अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
Read More
अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून पाहणी
ठाणे : मुंबई महापालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर ( Sanjay Kelkar ) यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी. पावसाळा कालावधीत मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव नागरिकांना आला पाहिजे. त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील याची खातरजमा करा. रस्त्यांची सर्व कामे दिनांक १० जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ते वाहतूकयोग्य असावेत. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा योग्य ठिकाणी पुनर्पृष्ठीकरण करावे. पुनर्पृष्ठीकरण करताना सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी बाळगावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. रस्त्यांच्या डागडुजीची कामे दिनांक ७ जूनपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरु आहेत. विविध प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामांना गती आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली.ही संयुक्त बैठक बुधवार, दि. १५ मे रोजी पार पडली.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला आता लोकसहभागाची जोड मिळणार आहे. अर्थसंकल्प तयार करताना त्यात ठाणेकरांच्या शहराविषयीच्या मतांचा अंतर्भाव व्हावा, यासाठी अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 'माझ्या नजरेतून बदलते ठाणे' या उपक्रमाची आखणी केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. वाहतुक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या दोन मार्गिकांखालील रस्ते,दुभाजक, पदपथांच्या कामाचा आढावा आयुक्त बांगर यांनी नुकताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिका अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. ठाणे शहरात मेट्रोच्या माध्यमातून मेट्रो सेवा पुरविण्या सोबतच संपूर्ण शहरात मेट्रो मार्गालग
राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून ठाण्यात सुरू असलेली रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने पीएम स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांना सर्व बँकांनी विना विलंब कर्ज वितरण करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडव प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीकडुन शासनाला सादर केलेल्या अहवालात कुणावरही ठपका न ठेवल्याने आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, रुग्णसेवेत होत असलेल्या हेळसांड प्रकरणी आ. केळकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी याप्रकरणी निश्चितच कारवाई होणार असल्याचा निर्वाळा दिल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.
भंडार्ली डंपिंगचा वाद शमण्याची चिन्हे आहेत. मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी भंडार्ली येथे वाहने रोखून धरली होती. दरम्यान, आ. पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुख्यालयात भेट घेऊन डंपिंग बंद करण्याचा आग्रह धरला. त्यावर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्याचे आ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
'ठाणे' शहर भावल्याची प्रतिक्रिया जपानी विद्यार्थी व त्यांच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली. शुक्रवारी ठाणे महापालिकेत भेट देऊन जपानी विद्यार्थ्यानी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्याप्रसारक मंडळाचे डाँ. महेश बेडेकर उपस्थित होते.
ठाण्यातील कळवा रुग्णालयातील मृत्यु रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर सरसावले असुन त्यांनी संपुर्ण रुग्णालय प्रशासनालाच 'डोस' पाजला आहे.रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करुन सर्वोच्च रुग्ण्सेवा देण्यास प्राधान्य देण्याचे बजावुन हलगर्जी झाल्यास संबधित विभागाच्या प्रमुखालाच जबाबदार ठरवण्यात येणार असल्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.त्याचप्रमाणे कळवा रुग्णालयात प्रशासकिय बदल केले असुन अधिष्ठाता व डॉक्टरांवर प्रशासकिय कामकाजाचा कोणताही बोजा नसणार आहे.ही जबाबदारी कार्यालयीन अधिक्षक व लिपिकावर सोप
एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ‘ठाणे’ विकासाच्या केंद्रस्थानी आले. त्यामुळे शहरातील प्रत्येक घडामोड अथवा समस्या मुख्यमंत्र्यांशी जोडली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे ‘ठाणे’ बदलण्याचा चंग ठाणे महापालिकेने बांधला. त्याची फलश्रुती दिसत आहे. यासंदर्भात दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ठामपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संवाद साधून घेतलेला ठाणे शहराचा आढावा...
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेली मृत्युंची घटना ही अत्यंत दुर्दैवी व क्लेशकारक आहे.तेव्हा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग प्लाझा रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासोबतच कळवा रुग्णालयासाठी अॅक्शन प्लॅन बनवावा. अशा सुचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना सोमवारी निवेदन देऊन केल्या. याप्रसंगी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अत्रे यांच्या जीवनपटाच्या लिखाणाच्या निमित्ताने बोजेवार यांनी अत्रे यांच्या समग्र साहित्याचा, व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास केला आहे. ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’तील हे सातवे पुष्प असून हे ‘आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व आणि विचार’, याविषयावरील हे व्याख्यान शनिवार, १२ ऑ
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये पुरेशा शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असून पटसंख्या अर्ध्यावर आली आहे. ठाणे महापालिकेने सुमारे २२५ शिक्षकांच्या भरतीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी. असे साकडे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना घातले आहेत. मंगळवारी म्हस्के यांनी यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले.
अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे पंपिंग केंद्र येथे नदीतून येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर झाडांच्या फांद्या व गाळ आहे. त्याचा पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, पिसे आणि टेमघर येथील वीज पुरवठा खंडित होणे, विद्युत जनित्रात तांत्रिक बिघाड होणे या घटनांमुळे शहरास आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या ०१ ऑगस्टपासून पावसाळ्याचा जोर कमी होईपर्यंत शहरात तात्पुरत्या स्वरूपात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार,
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवती असलेले सिमेंट काँक्रिट निष्कासित करण्याची मोहिम पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक घेवून महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांवर सर्व्हे करुन झाडांभोवती असलेल्या कठड्याचे डि-काँक्रिटायझेशन करुन तसा प्रभाग समितीनिहाय अहवाल ३१ जुलैपर्यत सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
ठाणे : जलशक्ती मंत्रालयाच्याअंतर्गत असलेल्या केंद्रीय भूजल मंडळाच्या शास्त्रज्ञांनी ठाणे जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती, जमिनीखालील खडक, भूजलाची स्थिती, जलधर नकाशा व भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची समावेश असलेला अहवाल तयार केला असून हा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्याकडे सोपविला आहे. जिल्ह्यात भूजल पातळी घटल्याने भूजल व्यवस्थापनाशी संबंधित जलसंपदा, पाटबंधारे, जलसंधारण, कृषि आदी विभागांना या अहवालात सुचविलेल्या उपाययोजनांवर काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ठाणे : पावसाळा सुरु झाला तरी ठाण्यात रस्त्याची कामे सुरु असुन रस्त्यांचे तांत्रिक परिक्षण आयआयटीकडुन केले जात आहे. असे असले तरी पहिल्याच पावसाच्या दणक्याने काही रस्त्यांवर खड्डे पडल्याचे समोर आले. याची दखल घेत ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कुणाही प्राधिकरणाचे असोत रस्त्यांवरील खड्डे १२ तासात बुजवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असुन खडड्यापुरते ठीगळ न लावता खड्डे भरणी चौरसाकृती करावी.अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.दरम्यान, ०१ जुलैनंतर शहरात रस्त्याचे कोणतेही काम सुरू राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन
ठाणे : नालेसफाईत 'हातसफाई' करणाऱ्या एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतरही शहरातील कळवा,मुंब्रा,वागळे इस्टेट भागातील बहुतांश नाल्यांमध्ये अद्याप काहीच सफाई झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव दै.मुंबई तरुण भारतने मांडले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार या ठेकेदारांना साडेआठ लाखांचा दंड ठोठावला आहे.
ठाणे : पावसाळ्यात होर्डिंग्ज, झाडे उन्मळून पडणे तसेच झाडाच्या फांद्या पडून जीवीत वा वित्तहानी होवून नुकसान होणार नाही या दृष्टीने शहरातील सर्व होर्डिग्ज व होर्डिग्ज टॉवरचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, असे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच शहरातील अनधिकृत मेटल स्ट्रक्चर निष्कसित करावीत, शहरातील होर्डिंग्ज पडून जर दुर्घटना घडली तर संबंधित होर्डिंग्ज कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंग त
ठाणे : ठाणे शहरात अतीधोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारती नागरिकांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी तातडीने रिकाम्या कराव्यात. त्या इमारती रिकाम्या करताना महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अरेरावी करू नये, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
ठाणे : अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून शुक्रवारी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाळकूम अग्निशमन केंद्रात शहीद स्तंभाला अभिवादन केले.
कळवा येथील जुन्या पुलावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी कळवा खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या नवीन खाडी पुलाची साकेतच्या दिशेकडील मार्गिका शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. ही पाचवी मार्गिका सुरू झाल्याने साकेत मार्गावर होणारी वाहतूककोंडी टळणार असून जुन्या पुलावरील वाहतुकीचा भारही कमी होणार आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील कळवा पूल हा अरुंद असल्याने दररोज या मार्गावर वाहतूककोंडी होत होती. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाणे मनपाने जुन्या पुलालगत नवा खाडी पूल निर्माण केला आहे. या पुलावरील ‘सिडको’ येथून कळव्याच्या दिशे
मुंबई आणि ठाणे ही दोन्ही जुळी शहरे आहेत.तेव्हा,डबल इंजिनच्या सरकारचा ठाण्यालाही लाभ मिळणार असुन मुंबईप्रमाणेच ठाण्याची ओळख तयार करायची आहे.असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असुन जनतेचा पैसा जनतेच्या सोईसुविधां करीता वापरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.दरम्यान,बदलत्या ठाण्याच्या आड येणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही.असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट देणारी पाणीपट्टी अभय योजना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहीर केली आहे. व्यावसायिक नळसंयोजन धारकांना ही योजना लागु नाही.