(Achalpur Assembly Constituency Result) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र बच्चू कडूंना स्वतःचाच गड राखण्यात अपयश आले आहे. अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला असून भाजपचे प्रविण तायडे हे विजयी झाले आहेत.
Read More
(Shirdi Assembly Constituency Result 2024)राज्यातील लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा निकाल अखेर समोर आला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखेपाटील यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांचा ७० हजार मतांच्या फरकाने पराभव झाला आहे.
१६९ घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ Ghatkopar | Maha MTB
ठाणे : २०१९ साली जनमताचा अनादर झाला, हे मतदार विसरले नसून राज्याची दशा कुणी केली आणि राज्याला दिशा कुणी दिली हे जनतेला माहित आहे. त्यामुळे कल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या जोरावर महाराष्ट्रातील मतदार महायुतीलाच बहुमताने निवडून देतील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यात व्यक्त केला.
(Thane) ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार संजय केळकर तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने संजय केळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत केळकर यांचा घरोघरी प्रचार करुन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे वृत्तपत्र विक्रेता सेनेने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
(J. P. Nadda) मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि या मतदारसंघाचे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ‘प्रोफेशनल मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चगेट येथील ‘गरवारे क्लब’मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
(Kalidas Kolambkar) १९९० ते २०१९ अशा आठ विधानसभा निवडणुकीत सलग निवडून येण्याचा विक्रम आमदार कालिदास कोळंबकर यांच्या नावावर आहे. ते नवव्यांदा निवडून आले, तर ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला हा संवाद.
पेण : ( Raigad ) रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. प्रचारासाठी केवळ १२ दिवस उरले असून विद्यमान सातही आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकेकाळी काँग्रेस आणि शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडने मुख्यमंत्री अ. र. अंतुले (काँग्रेस) आणि विरोधी पक्ष नेते अॅड. दत्ता पाटील (शेकाप) हे दिग्गज नेते दिले. पण, आता रायगडमधून काँग्रेसचा ‘हात’ गायब झाला असून शेकापला अखेरची घरघर लागली आहे. मात्र, महायुतीचा दबदबा वाढला आहे.
( Parvati Assembly constituency ) राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अखेर संपली असून दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ देण्यात आली होती. या वेळेपूर्वी अनेक उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र पुण्यामधील एका उमेदवाराला ३ मिनिटे उशिर झाल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.
( Vishal Parab )आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ४ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
(Ameet Satam ) भाजप आमदार आणि अंधेरी (प) विधानसभेचे उमेदवार अमीत साटम यांचे शॉपर स्टॉप जवळील एस वी रोड येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा एक मोठा टप्पा पूर्ण होऊन लाखो मुंबईकर या मार्गावरून जलद प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र हा प्रकल्प बांधत असताना वरळीच्या क्लिव्हलँड बंदर भागातील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या कोळी बांधवानी सत्तेत असणाऱ्या स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी सतत भेटीचा पाठपुरावा केला. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणाऱ्या आदित्य ठाकरे यां
( CM Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
( Sanjay Kelkar ) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत वर्णी लागल्यानंतर आ. केळकर यांनी मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी चा मुहूर्त साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाड्यातील घंटाळी देवी मंदिरात दर्शन घेऊन ‘घर चलो अभियाना’ला सुरूवात करण्यात आली.
नवी मुंबईतील बहुचर्चित बेलापूर विधानसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. पाहूया काय आहे या मतदारसंघाचा इतिहास
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
(Sitaram Dalvi) अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम दळवी यांचे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन. ते ८२ वर्षांचे होते.
( Mahesh landge )चिखली येथील साने चौक ते नेवाळे वस्ती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योजक एस.बी.पाटील आणि मळेकर कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे वाहतुकीला होणारा पत्र्याचे कंपाउंड आणि महावितरण डीपी हटवण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रात भाजपा युवा मोर्चातर्फे फुलपाखरू उद्यान, बोरिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या 'नमो चषक २०२४' क्रीडा महोत्सवाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडले.
