हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा आज ७ मार्च रोजी ६९ वा वाढदिवस. अनुपम मुळचे जरी हिमाचल प्रदेशचे असले तरी त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दिसाठी मुंबई गाठली आणि आपली जागा निर्माण केली. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुपम खेर (Anupam Kher) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यासह दिग्दर्शकाची भूमिका देखील निभावली होती. आता पुन्हा एकदा अनुपम खेर प्रेक्षकांना २२ वर्षांनी दिग्दर्शक म्हणून दिसणार असून याबद्दलची घोषणा त्यांनी स्वत:च त्यांच्
Read More
जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या त्यांच्या चित्रपटांमधुनच ते किती परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती येतेच. दरम्यान, यावेळी विवेक अग्निहोत्री इंडिगो एअरलाईन्सवर भयंकर चिडले असून त्यांनी ट्विट करत इंडिगोच्या विमानाने प्रवास करताना झालेल्या त्रासाबद्दल एअरलाईन्सला खडे बोल सुनावले आहेत.
देशातील नगन्य समजल्या जाणाऱ्या अडणींना रुपेरी पडद्यावर मांडत प्रेक्षकांना मनोरंजनातून समाजाचा खरा आरसा दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांतून आजवर केले आहे. 'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी', 'द वॅक्सिन वॉर' असे चित्रपट प्रेक्षकांना देणारे विवेक अग्निहोत्री पौराणिक चित्रपटांकडे वळले आहेत. विवेक अग्निहोत्री 'महाभारता’वर आधारित चित्रपट करणार असून तीन भागांमध्ये प्रेक्षकांना हा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांतुन समाजातील दाहक वास्तव जगासमोर मांडणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच त्यांना ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यानंतर लागलीच त्यांनी त्यांच्या ‘महाभारता’वर आधारित आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पल्लवी जोशीला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. या चित्रपटात जोशीने राधिका मेनन या पत्रकाराची भूमिका साकारली आहे, जी काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे.
“देशात ‘द काश्मिर फाईल्स’ सारखे चित्रपट प्रसिद्ध होत आहेत, हे त्रासदायक आहे”, असे स्पष्ट मत अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी नुकतेच एखा मुलाखतीत मांडले. 'मॅन वुमन मॅन वुमन' या लघुपटाचे दिग्दर्शन नसरुद्दीन शाह यांनी केले असून तब्बल १७ वर्षांनी शाह दिग्दर्शन क्षेत्रात परतले आहेत. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी ‘गदर २’ आणि ‘द केरला स्टोरी’ हे चित्रपट कसे चालू शकले? असा प्रश्न देखील उपस्थित केला.
चित्रपट हिट होत नसले की, मग ‘लाईमलाईट’मध्ये राहण्याचा खटाटोप सुरू होतो. त्यासाठी वादग्रस्त मुद्द्यांना हात घालायचा आणि नकारात्मक का होईना प्रसिद्धी मिळवायची, असा काहींचा शिरस्ता. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते नसरुद्दीन शाह यांचे नाव यामध्ये तर अग्रक्रमावर. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चित्रपटांची, वेबसीरिजची पोळी भाजून त्यांना उदरनिर्वाह.
चंदेरी दुनियेसाठी महत्वपुर्ण असणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची २४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. ज्यात मराठी चित्रपट आणि दिग्दर्शकांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार पटकावला. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींच्या आनंदाला पारावार उरला नसताना, दुसरीकडे मात्र, चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांना अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली आहे
आधी 'द काश्मीर फाईल्स' आणि आता 'द काश्मिर फाईल्स अनरिपोर्टेड' या चर्चेत आलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अजून एक मोठी घोषणा केली आहे. अग्निहोत्रींनी काही दिवसांपूर्वी 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटाबाबत सांगितले होते. या चित्रपटाचा ट्रेलर आज अग्निहोत्री यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत प्रदर्शित केला असून त्यांनी हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहितीही दिली आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटात काश्मीर मधील हिंदुवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या वेब मालिकेतून ज्या घटना समोर आल्या नाहीत त्या पीडीतांच्याच तोंडून दाखवण्याचा मानस विवेक अग्निहोत्री यांचा आहे. दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांनी सरन्यायाधीश चंद्रचुड यांना ‘द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड’ या माहितीपटाच्या आधारे काश्मिरी हिंदुचा नरसंहाराचा खटला उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
'द काश्मिर फाईल्स' चित्रपटामुळे स्वत:ची स्वतंत्र ओळख तयार केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायमच त्यांच्या रखड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी मणिपूर प्रकरणावरुन एका नेटकऱ्याला सुनावले होते. त्यांचे ते वक्तव्य चर्चेच असतानाच आता त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी आदिपुरुषमधील कलाकार प्रभास, सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा दिग्दर्शक किंवा लेखक अशाप्रकारचे चित्रपट तयार करतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे संशोधन करत
मणिपूरमधील हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत असताना समाज माध्यमावर आता या विषयामुळे एक वेगळाच भडका उडाला आहे. द कश्मीर फाईल्स या चित्रपटातून समाजाचे ह्रदयद्रावक सत्य घटना मांडल्यानंतर एका नेटकऱ्याने दिग्दर्शक विविक अग्निहोत्री यांना मणिपूर घटनेवर ‘द मणिपूर फाइल्स’ चित्रपट काढण्याबाबत एका नेटकऱ्याने बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना थेट आव्हान दिले आहे.
बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने संपुर्ण चित्रपटसृष्टी आणि जनजीवन हादरवून टाकले होते. या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि करोना काळानंतर उत्तम कामगिरी करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आणखी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
२०२३ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'द केरला स्टोरी' ला ओटीटीसाठी खरेदीदार मिळत नाही. मात्र याउलट यावर्षी प्रदर्शित झालेले 'भिड' आणि 'अफवाह' सारखे प्रोपगंडा चित्रपट सुपर फ्लॉप होऊनही लगेचच ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. पण अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या 'द केरला स्टोरी'ने जगभरात ३०० कोटींचजी कमाई करून ही ओटीटीवर खरेदीदार मिळत नाही. दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने तर या चित्रपटावर बंदी घातली होती.
सत्य घटनांवर आधारित 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या यशानंतर , 'अजमेर ९२ ' हा चित्रपट १४ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, जमियत उलेमा-ए-हिंदने 'अजमेर ९२ ' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदच्या म्हणण्यानुसार दर्गा अजमेर शरीफची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळेच या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी.
'द काश्मीर फाइल्स' आणि 'कार्तिकेय २' चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी तेलुगू चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेते राम चरण यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्या दोघांनी मिळून नवीन चित्रपट तयार करण्याचे ठरवले आहे. तो चित्रपट भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असेल. या चित्रपटाचे नाव 'द इंडिया हाऊस' असे असेल, ज्यामध्ये निखिल सिद्धार्थ आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाच्या टायटल अनाऊंसमेंटचा व्हिडीओही रिलीज झाला आहे, ज्याला खूप पसंती दिली जात आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ किंवा ‘द केरला स्टोरी’चा उद्देश लोकांच्या मनात विष कालवणे आणि समाजात अशांतता निर्माण करणे हा नाही, तर समाजात जागृती निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला भीषण वास्तवाची जाणीव करून देणे आणि त्यानुसार वेळीच पावले उचलणे हा आहे.
'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. आता देखील पुन्हा एकदा विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या ' द केरला स्टोरी' चित्रपटाबद्दल अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे. या चित्रपटाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच ते म्हणाले की, हा चित्रपट त्याच्या विषयामुळे रिलीज झाल्यापासून वादात सापडला असला तरी लोकांचा मोठा पाठिंबा चित्रपटाला मिळत आहे. तसेच हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तो करमुक्त करण्यात आला आहे.
त्यावेळी मी किशोरवयीन होते. माझे प्रेम एका पाकिस्तानी मुस्लीम व्यक्तीसोबत होते. पण, त्याने प्रेमाच्या नावाने विविध शहरांमध्ये नेऊन माझ्यावर अनन्वित शारीरिक अत्याचार केले. त्याच्यापासून कसे वाचायचे? मी लहान होते. मग पोलिसांनीच माझ्या पालकांना सांगितले की, राहते शहर सोडून जा. आम्ही आमचे शहर सोडले. पण, ते प्रेमाच्या नावाने केलेला छळ आणि अत्याचार विसरायला खूप त्रास झाला.” ब्रिटनची इंग्रज नागरिक डॉ. एला हिल हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. ब्रिटनच्या समाजअभ्यासकांच्या मते, २०१९ साली इंग्लंडमध्ये १९ हजार अल्पवयीन
परंतु, या चित्रपटाने तब्बल तीन दशकांहून अधिक काळ लपवल्या गेलेल्या सत्याचा भांडाफोड केला. त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपट प्रदर्शनाला विरोध झाला. परंतु, समस्त हिंदूंनी हा विरोध मोडीत काढत चित्रपट ‘सुपरडुपर हिट’ केला. हीच खरी मुफ्ती आणि त्यांच्यासारख्या हिंदुत्वद्वेष्ट्यांची खरी पोटदुखी!...
