महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले असून वीजदरात दहा टक्के घट होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुर्हूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना ही गोड बातमी दिली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read More
( Devendra Fadnavis On Mahavitaran ) ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात परिवर्तन करीत आहे. मागील २ वर्षांत केंद्रशासन आणि खासगी क्षेत्रातील उत्कृष्ट संस्था यांकडून महावितरणला २१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये ‘इंडिया चेंबर कॉमर्स’, ‘स्मार्ट ग्रीन फोर्स’, ‘स्कॉच अवार्ड’ यांसारख्ये उत्कृष्ट पारितोषिकांचा समावेश आहे. शासनाचे सहकार्य लाभले तर भविष्यात महावितरण कंपनी शेअर बाजारात प्रवेश करेल. शेअर बाजारात येणारी महावितरण ही देशातील पहिली वीज आस्थापना ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक करण्याचे आणि एकूण वीजनिर्मिती क्षमता ५०० मेगावॅट करण्याचे उद्दीष्ट महावितरणने ८२ दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
Samajwadi Party उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गेल्या एका महिन्यात संभलमध्ये १४०० वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण १६ मशिदींचा समावेश असून आणि दोन मदरशांचा समावेश आहे. वीजचोरांकडून महावितरण विभागाने ११ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : “घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती ( Solar Energy ) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी, ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे,” असे ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थाकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.
केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुंबई : महावितरणचे कार्यकारी संचालक ( Executive Director ) (प्रकल्प) सुनिल रंगनाथ पावडे (वय ५४ वर्षे) यांचे सोमवारी रात्री जळगाव येथे ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पारनेर (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील दरोडी या त्यांच्या मूळ गावी बुधवारी (दि. ४) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ( Abhay Yojana ) ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
नागपूर येथील पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, आयआयटीएमएस (IITMS) प्रकल्प तसेच नागपूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. नागपूर शहरातील ₹१३००कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन यावेळी करण्यात आले.
(MahaVitaran) माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आणि दर्जेदार ग्राहकसेवेसाठी प्रभावी धोरणात्मक उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. दि. २६ सप्टेंबर रोजी हॉटेल हॉलिडे इन, एरोसिटी, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
महावितरणकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरवरून आणि अटल सेतूवर भेगा पडल्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात आला.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्राकरीता कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंडळामार्फत विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यातील विविध संस्थांमार्फत राबविण्यात येतात. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या अभ्याक्रमांचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEB) यांच्या “विद्युत सहाय्यक” या पदभरती जाहिरातीतील शैक्षणिक अर्हतेमध्ये करण्यात आला आहे.
'महाराष्ट्र वीज नियामक आयोगां'तर्गत रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगामार्फत यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याभरतीद्वारे, महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मधील अध्यक्ष, अपक्ष सदस्य पदाच्या १६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आ
देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब म्हणजेच ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या तसेच जागतिक वारसा असलेल्या घारापुरी बेट. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज २०१८ साली वीज पोहोचली असून यासाठी २२ केव्ही, सिंगल कोअर सबसी केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून टाकण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.
नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व परिमंडलांना दिले होते.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून विविध पदांकरिता ही संधी उमेदवारास मिळणार आहे. महावितरणमध्ये रिक्त ३६ जागांकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास भंडारा येथे नोकरीस जावे लागणार आहे. दरम्यान, महावितरणमध्ये १० वी/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारास याकरिता अर्ज करता येणार आहे.
अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटीने पारित केलेल्या आदेशामुळे राज्यातील वीज कंपन्यांना आपल्या दरात बदल करावे लागणार असून टाटा पावर या कंपनीच्या वीजग्राहकांना या आदेशामुळे फायदा होणार आहे. अपिलेट ट्रिब्युनल फॉर इलेक्ट्रिसिटी(एपीटीईएल)ने पारित केलेल्या अंतरिम आदेशाने टाटा पावरच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोागाच्या टॅरिफ शेड्युलला स्थगिती दिली असून याचा फायदा वीजग्राहकांना होणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वीजग्राहकांना २५ ते ३० टक्के सूट मिळणार असून २०२०च्या आदेशानुसार टाटा पावरला ग्राहकांना वीजदेयके देणार आ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा खात्याची जबाबदारी हाती घेतल्यानंतर विभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. महावितरणतर्फे ग्राहकांच्या समस्या सोडवण्याला गती देण्यात आली असून ऊर्जामंत्री फडणवीसांच्या सुचनेनंतर दहा दिवसांत २ लाख तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे विजेच्या बाबतीत गेल्या वर्षभरात सरकारी वीज कंपन्यांनी भरीव कामगिरी केली असून ऊर्जा क्षेत्रात राज्य पुन्हा प्रगतीपथावर आले आहे, असे प्रतिपादन महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र : महापारेषण कंपनीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे परिमंडळात दि.२१ जुन २०२३ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे क्षेत्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
मुंबई : ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मुलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे, असे महावितरणचे नवनिर्वाचित अध्यक्ष लोकेश चंद्र म्हणाले. तसेच, गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले.
