Bangladeshis भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, बंगळुरूप्रमाणेच आता घुसखोरी करणारे बांगलादेशी निमशहरीकरणातही घुसखोरी करत आहेत. अशातच आता केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात २ बांगलादेशी अवैध घुसखोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पोलिसांना त्यांना २० मार्च रोजी आपल्या ताब्यात घेतले आहे.
Read More
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
मुंबई : सैफ अली खानवर ( Saif Ali Khan ) हल्ला केलेल्या आरोपीला दि. १८ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेतले. यावर माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांचे आभार मानले. आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास आले असून यावर पोलिस अधिक चौकशी करणार आहेत.
नागपूर : “मुंबईत अवैधरित्या राहणार्या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार (डी-पोर्ट) करणार, ही सरकारची भूमिका आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadanvis ) यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी दिली.
(Mangal prabhat lodha)'आय.टी.आय' मुंबईला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी या संस्थेचे नामकरण करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचा गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती व नागपूर येथे शुभारंभ करण्यात आला.
बांगलादेशी घुसखोरांना सीमेवरून बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यासाठी राज्यातील दलाल प्रति व्यक्ती १०,००० ते २०,००० रुपये आकारत आहेत, असा आरोप ह्निवट्रेप अचिक नॅशनल मूव्हमेंट (HANM) ने केला आहे. या सामाजिक संघटनेने याबाबत मेघालयचे डीजीपी आई नोंगरांग यांना याबाबत माहिती दिली.
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने सुसज्ज कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात आहे. हे विशेष कॅमेरे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सुरक्षा वाढवण्यासाठी आणि घुसखोरांना रोखण्यासाठी वापरण्यात येत आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कॅमेरा आणि फेशियल रेकग्निशन डिव्हाईससह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमेवर पाळत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरी, गुन्हेगारी आणि इतर अवैध कामांना आळा बसेल.
बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींवर झारखंड न्यायालयाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना हद्दपार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मागच्या एक वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि दोन गटात तणावाचे वातावरण आहे. त्यातचं आता बनावट आधार आणि मतदार ओळखपत्र बनवून परदेशी घुसखोरांना भारतात आश्रय देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांचे विशेष पथक त्यांचा माग काढत असून, अलीकडेच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बनावट भारतीय ओळख घेऊन भारतात आरामदायी जीवन जगणाऱ्या एका बांगलादेशी घुसखोराला गुजरात राज्यातून पकडण्यात आले आहे. मिनार हेमायत असे आरोपीचे नाव आहे. मिनार हेमायतला सुरत एसओजीने अटक केली आहे. तो शुभो सुनील दास नावाच्या बनावट हिंदू ओळखीसह राहत होता आणि त्याच नावाची सर्व बनावट कागदपत्रेही त्याच्याकडे सापडली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे तो कतारची राजधानी दोहा येथे दोन वर्षांपासून काम करत होता.
भारतात ४०,००० हून अधिक रोहिंग्या घुसखोर बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतचं दर महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्या घुसखोर भारतात दाखल होत आहेत. या रोहिंग्या घुसखोरांना देशातील डझनहून अधिक राज्यांमध्ये स्थायिक केले जात आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचाही हात आहे. एनआयएच्या पथकाने नुकताच त्याचा मास्टरमाइंड जलील मियाँला अटक केली आहे. बहुतेक रोहिंग्या म्यानमारच्या राखीन राज्यातून आलेले आहेत.
भारताचा शेजारी देश नेपाळमधून लँड जिहादचे प्रकरण समोर आले आहे. मोहतारी जिल्ह्यात हिंदू संघटनांनी घुसखोरांवर प्राचीन मंदिर ताब्यात घेण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. मंदिराचे नाव लक्ष्मीनारायण मठ असून आजूबाजूचे लोक मठियानी मठ या नावाने ओळखतात. नेपाळमधील सर्वात मोठा मठ असे म्हटले जाणारे हे मंदिर शेकडो वर्षे जुने आहे.
भारतात बेकायदेशिररित्या घुसखोरी करणाऱ्या २० बांगलादेशींना मुंबईतील न्यायालयाने आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास त्यांना १६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणे आणि बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनवल्याबद्दल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. शुक्रवार, दि. २४ मे २०२४ शिक्षेची घोषणा करण्यात आली.