इस्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि संहितालेखक नदाव लापिड याने गोव्याच्या ‘इफ्फी’ चित्रपट सोहळ्यात ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रपोगंडा आणि अश्लील चित्रपट ठरवत हिंदूविरोधी पूर्वग्रहदूषित मानसिकतेतूनच ही टिप्पणी केली. त्यामुळे लापिडसारख्या अशा या हिंदूद्वेष्ट्या गोचिडींना वेळीच ठेचण्याची आज नितांत गरज आहे.
कित्येक वर्षांपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकणार नाही, असा विक्रम ‘द काश्मीर फाईल्स’ने केला. त्या ‘द काश्मीर फाईल्स’च्या कलाकार आणि निर्मात्यांकडे दुर्लक्ष करणार्या हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित पुरस्कार समारंभाला परिपूर्ण कसे मानता येईल? ‘फिल्मफेअर’ने तेच केले आणि म्हणूनच त्या पुरस्कार सोहळ्याला एखाद्या नौटंकीपेक्षा दुसरे काही म्हणता येणार नाही.
काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या खऱ्या कहाण्या जगासमोर आणण्याचे धाडस दाखवणारे 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना फिल्मफेअर फेस्टिवलला आमंत्रणच नाकारण्याचा खोडसाळपणा, आयोजकांनी केला आहे
‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणण्याच्या मागे लागले आहेत.
द काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा समावेश आता देशातील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांमध्ये होत आहे .
जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना आजही आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. आजही काही प्रमाणात हा नरसंहार असाच सुरु आहे.
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे
आज बनावट चिनी कंपन्यांना कायद्याचे, नियमांचे उल्लंघन करून मदत करणार्या ४०० ‘सीए-सीएस’विरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले. पण, वर उल्लेख केलेल्या पांढरपेशा नोकरदार, संस्था, संघटनांचीही संशयास्पद चिनी संबंधांबाबत चौकशी व्हायला पाहिजे. कारण, जोपर्यंत अस्तनीतले निखारे देशासमोर येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून चीन भारतात आपला प्रभाव पसरवत राहील.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांवर, हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले हे सर्वस्वी दुर्देवीच. अशाप्रकारे काश्मीरमध्ये ‘टार्गेटेड किलिंग’च्या नावाखाली झालेल्या हिंदूंच्या निर्घृण हत्येची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आणि या घटनांशी संबंधित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळायला प्रारंभही केला.
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचा बहुचर्चित चित्रपटांच्या यादीत समावेश झाला असून या चित्रपटाचा सीक्वेलही येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिली.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे ज्यांच्या रक्तात होते आणि ज्यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्षातच गेले असे प्राध्यापक भीम सिंह. उधमपूर जिल्ह्यातील रामनगर येथील भूगट्यान येथे जन्मलेले प्रा. भीम सिंह यांच्या कुटुंबाची हजारो एकर जमीन १९५१ मध्ये जम्मू-काश्मीरचे तत्कालीन पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांच्या सरकारने घेतली होती आणि त्याची भरपाईही दिली नाही. या घटनेच्या दोन वर्षांनंतर, १९५३ मध्ये, भीम सिंग विद्यार्थी असताना, त्यांनी शाळेच्या दौऱ्यावर असलेल्या शेख अब्दुल्ला यांच्यावर जेवणाचे ताट मारलेहोते. त्यासाठी त्यांना तुरु
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ घरी म्हणजे काश्मीर मध्ये परत येण्याचे आवाहन केले आहे
‘काश्मिरी पंडितांचा कसाई’ म्हणून ओळखल्या जाणार्या बिट्टा कराटेविरोधातील याचिका श्रीनगर न्यायालयाने नुकतीच स्वीकारली. त्यावर सुनावणी होऊन बिट्टा कराटेला शिक्षाही होईल, पण काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या म्होरक्याला शिक्षा देण्यासाठी-न्यायालयात आणण्यासाठी लागलेला तब्बल ३१ वर्षांपेक्षा अधिकचा काळ त्रासदायक आणि लाजीरवाणाच म्हटला पाहिजे.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षारंभ आणि हिंदू संघटनाचा मंत्र देणार्या संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती. त्याच औचित्याने आद्य सरसंघचालकांनी पाहिलेल्या हिंदू संघटनाच्या, हिंदुत्व जागरणाच्या संबंधातील जागतिक पटलावरील सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...गेल्या एक-दीड महिन्यांत अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशियाने युक्रेनवर आक्रमण केले.
द काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली आहे. त्यामुळे त्यावेळी दहशतवादी बिट्टा कराटेच्या हातून झालेल्या हत्येविरोधात तब्ब्ल ३१ वर्षांनी न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे
शरद पवारांना बंधुप्रेमाची, एकतेची चिंता कधीपासून सतावू लागली? कारण, त्यांची हयात एका समाजाला दुसर्या समाजासमोर उभे करण्यातच गेली. हिंदूंमध्ये एकी होऊ नये म्हणून जातीयवादाला, एका विशिष्ट समाजावर आघात करणार्या संघटनांना, इतिहास विद्रुप करणार्या नवइतिहासकारांना, जाती-जातीत महापुरुषांची वाटणी करणार्या फुटपाड्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम त्यांनी केले
शरदराव पवार यांना ‘द काश्मीर फाईल्स’ने जे सत्य प्रकाशात आणले, ते आवडलेले नाही. सत्य असेच दाहक असते. ते पचवायला आणि स्वीकारायला प्रचंड धाडस लागते.
‘भारतमाता सेवा प्रतिष्ठान’ने भांडुपमध्ये तर विश्व हिंदू परिषद आणि महाराज अग्रसेन सेवा संस्थेने घाटकोपरमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे विनामूल्य प्रक्षेपण नुकतेच केले होते. त्यानिमित्ताने ‘द काश्मीर फाईल्स’ आणि प्रेक्षक यांच्यातले नेमके भावनिक बंध टिपण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात काही...
सत्य कितीही लपवून, दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही शेवटी विजय सत्याचाच होतो आणि याचा प्रत्यय नुकताच आला तो न्यूझीलंडमध्ये. देशभरात काही पिलावळींनी ‘द काश्मीर फाईल्स’ला विरोध दर्शवला, तसाच तो न्यूझीलंडमध्येही झाला. मात्र, सगळ्या अडचणींवर मात करत अखेर हा चित्रपट दि. २८ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये प्रदर्शित करण्यास तेथील सरकारने परवानगी दिली आहे. इतकंच नव्हे, तर जवळपास २० शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच भारतात काही गटांनी विरोध सुरू करत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे द काश्मीर फाइल्स चित्रपट बघायला आलेल्या एका दाम्पत्याला समाजमाध्यमावर कथित पोस्ट टाकल्याबद्दल शिवसैनिकांकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे
दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य
द काश्मीर फाइल्स' चे निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये जेनोसाईड म्युझियम बनवण्याची विनंती केली त्याला चौहान यांनी तात्काळ होकार दिला
‘द काश्मीर फाईल्स’मध्ये दाखवलेल्या घटना नेमक्या कशा घडल्या असतील, त्याची छोटीशी झलक आपल्याला बांगलादेशातील हिंदूंवर, हिंदू मंदिरांवर आज, काल आणि परवा सातत्याने होत आलेल्या इस्लामी जिहाद्यांच्या हल्ल्यांतून सहज समजू शकते. पण तेथील हिंदूंसाठी ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी, ना संयुक्त राष्ट्रांनी तोंड उघडले.
"संपूर्ण देश एका विचारानं चालला असताना अशातच द काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट येण्याने समाजात दुरावा निर्माण होऊ शकतो. सामाजिक वातावरणही दुषित होऊ शकते. त्यामुळे असे चित्रपट तयार करणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण नसताना हा विषय भाजपने काढणं हे योग्य नाही.", असे अजब वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी सांगताना केले आहे. रविवारी (दि. २० मार्च) यासंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
या चित्रपटाचे चांगलेपण त्याच्या विचारक्षमतेत आहे. तो अस्वस्थ करतो आणि विचाराला प्रवृत्त करतो. तो आपल्याला इतिहासात घेऊन जातो. इतिहासातील चुका समोर आणतो आणि आपल्याला इशारा देतो की, याच चुका जर उद्या सर्व भारतात घडल्या, तर काय होईल? याचा विचार करा! हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे, असे मला वाटले.
‘पृथ्वीवरील स्वर्ग’ मानल्या जाणर्या काश्मीरमधील सत्य काही औरच होते, हे दाखवणारा, मन सुन्न करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट. १९९० साली घडलेली, मन विषण्ण करणारी घटना-आपलेच घर, आपलेच राज्य सोडून जायला भाग पाडणारा दहशतवाद, स्त्रियांवर झालेले बलात्कार, खुलेआम झालेल्या कत्तली बघून प्रत्येकाचे मन हेलावते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही काश्मिरी पंडितांच्या पलायनामागील कटू वास्तव मांडण्याचा प्रयत्न चित्रपटांच्या माध्यमातून झाला नाही, हे दुर्दैवच! पण, हेच धाडस केले ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे
'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच हा चित्रपट एक मोठा चर्चेचा विषयदेखील बनला आहे. १९७५ नंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे की जो कमी बजेटमध्ये बनूनही बॉक्सऑफिसवर १०० करोडच्या वर कमाई करत आहे असे ट्रेड अॅनलिस्टचे म्हणणे आहे.
प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही बघितला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या चित्रपटास विरोध करणाऱ्या आणि हे एक षडयंत्र आहे असे म्हणणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांवर विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली