(Devendra Fadnavis) “आपली जी महायुती आहे, ती गती आणि प्रगतीची आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे,” अशा शब्दात महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पेण येथे स्पष्ट केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आ. रविशेठ पाटील यांना निवडून द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
Read More
पेण : ( Ravisheth Patil ) कोकणातील पुणे म्हणून पेण शहराची ओळख आहे. शिक्षण, सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, आर्थिक चळवळी या सर्वांचे जिल्ह्यातील प्रमुख केंद्र पेण आहे. भाजपचे आ. रवीशेठ पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघात दुसर्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. पेण तालुक्यातील प्रचारादरम्यान दै. ‘मुंबई तरुण भारत’ प्रतिनिधीशी संवाद साधला.
पेण विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राविशेठ पाटील २३ हजार ५९२ मतांनी आघाडीवर असून जवळपास विजय निश्चित झाला आहे.
पेण-पाली विधानसभा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, भाजपचे रविशेठ पाटील यांनी पेण-पाली विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या जोरावर राजकीय मैदानात आघाडी घेतली आहे.