सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
Read More
( Fishing will be given the status like agriculture Minister Nitesh Rane ) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
( Minister Nitesh Rane on pilot project of eco-friendly water taxi in Mumbai ) मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार राबवून ही सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्वीडनचे महावाणिज्य दूत स्वेन ओस्टबर्ग यांना बैठकी दरम्यान केल्या.
स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणार
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.
( Special Economic Zone for Fisheries Development Nitesh Rane ) राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १८ मार्च रोजी पहिले सादरीकरण करण्यात आले.
५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ८ मार्च रोजी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
Nitesh Rane “राज्यातील विशेषतः मुंबई शहराला लागून असलेल्या समुद्र किनार्यावरील जागेचा जाहिराती, करमणूक आणि चित्रीकरणासाठी व्यावसायिकांनी उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दिले.
वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही नजीकच्या भविष्यात मानवी जीवनाची एका अर्थाने वाहक शक्ती ठरणार आहे. त्याच्या सर्वव्यापी क्षमतेची चुणूक वर्तमानात अनेक क्षेत्रांत स्पष्ट दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रापासून ते शासकीय सेवांपर्यंत तिचा प्रभाव व्यापक राहणार आहे. अशा वेळी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत प्रगतिशील पाऊले उचलली आहेत. प्रत्येक विभागाला ‘एआय’ तंत्रज्ञान अंगीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक विभागांनी नियोजन सुरू केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीतील मत्स्यव्यवसा
मच्छिमार संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी दिल्या.
Nitesh Rane नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे असलेल्या ‘जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट’ या मदरशामध्ये येमेनमधील नागरिकाचे बेकायदेशीर वास्तव्य होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नव्हता. मात्र, त्याचे भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून त्याला मदरशामध्ये आश्रय देण्यात आला होता. दि. ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. राज्यभरातील मदरशांमध्ये असे प्रकार सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त करून मंत्री नितेश राणे यांनी
विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे जेट्टी विकसित करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपयुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळावा याहेतूने राज्यभरात 'जिल्हा तिथे मत्स्यालय' हा अभिनव उपक्रम राज्याच्या मत्स्यविभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दै. मुंबई तरुण भारतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या मत्स्यालयाच्या उभारणीसाठी विभागामार्फत मुंबई उपनगरे आणि पुण्यातही जागांचा शोध सुरू झाला आहे.
मुंबईतील समुद्रात चीन देशाच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने नुकसान झालेल्या नौका मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ लक्ष ५५ हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
रेडिओ क्लब जेट्टीसाठी भाऊच्या धक्क्याचा पर्याय
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वच विभागांनी राज्याच्या विकासासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी राज्याच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाने सागरी किनारपट्टी सुरक्षेसह किनारपट्टी आणि मत्स्य व्यवसायाचा विकास हे धोरण स्वीकारले. या धोरणाबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
मुंबई : सिंधुदुर्गातील किमान ५० ते ६० टक्के जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे. सिंधुदुर्गातील एका सभेमध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी हा दावा केला. वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या जमिनींवर ताबा करण्यात आला आहे हे तपासणीदरम्यान अनेक देवस्थानांवरदेखील वक्फ बोर्डाचा दावा असल्याचे सांगण्यात आले. नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान हा मुद्दा मांडला.
मुंबई : ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक काम करणा-या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहीत कालावधीत करावेत असे निर्देश ससून डॉक येथे पाहणी करताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी दिले.
मुंबई : जे आमचे आहे, ते आम्हाला मिळालेच पाहिजे, अशी भावना मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी व्यक्त केली. रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर वरळी येथे आयोजित आरंभ गर्जना सोहळा धार्मिक विधीला ते उपस्थित होते.
मुंबई : “कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या कोकण प्रांताच्या ५९व्या प्रांत अधिवेशनाला शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे सुरुवात झाली. यावेळी मंत्री राणे उपस्थित होते.
किनारपट्टीचा विकास आणि सुरक्षा हे दोन विषय माझ्या अजेंड्यावर असून येणाऱ्या दिवसांत सर्वांनाच जिहादीमुक्त किनारपट्टी पाहायला मिळेल, असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी आपल्या खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूर : विधानसभेत 'भाईचाऱ्या'वर भाषण देणाऱ्या आमदार अबू आझमी यांना मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी खडेबोल सुनावले. फतवे काढणाऱ्यांना वेळेत भाईचाऱ्याचे 'लेक्चर' दिले असते, तर अशी भाषणे देण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत मंत्री राणे यांनी आझमींची कानउघडणी केली.
