भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला 'अग्निपथ योजने' अंतर्गत भारतीय लष्कराचा भाग होणार आहे. जून २०२२ मध्येच रवी किशनने ट्विट केले की, त्यांच्या मुलीने त्यांना सांगितले की तिला 'अग्निवीर' बनायचे आहे, त्यानंतर त्याने तिला प्रोत्साहन दिले. इशिता सध्या दिल्ली संचालनालयाच्या ७ गर्ल्स बटालियनचा एक भाग आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्या येथे सेवा देत आहेत. रवी किशनने ट्विट करून सांगितले होते की, ती गेली ३ वर्षे खूप मेहनत करत आहे.
Read More
‘अग्निवीर’ भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. नव्या बदलानुसार आता आधी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. २०२३-२४च्या भरतीद्वारे लष्करात भरती होऊ इच्छिणार्या उमेदवारांना हा नवा बदल लागू होईल. ‘अग्निवीर’ भरतीसाठी पहिली ऑनलाईन चाचणी एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी घेतली जाणार आहे. नव्या बदलामुळे भरतीदरम्यान होणारी गर्दी कमी होईल आणि भरतीचे व्यवस्थापन व आयोजन सोपे होईल.
अग्निपथ योजनेला देशभरातील काही ठिकाणांहुन विरोध होत आहे. आंदोलनाच्या नावाखाली रेल्वेगाड्या जाळून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केले जात आहे. आता पर्यंत आंदोलकांमुळे रेल्वेला सुमारे ३० कोटी रुपयांना फटका बसला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अग्निपथ योजनेतून वेगळ्या विचारांची आर्मी बनवली जाऊ शकते तसेच देश फॅसिजमाकडे जाऊ शकतो असे विधान, शनिवार १८ जून २०२२ रोजी एका मुलाखती दरम्यान केले आहे.
केंद्र सरकारने तिन्ही सशस्त्र दलांच्या सहकार्याने अग्निवीर योजनेचे अनावरण केल्यावर, ‘युवक’ आंदोलकांचा जमाव रस्त्यावर उतरला आणि ‘निदर्शने’ आणि मोर्च्यांच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड सुरु केली आहे. तथाकथित सशस्त्र दलाच्या इच्छुकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, गाड्यांना आग लावली आणि त्याचा परिणाम विविध भारतीय राज्यांमधील जनजीवनावर होऊन ते ठप्प झाले आहे.