( Minister Amit Shah visit Maharashtra ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार, दि. ११ एप्रिल आणि शनिवार, दि. १२ एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगड किल्ल्यावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेणार आहेत.
Read More
( Union Home Minister Amit Shah at Raigad on April 12 ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी रायगडाला भेट देणार आहेत.
राजकारण म्हटले की विरोधीपक्षांवर टीका ही आलीच. त्यात विशेष काहीच नाही. आणि विशेषतः राजकारणात टीका करताना, ती अत्यंत कठोर शब्दांत आणि कोणत्याही मुद्द्यांवर केली जाते.
सत्ता सर्वांनाच हवी असते; पण एक पक्ष आणि एका घराण्याचे भले करण्यासाठी ती हस्तगत करणे आणि देशाला जगात सर्वश्रेष्ठ स्थानावर नेण्यासाठी सामान्य भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी ती प्राप्त करणे, यात जमीन-अस्मानाचा फरक. भाजपने पुन्हा एकदा सत्तेचे स्वप्न पाहिले, ते देशाला केवळ विकसित राष्ट्र बनविण्यासाठी नव्हे, तर भारताला त्याच्या हक्काचा जागतिक आत्मसन्मान मिळवून देण्यासाठीच. हाच भाजपच्या ‘पार्टी विथ ए डिफरन्स’चा अर्थ असून, अन्य पक्षांच्या तुलनेतील गुणात्मक फरक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा सरकारचा निर्णय वैध ठरविल्यानंतर अपेक्षेप्रमाणे काश्मिरी नेत्यांच्या तो पचनी पडलेला नाहीच. परंतु, या नतद्रष्ट ‘गुपकार गँग’ने कितीही नाकारले तरी ‘कलम ३७०’ नंतर काश्मीरमध्ये सर्वार्थाने परिवर्तनाची झालेली नांदी कदापि नाकारता येणार नाही, हेच वास्तव!
उत्तराखंडमधील सरकार समान नागरिक संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून यूसीसी लागू करण्याबाबत दिवाळीनंतर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे उत्तराखंडमधील महिलांना विशेष हक्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतासारख्या मोठ्या विशाल कृषीप्रधान देशाने जागतिक बियाणे बाजारपेठेत मोठा वाटा मिळवण्यासाठी कालबद्ध लक्ष्य निश्चित केले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बियाणे सहकारी संस्था लिमिटेडची (बीबीएसएसएल) स्थापना केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरूवारी केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज गुरूवारी नवी दिल्ली येथे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडद्वारे (बीबीएसएसएल) आयोजित ‘सहकार क्षेत्राद्वारे सुधारित आणि पारंपरिक बियाणांचे उत्पादन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत.
लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन अधिनियम बुधवारी लोकसभेत दोन तृतियांशी बहुमताने मंजुर करण्यात आले. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. दरम्यान, या विधेयकाद्वारे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रारंभ होत असल्याचे प्रतिपादन केद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
हरियाणातील नूह हिंसाचारामध्ये सायबर पोलिस स्थानकावर हल्ला करणाऱ्या जबीर आणि इर्शाद या दोन आरोपींनी हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांची पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतही महापालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष प्रचाराच्या दिशेने कामाला लागण्याच्या तयारीत असून त्यातच विद्यापीठ सिनेट निवडणुकांचे पडघमदेखील वाजायला सुरुवात झाली आहे. सिनेट निवडणुकांची घोषणा झाल्यापासून युवा मतदारांना सर्वपक्षीयांकडून गोंजारण्यात येत आहे. यात सिनेटसह येत्या महापालिका निवडणुकांमध्ये युवराज आदित्य ठाकरेंना जोर का धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेज
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये फेरबदल केले आहेत. यामध्ये १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १३ राष्ट्रीय चिटणीसांचा समावेश आहे.
देशातील जनतेचा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि त्याच्या विकासाच्या राजकारणावर पूर्ण विश्वास आहे. त्याचवेळी विरोधी पक्षांची आघाडी कशासाठी आहे, हेदेखील जनता जाणून आहे. त्यामुळे २०२४ साली जनतेच्या विश्वासामुळे सलग तिसऱ्यांदा ‘रालोआ’ सत्तेत येईलच, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या सरकारची कामगिरी आणि घेतलेल्या निर्णयांमुळे देश-विदेशात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांचा भक्कम आर्थिक प्रगतीवर आधारित असलेला हा नऊ वर्षांचा कालावधी, भारताच्या सांस्कृतिक गौरवाच्या पुनरुज्जीवनाच्या रुपात इतिहासात कायम स्मरणीय असेल.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रमुखपदावर कोणीही व्यक्ती असला, तरीदेखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होणारच; अशा इशारा केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. ईडीचे विद्यमान प्रमुख संजय कुमार मिश्रा यांच्या कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. त्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने भाजपचे काही माजी मित्रपक्ष हे भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची खात्री असली, तरी मित्रपक्षांची गरज नाकारून चालणार नाही. मात्र मित्रपक्ष निवडताना संबंधित राज्यात आपला पक्ष कमकुवत राहणार नाही, याचीही कसरत भाजपला करावी लागणार आहे.
