काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Read More
मला त्रास देणारे सगळे साफ झालेत, अशी टीका भाजप नेते अशोक चव्हाण यांनी विरोधकांवर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यावरून अशोक चव्हाणांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसच्या महिलाविरोधी धोरणाचा आणखी एक नमुना उघड झाल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये अमित देशमुखांनी भाजपच्या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा आर्ची असा उल्लेख केला आहे.
सत्यजित तांबे हा तर ‘ट्रेलर’ आहे. तांबे ज्यांना कुटुंबप्रमुख मानतात, तेही सत्यजित तांबेंसारखे वागले, तर काँग्रेसचे काही खरे नाही!
चाळीस वर्षापासून पायात घुंगरू व ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करत आहेत. गेली कित्येक वर्ष ३५ लोकांसह तमाशाचा फड चालवून, अनेकांचे घर चालवणाऱ्या छबूताईंवर चारचाकी वाहनाच्या शोरूम मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामावर जाण्याची वेळ आली आहे.
लाखो रुग्णांना नवसंजीवनी प्रदान करणारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रोबोटिक सर्जरी सिस्टीमची खरेदी प्रक्रिया अडीच वर्षांपासून रखडली आहे. तीनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रणालीच्या खरेदीचा मुहूर्त ठरत नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला
कोरोना कालावधीत ज्या वैद्यकिय अधिकारी यांनी कार्य केले त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, त्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत अमिन पटेल यांनी कोवीड काळात काम केलेल्या डॅाक्टरांना नियमित करण्याचा औचित्याचा मुद्दा मांडला होता.
येत्या १९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.