नागपूर : आम्ही राज्यात एक सक्षम आणि मजबूत धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) दिले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवार, १६ डिसेंबर रोजी ते पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : 'व्हिजनरी' नेता अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात ( Cabinet ) १९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्वाधिक नऊ चेहरे हे भाजपमधील आहे.
मुंबई : नागपूरातील राजभवन येथे महायुतीच्या एकूण ३९ आमदारांचा शपथविधी १५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. नागपूर राजभवन येथे झालेल्या मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यामध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
Nitesh Rane लाडकी बहीण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थी या मुस्लिम आहेत. त्यामुळे दोन हून अधिक अपत्य असलेल्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे म्हणत नितेश राणे यांनी आपली परखड भूमिका व्यक्त केली आहे. हा तर एक ट्रेलर होता, जर हिंदू एक झाला तर तुम्हाला पिक्चर दाखवेल, असे बांगलादेशातील हिंदूंवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी ११ डिसेंबर २०२४ रोजी हे वक्तव्य केले आहे.
मुंबई : “पीएफआय’ आणि ‘आयएसआय’सारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा,” अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) केली आहे. ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच, ’हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,’ असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे म्हणाले की, “तालिबान समर्थक सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर करून ‘व्होट जिहाद’चे एक उत्तम उदाहरण दि
२०१९ ला भाजप शिवसेना यूतीला बहुमत मिळाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर आजचे चित्र दिसले नसते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे. मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी ते कणकवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. याप्रसंगी नितेश राणेदेखील उपस्थित होते.
मुंबई : संजय राऊतांनी संस्कृती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या परंपरेचे धडे त्यांचे मालक उद्धव ठाकरेंना द्यावेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) केला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले.
rane vs thackeray : कणकवली आणि सावंतवाडीच्या जोडीला यंदा कुडाळ मतदारसंघ महायुतीकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणेंनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात ते यशस्वी होतील का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वारे सध्या कोणत्या दिशेला वाहत आहेत? ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली पक्षांतरे या वाऱ्यांना रोखतील का? याचा आढावा.
(Nitesh Rane) “भारतात ९० टक्के हिंदू राहतात. त्यामुळे हिंदूंचे हित जपणे, हा गुन्हा होऊ शकत नाही. देशातील कट्टरपंथी, बांगलादेशी हे हिंदू सण, मिरवणुकांवर दगडफेक करतात. याविरोधात आवाज उठवल्याबद्दल गुन्हा दाखल होत असेल, तर हिंदूहितासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला मी तयार आहे,” असे मत भाजप आ. नितेश राणे यांनी बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी व्यक्त केले.
(Nitesh Rane)“इस्लामिक कट्टरपंथींना आजच आवर घातला नाही, तर येत्या काळात हिंदूंचे सणही आपण सुखाने साजरे करू शकणार नाही. त्यामुळे अशा दगडफेक करणार्यांना, हिंदू सणांना गालबोट लावणार्यांना वेळीच ठेचावे लागेल,” असे प्रतिपादन भाजप आ. नितेश राणे यांनी केले. गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी तहसिलदार कार्यालय, ३२ शिराळ, सांगली येथे ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने हिंदू जनआक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
नितेश राणे हे हिंदूत्वादी नेते असून ते कळवळीने हिंदूत्वाचे विषय मांडतात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. भाजप आमदार नितेश राणेच्या वक्तव्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत मोफत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी ११.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्गसाठी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला.
हिंदी बिग बॉस १८ चा विजेता आणि कथित स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने कोकणी माणसांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. मुनव्वरने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले असून सामान्य माणसांसह राजकीय नेत्यांनी देखी त्याची चांगलीच कानउघाडणी केली आहे. यात भाजप पक्षाच्या नेत्यांनी तर त्याला थेट पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली होती. सर्व स्तरांतून विरोधी आणि टीका झाल्यानंतर आता मुनव्वरने कोकणवासियांची व्हिडिओच्या माध्यमातून जाहिर माफी मागितली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्
"दिशा सालियनवर सामूहिक अत्याचार झाले, तेथे आदित्य ठाकरे होता का? आदित्यच्या निकटवर्तीयांनी तिला बाल्कनीतून ढकलले का? आदित्य ठाकरे आणि दिशा सालियनच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन ८ तारखेला एकच होते का?, याची खरी उत्तरे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी द्यावीत. दिशा सालियनच्या जागी तुमच्या घरातील मुलगी असती, तर अशी लपवालपवी केली असती का? अशा प्रश्नांची सरबत्ती भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवार, दि. २४ जुलै रोजी केली. नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे. एक ऐतिहासिक कार्य ते करीत आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ", असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. १४ जुलैपर्यंत मुदत दिली होती.