तेलंगणाच्या कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या के. व्यंकटरमन रेड्डी (६६,६५२ मते) यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (५९,९११ मते) यांचा ६७४१ मतांनी पराभव केला आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले ए. रेवंथ रेड्डी (५४९१६) सुद्धा निवडणूक लढवत होते. त्यांचा ही यात पराभव झाला आहे.
लोकसेवक म्हणून काम करताना राजकीय परिघात राहूनही सातत्याने स्वतःच्या प्रामाणिक विचारधारेची कास धरत, सामाजिक बांधिलकीची नाळ अंगीकारत, सामान्य माणसाच्या अखंड सेवेसाठी स्वतःला वाहून घेत सर्वव्यापी शास्वत विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व, ठाणे जिल्ह्यातील ‘विकासपुरूष’ म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, असे सर्वसामान्यांचे जनसेवक, लोकनेते ही बिरूदावली असणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे. आज गणेशोत्सवाच्या शुभदिनीच त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली ही खास बात
कांदीवली पूर्व विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येतील, असे फडणवीसांनी झालेल्या बैठकीत दिले. घरा ऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव झाल्यानंतर उरलेले शिवसैनिक तरी आपल्यासोबत टिकावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली होती
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’ यामुळे त्रस्त झालेल्या गरजू नागरिकांना ‘सॅनिटायझर’पासून ते अन्नधान्य पुरवण्यापर्यंत मदत करून समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाविरुद्ध लढ्यात साथ देणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महामंत्री मुकेश गावकर यांच्या कोरोना काळातील कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताचा दिवस ठरला. तीन पक्ष एकत्र येत सरकार स्थापन होत असल्याने नाराजी आणि कुरबूर सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू आघाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअंती १५ हजारांहून अधिक मते पडली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार विद्या चव्हाण यांना ८ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. मनसे या विभागातून तिसऱ्या स्थानावर आहे. अरुण सुर्वे यांना ५ हजार मते मिळाली आहेत.
भाजपचे अभ्यासू आमदार, अशी ओळख असलेले कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. सलग दहाव्या मतमोजणी फेरीनंतर ते कायम आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी एकूण २१ हजार २२८ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे अजंता यादव उभे आहेत. गेल्या पाच वर्षातील कांदिवली विधानसभा मतदार संघातील त्यांच्या विकासकामांचा धडाका पाहता जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या पारड्यात मते टाकली आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना सलग दुसर्यांदा खासदार म्हणून मतदारांनी लोकसभेत पाठवले आहे. याशिवाय नगरपालिकेमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे.
दहिसर विधानसभा मतदारसंघातून सुमारे ८० हजार मताधिक्क्याने विजयी होणार, असा विश्वास महायुतीच्या उमेदवार भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी व्यक्त केला.
बोरिवली विधानसभा मतदारसंघात १९८० पासून भाजपचे वर्चस्व आहे. माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक, हेमेंद्र मेहता, खासदार गोपाळ शेट्टी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपचा हा गड अभेद्य राखला आहे. आता ती जबाबदारी सुनील राणे यांच्यावर आहे. पूर्वसुरींच्या कामाचा उंचावलेला आलेख त्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे सुनील राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसिद्ध केला.
मुंबई शहराशी संलग्न असलेले शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून वसईची ओळख. पश्चिम पट्ट्यातील हिरवाईने नटलेली गावे, समुद्रकिनारे असल्याने स्थानिक आणि भूमिपुत्रांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ.
बोरिवली हा भाजपचा सुरक्षित गड आहे. १९८० पासून येथे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, भाजपचे वरिष्ठ नेते हेमेंद्र मेहता आणि खा. गोपाळ शेट्टी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशिष कांटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत, विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहण्यासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आमदार नितेश राणे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कणकवलीतून ते भाजपचे आमदार असतील. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा प्रवेश रखडला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अखेर नितेश राणे यांना थेट एबी फॉर्म देण्यात आला होता. गुरुवारी सकाळी त्यांनी कणकवलीतील भाजप कार्यालयात जाऊन सदस्यत्व घेतले.
ठाकरे कुटुंबातील कोणीही यापूर्वी निवडणूक न लढविल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल फक्त तर्क वितर्कच चर्चिले जात होते परंतु आदित्यच्या उमेदवारीने याबाबतची माहिती समोर आली आहे.