मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करतात. यावर्षीदेखील रविवार, ३० मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मैदान सज्ज आहे.
Read More
उद्योग, ऊर्जा तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची गुढीपाडवा आणि रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
Happy Gudipadwa महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
Hindu New Year Yatra ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल.
Dr. Hedgewar शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्यामरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
वसंत ऋतूचे आगमन होताच वृक्षांना नवी पालवी फुटते. आंबा,कडुनिंब मोहरून जातो. पळसालाही बहर येतो. कोकिळा सुद्धा स्वर आळवायला सुरुवात करते. अशा या सुगंधित वातावरणात चाहूल लागते ती नववर्षाची. चैत्र शुद्ध प्रतिपदेची.