(Congress) स्वतःच्या राज्यांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या नेत्यांवर काँग्रेसने महाराष्ट्र जिंकण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन माजी मुख्यमंत्री आणि तीन माजी उपमुख्यमंत्र्यांचा यात समावेश आहे.
Read More
राजस्थानमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांची पत्नी शीला हिने श्याम नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे अशोक गेहलोत आणि राजस्थानचे डीजीपी यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सुखदेव सिंह दोन वर्षांपासून अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सुरक्षेची मागणी करत होते, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही.
अशोक गहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या सविस्तर पोस्टमधून गहलोत यांच्या कामगिरीवर तोफ डागली आहे. लोकशाहीत जनताच माय बाप असते आम्ही जनादेशाचा आदर करतो आणि त्याचा नम्रतेने स्वीकार करतो असही त्यांनी म्हटलं आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अनेक नावाजलेले चेहरे पराभूत झाले. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण मतदारसंघातून भाजपचे महंत प्रताप पुरी यांनी काँग्रेसचे उमेदवार सालेह मोहम्मद यांचा दारुन पराभव केला आहे.
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसने एकही यादी जाहीर केलेली नाही. दरम्यान, दिल्लीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अशोक गेहलोत यांनी काही मजेशीर गोष्टी सांगितल्या.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या राज्य दौऱ्यावर आक्षेप घेतला होता. या आक्षेपाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. ६ ऑक्टोबरला उपराष्ट्रपती धनखर यांनी राजस्थानमधील सीकर येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या चित्तोडगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास योजनांचा पाया रचला. राजस्थानचा सर्वांगीण विकास फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो, असे ते म्हणाले. चित्तौडगडमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करताना त्यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी उदयपूरच्या घटनेला महापाप असल्याचे सांगतानाच महिला आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही हल्लाबोल केला. राजस्थानमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी गेहलोत यांच्यावर टीका केली.
आगामी विधानसभा निवणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अशोक गेहलोत यांच्याबद्दल त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बुधवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थान दौरा सध्या सुरु आहे. यादरम्यान, राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदाराने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेंद्रसिंह यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. यावेळी गुढांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होतील.
राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पक्षाने स्थापन केलेल्या कोणत्याही निवडणूक समितीमध्ये महत्वाचे पद देण्यात आले नाही. पक्षाने बुधवारी (६ सप्टेंबर २०२३) ८ निवडणूक समित्यांची घोषणा केली. यातील कोणत्याही समितीमध्ये सचिन पायलट यांना एकाही समितीचे अध्यक्षपद देण्यात आलेले नाही.
दि. १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून जगभरात ओळखला जातो. त्यानिमित्ताने सध्या भारतात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या राजस्थानमधील कोटा शहरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाने अतिशय गंभीर स्वरुप प्राप्त केले आहे. त्या पाश्वर्भूमीवर या आत्महत्यांमागची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
राजस्थानमध्ये परिवर्तन संकल्प यात्रेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाना साधला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "चांद्रयानचे प्रक्षेपण आणि लँडिंग यशस्वी झाले, परंतु काँग्रेसचे राहुलयान २० वर्षांपासून प्रक्षेपित होऊ शकले नाही."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थान येथील डांगूरपूरमध्ये भाजपच्या ‘परिवर्तन संकल्प यात्रे’च्या प्रारंभ केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. गृहमंत्री शहा म्हणाले, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या नेत्याचे सनातन धर्माविषयीचे वक्तव्य हे केवळ तुष्टीकरणासाठी असून या माध्यमातून विरोधी पक्षाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून लव्ह जिहादचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मोईन खानने दोन किशोरवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवले. आरोपीने दोन्ही मुलींना ओलीस ठेवून बलात्कार केला आणि मित्राकडून पैसे घेऊन त्याला या दोन मुलींसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवू दिले.
राजस्थानमधील नागौरमध्ये ७० वर्षीय संत मोहन दास यांची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांचा मृतदेह आश्रमाच्या फरशीवर पडला होता. कुचामण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रसाळ गावात हा आश्रम आहे. या आश्रमातील भैरो बाबा मंदिरात संत मोहन दास मागच्या १४ वर्षांपासून सेवा करत होते.
नूह हिंसाचारप्रकरणी हरियाणा सरकारकडून कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून यासंदर्भात नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. नुह येथील हिंसाचारात स्थानिक दंगलखोरांना चिथविण्याकरिता राजस्थानातील हल्लेखोरांनी पाठबळ दिल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून सरपंच संघटनेचे प्रमुख रफिक यांनी सांगितले आहे. दरम्यान, या हिंसाचारानंतर हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता सरपंच संघटनेच्या प्रमुखांच्या व्हिडीओतून त्यांच्या गावातील लोक लुटालूट तसेच हिंदूंवर हल्ले करण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे.
राजस्थानमधील भिलवाडा येथे एका १४ वर्षीय मुलीला कोळशाच्या भट्टीत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात सामुहिक बलात्कारानंतर खून झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीस तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी घडली.
राजस्थानमधील जयपूर शहरातून मॉब लिंचिंगचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम समाजातील एका महिलेवर तिच्या मुस्लिम पुरुषांच्या जमावाने हल्ला केला. त्या महिलेने आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ काही घोषणा लिहिल्या होत्या.
काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी २७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्याला राजकीय वादात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. गेहलोत यांनी दावा केला की , पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून त्यांचे भाषण काढून टाकण्यात आले आहे. या प्रोपगेंडाची पोलखोल पंतप्रधान कार्यालयाने केली आहे. पीएमओ कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री गेहलोत यांना प्रोटोकॉलनुसार कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच त्यांना भाषणासाठी ही वेळ देण्यात आला होता. मात्र त्यांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थ
राजस्थानमध्ये सरकार चालवण्याच्या नावाखाली काँग्रेसने केवळ लुटमार आणि असून खोटेपणाचा बाजार चालवला आहे. काँग्रेसचे हे कारनामे एका ‘लाल डायरी’त नोंदवलेले असून ही डायरी उघडली तर भलेभले अडचणीत येतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसला दिला आहे.
राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांना काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत जाऊ दिले नाही. त्यांना मार्शलने सभागृहाबाहेर नेले, त्यादरम्यान त्यांना मारहाणही करण्यात आली. आपल्याच सरकारला आरसा दाखवताना राजेंद्र सिंह गुढा म्हणाले होते की, राजस्थान हे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये नंबर १ राज्य बनले आहे. विधानसभेत हे वक्तव्य केल्यानंतर काही तासांनी त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात आल्याची बातमी आली. आता बळाचा वापर करून त्यांना विधानसभेतूनही बाहेर काढले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्री राजेंद्र सिंह गुडा यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी आपल्याच सरकारला आरसा दाखवला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचवेळी मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळेच राजेंद्र सिंह गुढा यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
जोधपूर पोलिसांना मंगळवारी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील चेराई गावात सहा महिन्यांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे जळलेले मृतदेह सापडले. मारेकऱ्यांनी त्यांचा गळा चिरून, अंगणात ओढून जाळून टाकल्याची माहिती आहे. कुटुंबाच्या घराला आग लावल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
राजस्थानच्या रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात 'टी-१०२' ही वाघीण तीन बच्छड्यांसह विहार करताना दिसून आली. गेल्या वर्षी दि. १६ मे रोजी रामगढ विषधारी अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. टी-१०२ या वाघिणीला जुलै २०२२मध्ये रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून या प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले होते. यामुळे प्रकल्पातील वाघांची संख्या ५ वर गेली आहे.
राजस्थानचे मंत्री आणि काँग्रेस नेते राजेंद्र गुडा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विदान केले आहे. यावेळी त्यांनी भगवान श्री राम आणि माता सीता यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजेंद्र गुडा म्हणाले- 'सीता अतिशय सुंदर होती, तिच्या सौंदर्यामागे भगवान राम आणि रावण वेडे होते.' तसेच माता सीतेच्या गुणांशी स्वतःची तुलना करून राजेंद्र गुडा पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट माझ्या गुणांमुळे माझ्यामागे धावत आहेत.
नवी दिल्ली : राजस्थान सरकार अंतर्कलहाने ग्रासले आहे. राजस्थानचा मुख्यमंत्र्यांचा आपल्या आमदारांवर आणि आमदारांचा आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगाविला आहे. माऊंटअबू येथील जाहिर सभेस संबोधित करताना ते बोलत होते.
राजस्थानात विधानसभा निवडणुकीचे पडघत वाजत असतानाच, काँग्रेसचे दोन दिग्गज नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन्ही नेते पुन्हा एकदा उघडपणे समोरासमोर आले आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले असून ११ एप्रिल रोजी ते एक दिवसीय उपोषण करणार आहेत.
मानहानीच्या खटल्यात २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर १२ दिवसांनी राहुल गांधी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी गेले आहेत. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते. दरम्यान, मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे.
