(Online Allowance for Polling Staff) निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन भत्ता मिळणार आहे. पूर्वी हा भत्ता मतदान केंद्र अध्यक्षांकडून मतदान संपताच रोख स्वरूपात दिला जात होता.
Read More
केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट मिळणार असून महागाई भत्त्यात(डीए) वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दिवाळीआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डीए वाढीचा फायदा केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या सुमारे ४९ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीने दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६ वरुन ५० टक्के करण्यात आला आहे.
पुन्हा मोदी एनडीए सरकार आल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. बँक कर्मचा ऱ्यांच्या डीएची मे, जून, जुलै महिन्यातील रक्कम घोषित झाली आहे. वेतनाच्या १५.९७ टक्के डीए आता बँक कर्मचाऱ्यांना मिळ णार आहे. तसे परिपत्रक (Circular) इंडियन बँकस असोसिएशन (IBA) ने काढलेले आहे. एनडीए प्रणित मोदी सरकार आल्या नंतर मे ते जुलै महिन्यात या तीन महिन्याच्या कालावधीसाठी हा डीए (Dearness Allowance) लागू असणार आहे.
सातव्या वेतन आयोग (Seven Pay Commission) ४० ते ५०% डीए (Dearness Allowance) वाढवण्याचा निर्णय घेतल्याने ग्रॅच्युटी मर्यादा २० टक्क्यांहून २५ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामध्ये ग्रॅच्युटी, भत्ते यामधील तरतूदीत बदल होण्याची शक्यता आहे. नुकताच सरकारने डीए ४ टक्क्यांनी वाढवत ५० टक्क्यांवर आणला होता.
केंद्र सरकारचे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने ६ प्रकारचे भत्ते वाढवले आहेत. २ एप्रिल २०२४ च्या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने या भत्यात वाढ केली आहे. घरभत्ता,दळणवळण,शिक्षण, आरोग्य,परिवहन व इतर भत्यात वाढ केली गेली आहे. २०१६ मधील सातव्या कमिशनच्या शिफारसीनुसार हे केंद्र सरकारच्या अत्यारीत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.
केंद्र सरकारच्या डीए व डीआरमध्ये वर्षातील दोनदा वाढ जाहीर होत असते. डीए (डिअरनेस अलाउंस) व डीआर (डिअरनेस रिलीफ)मध्ये मार्चमध्ये यंदा दिवाळी साजरी होऊ शकते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी डीए भत्यात ४ टक्के व डीआर भत्यात ५० टक्क्याने वाढण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. सीपीआय (कनज्यूमर प्राईज इंडेक्स) निर्देशांकांच्या तुलनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या भत्यात वाढ करत असते.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. तसेच, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्यात आणखी २ टक्क्यांची भर पडणार आहे.
रेल्वे बोर्डाने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट असल्याचे मानले जात आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए (Dearness Allowance) मध्ये ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याशिवाय ६ रबी पिकांसाठी एमएसपी ( Minimum Support Price) मध्ये ७ टक्के वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता दिली आहे. केंद्र शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या डीए म्हणजेच महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी ४ टक्क्यांची भर पडणार आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ होणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ झाली असली तरी याचा फायदा पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता ठरवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने राज्य शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत पगार वाढ, महागाई भत्ता आणि महागाई सवलत लवकरच मिळणार होळीनंतर सरकारद्वारे या संबंधित अधिकृत घोषणा होणार आहे. ८ मार्च पर्यंत महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्यांना घसघशीत पगारवाढ मिळणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना निर्वाह भत्ता घेतला आणि त्यामुळे सावरकर ब्रिटिशांचे हेर होते, असे विरोधक टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींना 100 रुपये निर्वाह भत्ता द्यावा, यासंबंधी ब्रिटिशांचा पत्रव्यवहार नुकताच उजेडात आला आहे. त्यानिमित्ताने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ आणि अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १७ टक्क्यांवरून २८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्रान ४ चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे
केंद्र सरकारने बुधवारी केंद्र १ कोटी १० लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता (DA) हा पाच टक्के इतका वाढणार असल्याने सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९०० ते १२ हजार ५०० इतकी वाढ होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर २०१८ पासून या भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला