्या कुटुंबाचे आणि त्याद्वारे समाजाचे उत्थान करणार्या ‘अहिल्या महिला मंडळा‘च्या कार्याचा मागोवा घेऊया...
एक काळ होता जेव्हा ग्रंथालयं गर्दीने फुलून गेलेली असायची, ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर बसून वाचक वाचत असायचे; आता मात्र ही ग्रंथालयंच वाचकांविना ओस पडताना दिसत आहेत. काळाच्या ओघात घडलेला हा बदल सुखावणारा अर्थातच नाही. परंतु ग्रंथालयाकडे पावलं वळत नसली तरी सध्याची वाचनसंस्कृती बदललेल्या स्वरूपात का असेना, अस्तित्वात आहेच हे निश्चित. कोणत्याही भाषेतील साहित्य हे त्या विशिष्ट भाषक समाजाचे भरणपोषण करण्यास उपयुक्त ठरत असते.
"केवळ हिंदू जीवन तत्त्वज्ञानच देशाला दिशा देऊ शकते. त्याग आणि आत्मसमर्पण ही आपली मूल्ये आहेत. यातूनच आपला समाज घडवायचा आहे. आपण एक चैतन्यशील सामाजिक जीवन निर्माण करू शकतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेशजी सोनी यांनी केले. (Suresh Soni Hindu)
महाराष्ट्र राज्य, साहित्य संस्कृती मंडळाने एक ग्रंथ प्रकाशित केला आहे. ३ खंडातील या ग्रंथाचे संपूर्ण नाव 'गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास' असे आहे. पुरातत्व शास्त्र अभ्यासक आणि इतिहास व संस्कृती अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पथक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. गौतमी म्हणजे गोदावरी. या नदीच्या तीराने तिच्या खोऱ्यात संस्कृती कशी बदलत गेली याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आले आहे. दै. मुंबई तरुण भारताला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ग्रंथाविषयी ते सांगत होते.
"समाजात संस्कृतीप्रती निष्ठा वाढवण्यासाठी अजून बरेच काही करायचे आहे. भारतीय संस्कृतीचा प्रसार समाजात वाढवण्यासाठी मंदिर विश्वस्त आणि मातृशक्तीचा आधार घेता येईल. भारतीय संस्कृतीचे वाहक बनून समाजात संस्कृतीचा प्रसार वाढवा. जे या क्षेत्रात काम करू शकतात त्यांचे स्वागत आहे. समाजातील सेवा अभियान ही संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वाची गरज आहे.", असे मत विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डी रामकृष्ण राव यांनी व्यक्त केले. (Vidya Bharati Baithak News)
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ येथे २० व्या अखिल भारतीय रूपकमहोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. चार दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे १५ राज्यांतील कलाकार संस्कृत भाषेत आपले नाट्य सादर करणार आहेत. यावेळी जयपूरचे पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. (Rupak Mahotsav Jaipur)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहासोहळ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा ज्याठिकाणी पार पडला आहे त्याठिकाणी अंबानी कुटुंबीयांकडून मंदिरांची उभारणी केली गेली आहे. अंबानी कुटुंबीयांनी गुजरातमधील जामनगरमध्ये तब्बल १४ मंदिरे बांधली आहेत.