नुकतेच भारत पर्यटन करुन आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग अहवालावर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केलायं. भाजपाच्या काळात अदानीना सर्वाधिक सहकार्य केलं गेल्याचा आरोप ही करण्यात आला. पण हे खरंच सत्य आहे का? आणि अदानी यांची गुंतवणूक फक्त भाजपाच्या सत्तेत आल्यानंतरच वाढली का? नेमकं खरं काय हे सगळचं आज जाणून घेऊयात.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना अचानक हिंदूंविषयी प्रेमाच्या उकळ्या फुटू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हिंदू आणि हिंदू देवदेवतांचे गोडवे गायल्याने हेच ते पूर्वीचे फारुख अब्दुल्ला का, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. प्रभू श्री राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे देव असल्याचे त्यांनी सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असल्याचेच चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असताना राजस्थानात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला. 80 हून अधिक आमदार नाराज झाले आणि राजस्थान हातातून जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांच्या मर्जीतल्या एखाद्या व्यक्तीला कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते असे सांगितले जाते. कॉंग्रेसमधील चर्चेत असलेल्या नावांपैकी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत किंवा खासदार शशी थरूर यांची भावी अध्यक्षपदी वर्णी लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे
एरवी ‘पधारो म्हारे देश’ म्हणत जगभरातील पर्यटकांचे आतिथ्य करणार्या राजस्थानमध्ये २०२१ साली सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात नुकतेच उघड झाले. त्यामुळे काँग्रेसशासित आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या या राज्याच्या जनतेवरच ‘न पधारो मारे देस’ म्हणण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे.
गुलाम नबी आझादांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाची कार्यपद्धती, नेतृत्वाची पुरती पोलखोल केली. परंतु, त्यानंतरही काँग्रेसचे डोळे खाडकन उघडतील आणि या पक्षात काही चमत्कार होईल, हा अंध:विश्वासच ठरावा. त्यानिमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांची गळती आणि आगामी अध्यक्षीय निवडणुका यांचा आढावा घेणारा हा लेख...
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरु आहे. या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घातला असून काँग्रेसच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडी चौकशीच्या निषेधार्थ अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर टायर जाळले.
गुरुवारी, दौसा येथील एका गावातील शेतकरी जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आणि राजस्थान सरकारच्या गोंधळात टाकणाऱ्या धोरणांचा निषेध केला आहे ज्या धोरणांचा आधार घेत.बँकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा लिलाव केला आहे. कर्जमाफीची मागणी करत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानाबाहेर संतप्त शेतकरी म्हणाले की, काँग्रेस सरकारने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.
इंदिरा गांधी अर्बन क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कर्जावरील व्याज अनुदानासाठी ५ कोटी
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार, महिलांवरील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे ती राजस्थानमध्ये. त्याच राजस्थानमध्ये जिथे आज अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री महोदयच खुद्द गृहमंत्री म्हणून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसाठी जबाबदारही आहेत. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक म्हणजे ५,३१० बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या.
राजस्थानातील सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर घटनेचे पावित्र्य, पक्षांतर बंदी कायद्याची उपयुक्तता, देशातल्या न्याय यंत्रणेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे स्थान वगैरे गंभीर मुद्दे गुंतले आहेत. म्हणून त्याची वस्तुनिष्ठपणे चर्चा करणे गरजेचे आहे.
राजस्थानच्या सत्तासंघर्षानंतर अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया!
आपण केलेल्या मेहनतीमुळे राज्यात पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला आणि आता आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, याची खात्री सचिन पायलट यांनाही होती. पण झाले उलटेच, काँग्रेसश्रेष्ठींनी राहुल गांधींना प्रतिस्पर्धी नको म्हणून सचिन पायलट यांचे पंख छाटले व अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आणून बसवले. इथूनच सचिन पायलट यांनी नाराजी वाढत गेली व ती पक्षाविरोधात बंड करण्यापर्यंत गेली.
मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता
पीडितांना भेटायला प्रियांकांना वेळ नाही का ?मायावतींचा काँग्रेसवर हल्लाबोल
राजस्थानमधील गहलोत सरकारने पाठपुस्तकातुन सावरकरांच्या नावापुढील 'वीर' पदवी काढल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या विरुद्ध केले आक्षेपार्ह्य विधान
: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या विनंतीवरुन राज्यपाल कल्याण सिंह यांनी मंत्र्याचे खातवाटप जाहीर केले आहे.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकांनंतर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटण्याची शक्यता आहे.