उद्धव ठाकरे, तुम्ही संविधान वाचवण्यासाठी लढलात की, देशात आणि राज्यात शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. उबाठा गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सांगलीची जागा सोडण्यासाठी उबाठा गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच संजय राऊत यासाठीच सांगली दौऱ्यावर गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
"धारावीतील सकल हिंदू समाज पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे. धर्मांधांनी पुन्हा वस्तीतील कुठल्याही हिंदु बांधवांना त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेनेही पाहण्याचा प्रयत्न केला; तर शांत बसलेल्या हिंदुंचा तिसरा डोळा उघडेल आणि तांडव काय असतं याचे दर्शन होईल.", असा सज्जड इशारा भाजप आमदार आणि हिंदुत्त्ववादी नेते नितेश राणे यांनी धातावीतील धर्मांधांना दिला.
नाशिक मधील वसंत नाईक यांच्या शिक्षण संस्थेची हक्काची जमीन हि वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली असून त्याचा खटला न्यायालयात सुरु आहे. या प्रमाणेच नाशिकमधील अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. आणि त्या जागांवर मोठंमोठे दर्गे, मशीदी उभारल्या जात आहेत हा समस्त हिंदुसाठी चिंतेचा विषय असून सर्व हिंदूंनी एकत्र येवून वक्फ बोर्डा विरोधात आवाज उठवत वक्फ बोर्ड रद्द केले पाहिजे. असे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'च्या समारोप कार्यक्रमात केले.
शंभर खोके एकदम ओके ही घोषणा गेल्या दोन वर्षांपासून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या बड्या नेत्यांच्या तोंडी आपण ऐकली असेल. मुख्यतः ही वाक्य ठाकरे गटाच्या नेत्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर केल्या जाणाऱ्या आरोपात पाहायला मिळायची. पण आज हे चित्र बदलण्यात शिवसेनेला शिंदे गटाला यश मिळालं आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का देत मोठा गौप्यस्फोट केलायं. ‘उद्धव ठाकरे यांच्याकडे मी १ कोटी रूपयांचा चेक दिला होता. मंत्रिपदासाठी त्यांनी पैसे मागितले की पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही’, असा मोठा गौप्य
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केली. त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा देखील करण्यात आल्या. पण दुसरीकडे ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी आयती संधी साधत दि. १ फेब्रुवारीपासून आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यासं रायगड जिल्ह्यातून प्रारंभ केला. आधी या दौऱ्यासंबधी मिळालेल्या माहितीनुसार, हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. आणि या दौऱ्यात सहा सभांचं आयोजन करून कोकणात जम बसवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जाणार आहे. त्य
१६ मे २०२१ कोकण आणि गोवा किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने तडाखा दिला. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड याभागांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. दरम्यान कोरोनाच्या लाटेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायाला ही फटका बसला होता. शेतीवर घर चालवणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचे ही या वादळात नुकसान झाले. त्याआधी जून २०२० मध्ये रायगड आणि रत्नागिरीच्या सीमाभागात निसर्ग चक्रीवादळ आले होते. ज्यात अनेक बोटी फुटल्या, वाहून गेल्या, जाळ्या वाहून गेल्या इतकेच न
महाराष्ट्राची राजधानी मुंबईजवळील मीरा रोड परिसरात दि.२१ जानेवारी रोजी रात्री उशिरा हल्लेखोरांनी गोंधळ घातला. ज्या वाहनांवर श्री राम नावाचे झेंडे लावण्यात आले होते त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. हल्लेखोरांनी केलेल्या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तोडफोड करताना हल्लेखोरांनी रस्त्यावर ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा दिल्याचे बोलले जात आहे. या गोंधळाचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. दरम्यान या घटनेबद्दल भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, 'काल रात्री मीरारोडमध्ये जे झाले. एक लक्षात ठेवा, चुन चुन के मारेंगे'
राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा महायुतीच्या नेत्यांनी शनिवार, दि. १३ जानेवारी रोजी समाचार घेतला. 'कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नव्हे, तर तळीरामाचे भक्त आहेत', अशी खरमरीत टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. उबाठा गटात हिंमत असेल, तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंची लोकसंख्या कमी करून, २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्याविरोधात आम्ही सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे ऐकले. परंतु, हिंदूंसाठी कितीही गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे, असे स्पष्ट मत भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी व्यक्त केले.
९० टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या देशातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लॅण्ड जिहाद, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या कमी करून, २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे षड्यंत्र त्यामागे आहे. त्यामुळे हिंदूंच्या जमिनीवर अतिक्रमण करणारा वक्फ बोर्ड कायदा रद्द करा, अशी आग्रही मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी सोलापूर येथे केली.