अल कायदाशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना सोमवार, दि. १३ मे २०२४ आसाममधील गुवाहाटी येथील रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली आहे. हे लोक भारतीय उपखंडातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बहार मिया (३०) आणि विरल मिया (४०) अशी त्यांची नावे आहेत.
"देश विरोधी प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय आमच्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. देशाच्या विकासासाठी, दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना बाहेर काढू. येथील नागरिकांना, मराठी व्यासायिकांना, भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळायला हवेत.
केरळमध्ये ५० हजारांहून अधिक परदेशी घुसखोर बनावट आधार कार्डच्या मदतीने राहत आहेत. हे घुसखोर बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका येथून आले आहेत. देश सोडून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय गुन्हेगारही बनावट आधार कार्डची मदत घेत आहेत. अशी माहिती मिलिटरी इंटेलिजन्सच्या अहवालातून समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात डॉक्टर माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. प्रचारादरम्यान त्यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. अलीकडेच त्यांनी मीडियासमोर दावा केला होता की, ओवेसी बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांना दोन बेडरूमचे फ्लॅट देत आहेत. हे मुस्लिम कोठून आले आहेत, ते पाकिस्तानी आहेत की बांगलादेशी आहेत, हे माहीत नाही, पण सत्य बाहेर येईल.
बेकायदेशीरपणे देशात घुसलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना भारतात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा कोणताही मूलभूत अधिकार नाही, असे केंद्रातील मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या लोकांना निर्वासितांचा दर्जा देण्यासाठी न्यायव्यवस्था वेगळी श्रेणी तयार करू शकत नाही, कारण ही संसद आणि कार्यकारिणीच्या विधायी आणि धोरणात्मक क्षेत्रात प्रवेश असेल.
बांगलादेशी दरोडेखोर मेहराज याला दिल्ली पोलिसांनी एका चकमकीत अटक केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हा दरोडेखोर पोलिसांना हवा होता. गेल्या वर्षी त्याने दिल्लीत मोठा दरोडा टाकला होता. या बांगलादेशी दरोडेखोरासोबत आणखी एका गुन्हेगारालाही अटक करण्यात आली आहे.
एनआयएने बंगळुरूमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या लोकांनी पद्धतशीरपणे घुसखोरांसाठी शहरात छावणी उभारली होती. या घुसखोरांनी बेंगळुरूच्या दोन वेगवेगळ्या भागात कचरा प्रक्रिया युनिट उभारले होते. अनेक महिन्यांपासून एनआयएची कारवाई सुरू होती. या टोळीने बांगलादेशींना भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश दिला आणि त्यांच्यासाठी आधारकार्डसारखी सर्व कागदपत्रे बनावट पद्धतीने बनवली, असे एनआयएने म्हटले आहे.
हल्दवानी हिंसाचारामागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या भारतात प्रतिबंधीत असलेल्या संघटनेचा आणि बांगलादेशी घुसखोरांचा हात असू शकतो अशाी भिती भाजपचे राज्यसभा खासदार ब्रिजलाल यांनी व्यक्त केली आहे. ब्रिजलाल यांनी पुर्वी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणुनही काम पाहीले आहे.
“आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत,” असे विधान बांगलादेशचे रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादिर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशाला मिळणारी परदेशी मदत आधीच कमी झाली आहे, मग अशा लोकांना आधार कसा मिळणार?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या देशाचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी आधार आणि मतदार कार्डसारखी बनावट कागदपत्रे बनवत आहेत. यासाठी त्यांनी मृत झालेल्या व्यक्तींची ओळख घेण्यास सुरुवात केली आहे.
"या भागात अनेक बांगलादेशी राहतात. जे बांगलादेशातून इथे आले आहेत आणि मतदार यादीत नाव नोंदवताना अडचणी येत आहेत त्यांनी झाकीर भाई यांच्याशी संपर्क साधावा. अशा सर्वांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा. हे काम जलदगतीने करण्यात यावे." असे धक्कादायक विधान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या रत्ना बिस्वास यांनी केले आहे.
“पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही कट्टरवादी संघटना आपल्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी आधारकार्ड बनवत आहे,
आगामी काळात अशा ओळख पटवलेल्या, अटकेतील रोहिंग्या घुसखोरांची संख्या अधिकाधिक वाढत जाईल, त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाईल व देशाची चांगल्याप्रकारे साफसफाई करण्यात येईल, असे वाटते. त्यासाठी राष्ट्रहित सर्वोपरी मानणार्या केंद्र सरकारचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.