‘महावितरण’ ही सरकारी वीज वितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या रुळावर येत असून, ग्राहकांना सेवा देण्याच्या बाबतीत कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. कंपनीच्या सुधारलेल्या कामगिरीचे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा प्रभाव हे आहे. आज ‘महावितरण’च्या स्थापना दिनानिमित्ताने ‘महावितरण’चे स्वतंत्र संचालक असलेल्या विश्वास पाठक यांचा याविषयी प्रकाश टाकणारा हा लेख...
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.
मुंबई : राज्यातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींवर रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविल्याने सोसायटीच्या वीजबिलात मोठी कपात झाली आहे. राज्यात ३,०२६ हाऊसिंग सोसायट्यांनी ५२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली असून अधिकाधिक संस्थांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
नागपूर : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी राज्यातील विजेच्या मागणीत उन्हाळ्यात अपेक्षित वाढ लक्षात घेऊन "मिशन औष्णिक ८००० मेगावॅट" चे उद्दिष्ट निश्चित करून दिले. राज्यात यावर्षी सर्वोच्च विजेची मागणी एप्रिल महिन्यात २९ हजार मेगावॅटच्या घरात पोहचली तर सध्या २८००० मेगावाटच्या जवळ आहे आणि येत्या काही दिवसांत ती आणखीन वाढेल असा अंदाज आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने आपल्या सर्व संसाधनांचे पुरेसे नियोजन केले आहे.
पुणे : पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणार्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे.
सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे
सौर रुफटॉप योजने अंतर्गत आलेल्या अर्जांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून ग्राहकाला याचा लाभ घेता येईल असे नियोजन प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने करावेत.
ठाकरे सरकरमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना आता आदित्य ठाकरेंचीही पोलखोल होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अडीच वर्षांच्या कालावधीतील सर्व कामांचे केंद्र सरकरकडून ऑडिट केले जाणार आहे
राज्यातील वीज जोडणीप्रश्न तडीस फडणवीस - शिंदे सरकार तडीस नेणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे
माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे सोमवारी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
महाराष्ट्रात उद्योगांना मिळणारी विद्युत शुल्कमाफी मोबाईल टॉवर कंपन्याना कुठल्या आधारे देण्यात आली, याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन विधान परिषदेत राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे
राज्यातल्या वीजग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणार्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘टाळे ठोको’ व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांच्या कुटूंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे याला जवाबदार फक्त कोल्हापूर विद्युत अँपरांटीसचे संस्था संचालक आणि संस्था सचिव असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे संस्थेच्या या भूमिकेवर कामगार वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. तसेच रत्नागिरीतील भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी होत आहे.
बहुतांशी महिलांचा सुलभ मार्गावरून जीवनप्रवास करण्यावर भर असतो, तर काहीजणी भेगाळली वाट निवडून नवा स्वत:चा नवीनच मार्ग निर्माण करतात. त्यापैकीच एक म्हणजे उषा जगदाळे...
महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना एक स्वत्रंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे अधिक सोप्पे होणार
सन २०१८-१९ मध्ये मागितलेली दरवाढ सरासरी १५ टक्के आहे, ३५ टक्के नाहीच. वस्तुस्थितीला सामोरे जाताना कधीकधी दरवाढ ही करावीच लागणार
शहरातील भवानीपेठेत राहणारे दिलीपकुमार जैन यांना महावितरणने दिलेले अवाजवी वीज बील अर्ज देवूनही कमी न करता विद्युत पुरवठा खंडीत केला होता.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकर संतप्त होत आहेत
रणरणत्या उन्हाचा पारा ४५ पर्यंत पोहोचल्याने मे महिना जनतेसाठी हिट ठरला आहे. त्याचा विपरित परिणाम बाजारपेठेत जाणवत आहे. शहरात भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.
मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीसंदर्भात महापालिकेने महावितरणला नोटीस बजावल्याने महावितरणच्या आयएमआर कॉलेजजवळील कार्यालयाने महापालिकेस पत्र देवून थकित वीज बिलात मालमत्ताकर व पाणीपट्टी बिलाची रक्कम समायोजित केली आहे, असे पत्र दिले.