भारत २०३० पर्यंत संपूर्ण दारिद्य्रमुक्त झाला असेल, असे आकडेवारी सांगते. काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा ६० वर्षांपेक्षा अधिक काळ दिला. देशातील गरिबी दूर करण्यासाठी मात्र तिने काहीही केले नाही. गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येते आहे. देशात आता १६.४ टक्के इतकीच जनता गरीब राहिली आहे. २००५ मध्ये तब्बल ५५.१ टक्के जनता गरीब होती.
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या आधीच हिंसाचार घटना घडत असून आतापर्यंत विविध ठिकाणी २६ जण ठार झाले आहेत. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस, माकप- डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, पंचायत निवडणुका सुरु होण्याआधीच सात जणांचा मृत्यु झाला होता. तसेच, अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अफू आणि अमली पदार्थांच्या तस्करीतून सहज भरपूर पैसा मिळतो, हे लक्षात येताच, सशस्त्र कुकी गटांनीही त्यामध्ये शिरकाव केला. परिणामी, जवळपास सर्वच सशस्त्र कुकी गट आज अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी आहेत. मात्र, सध्या केंद्र सरकारने देशव्यापी अमली पदार्थ मोहीम हाती घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशातून अमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी अतिशय आग्रही आहेत. त्यामुळे देशातील अन्य राज्याप्रमाणेच मणिपूरमध्येही अमली पदार्थविरोधी मोहीम अतिशय आक्रमकपणे राबविण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे कुकी समुदायाच्या मनात
छत्रपती संभाजीनगर : राज्यात शिवसेना भाजपा युती अभंग आहे. राष्ट्रवादीची गरज आम्हाला पडेल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करून सद्याच्या राजकीय चर्चाना विराम दिला. ते म्हणाले, "मुळात शिवसेना-भाजप युती हेच जनतेचे मत आणि हाच जनतेचा कौल आहे."
भारतीय सुरक्षाबले आणि तपास संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना आर्थिक मदत रोखण्याच्या मोहिमेत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील आणखी जवळपास 200 मालमत्तांची यादी तयार केली जात असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. तपासात या संपत्तीचा दहशतवादाला केल्या जाणार्या अर्थपुरवठ्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
हैदराबाद दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृह व सहकारमंत्री Amit Shah यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याचे प्रकरण समोर आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा जात असताना अचानक तेलंगणा राष्ट्रसमिती पक्षाच्या (टिआरएस) नेत्याने आपली मोटार त्यांच्या ताफ्यासमोर लावली. हे पाहून सुरक्षा कर्मचारी सक्रिय झाले आणि त्यांनी तात्काळ वाहन घटनास्थळावरून हटवले. ताफ्यासमोर मोटार लावणाऱ्या टीआरएस नेत्याचे नाव गोसुला श्रीनिवास असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्र सरकार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या प्रयत्नांमुळे आसाममधील बहुतांशी सशस्त्र गटांनी शांतता करार केले आहेत. त्यामुळे लवकरच संपूर्ण आसाम राज्यातून ‘सशस्त्र दले विशेष अधिकार कायदा’ (आफ्स्पा) संपुष्टात आणला जाईल.
येत्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये नवे राष्ट्रीय सहकार धोरण देशासमोर मांडले जाणार आहे. नव्या सहकार धोरणामध्ये टीम अर्थात ट्रान्स्परन्सी, एम्पावरमेंट, आत्मनिर्भर आणि मॉडर्नायझेशनचा यांचा अंतर्भाव असेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी नुकतेच केले.
सीबीआयच्या न्यायालयाने सोहराबुद्दीन प्रकरणातील बावीसही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल सेक्युलर विचारवंतांच्या मनासारखा लागलेला नाही आणि म्हणून त्यांची न्यायालयावर आडून तिरंदाजी सुरू आहे. अमित शाह यांना या प्रकरणावरून बदनाम करण्याचा, या सेक्युलर मंडळींचा मनसुबा होता. ही एक संधी सेक्युलरांच्या हातून निघून गेली आहे. याचा हा हताश राग आहे.
बिहारमधील जागावाटपाने भाजपाला दिलासा!
अमित शाह यांच्या 'मातोश्री' भेटीचा उद्देश जगजाहीर असला तरी देखील सेना युतीसंबंधीच्या आपल्या भुमिकेमध्ये कसल्याही प्रकारचा बदल करणार नाही' अशी स्पष्ट प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिली आहे.