नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. कामठीचे मतदार विजयी करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे ( Mahayuti ) सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Read More
अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असून या घटनेतील सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यावर परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. त्यांच्या या आरोपाला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो हा आरोप हास्यास्पद आहे. विरोधकांना उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचेही दरेकरांनी सुनावले आहे. ते पत्र
Justice Chandival यांच्याकडून Anil Deshmukh यांची पोलखोल!
सचिन वाझे आणि अनिल देशमुखांकडून तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असा खुलासा निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोग स्थापन करण्यात आला होता. परंतू, या आयोगाचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आला नाही. दरम्यान, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी १०० कोटी वसूली प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाच्या अहवालाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
काटोलमध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. काटोल विधानसभेचे उमेदवार चरणसिंग ठाकुर यांच्या प्रचारार्थ आयोजित नरखेड येथील सभेत ते बोलत होते. बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, अकोल्यातील मुर्तिजापूर आणि हिंगणा येथे त्यांच्या सभा पार पडल्या.
Mansukh Hiren ची झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी शरद पवार गटाची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली. यात काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांना तिकीट देण्यात आले आहे.
( MahaVikas Aghadi ) एखाद्या राज्याचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी जसा मुख्यमंत्री सक्षम लागतो, तसाच गृहमंत्रीही. देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील अशी काही नावे त्यात घेता येतील. महाविकास आघाडीचा सत्ताकाळ मात्र या महत्त्वाच्या पदांना गालबोट लावणारा ठरला. या सरकारचा गृहमंत्री पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचे ‘टार्गेट’ देतो आणि मुख्यमंत्री मान डोलावतात, यापेक्षा वाईट अनुभव महाराष्ट्राने कधी घेतला नाही. या प्रकरणात तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतरही निष्पापतेची टिमकी मिरवण्याची संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे मत
महिन्याचे १०० कोटी वसुल केले म्हणून आमचे काका १३ महिने आत गेले, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांवर केली आहे. अनिल देशमुखांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
अनिल देशमुखांचा सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. देवेंद्र फडणवीस मला अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
चार वर्षांपूर्वीची घटना कुणीही उकरुन काढली नाही. ते तुमचे कर्म आहे, अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी ४ वर्षांपुर्वीची घटना उकरुण काढत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने सीबीआय गुन्हा दाखल केली आहे, अशी टीका अनिल देशमुखांनी केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले.
मंत्री गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता गिरीष महाजनांनी अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
पापं करायची आणि काही झाले की, आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे हा महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केली आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात ट्विट करत निशाणा साधला. त्यानंतर आता यावर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोलमध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा पार पडली. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेची माहिती देत महिला सुरक्षेवरही भाष्य केलं.
नागपूरमधील कुख्यात गुंड गौतम भटकर याच्यासोबत खासदार संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्टी झाडल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भातील फोटोपुरावे त्यांनी सोशल मीडियावर सादर केले आहेत.
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी माध्यमांमध्ये या बातम्या पाहिल्या असून गेले दोन दिवस नागपूरमध्ये असल्याने मला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सचिन वाझेला पुन्हा नोकरीत कुणी घेतलं, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपानंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण ताजं असतानाच आता तुरुंगात असलेले बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी १०० कोटी रुपये वसूलीप्रकरणात अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांनी याबाबत फडणवीसांना एक पत्रही लिहिल्याचं सांगितलंय. सचिन वाझेंच्या या गौप्यस्फोटानंतर आता अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जातीये. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर नेमके कोणते आरोप केलेत? देवेंद्र फडणवीसांना लिहिल
अनिल देशमुखांचं डोकं फिरलं आहे, अशी टीका समीत कदम यांनी केली आहे. ईडीच्या कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी समीत कदम यांच्या माध्यमातून मला निरोप पाठवल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले होते. यावर आता समीत कदमांनी प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह करप्ट आहे. ते फक्त फॅशनसाठी पेनड्राईव्ह वापरतात, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच त्या पेनड्राईव्हमध्ये काही असल्यास ते जनतेसमोर उघड करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निवडणूक जवळ आल्याने श्याम मानव यांना जाग आली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा. त्यानंतर तुम्ही ईडीच्या प्रकरणातून सुटाल, असा दबाव माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकण्यात आल्याचा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी अनिल देशमुखांनी प्रयत्न केले, असा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. अनिल देशमुखांवर ईडीच्या प्रकरणातून सुटण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना अडकवणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याचा दबाव आणण्यात आला, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. यावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
एक गोष्ट लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे. ईडीच्या आरोपांमधून सुटका मिळवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रांवर सही करण्याचा अनिल देशमुखांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. यावर आता फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर' अशा घोषणा देत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दि. २४ डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल? असा प्रश्न अनेकांना पडला. त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात उघड उघड बंड पुकारतील.
नवाब मलिक आजारपणाचा खोटा आव आणुन कोर्टाची फसवणुक करत आहेत असा आरोप मोहीत कंभोज यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात आपल्या 'एक्स' अकांउंटवर विडीओ पोस्ट केला आहे. येथुन सुरु झाला नवाब मियॉंचा फर्जीवाडा अस शिर्षक त्यांनी या विडीओला दिले आहे.
दि.१ डिसेंबर २०२३ राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्धार रॅली कर्जत येथे आयोजित करण्यात आली. निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, हे ह्या शिबिराचे घोषवाक्य होते. शिबिराच्या घोषवाक्याप्रमाणे नवपर्वाचा एल्गार अजित पवारांनी मंचावरून केलेला पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार डेंग्यु झाल्यामुळे माध्यमांपासून लांब होते. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कर्जतच्या जाहिर सभेत त्यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांनी कर्जतच्या शिबिरात शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने पुणे येथे आयोजित सोशल मीडिया मीट अप कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी अजित पवार गटावर टीका केली. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि भाजपच्या बाजूला जाऊन बसले. ईडीच्या भीतीमुळे झाला राजकीय भूकंप झाला. असं शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचे एकेकाळचे पीए असलेले दिलीप वळसे पाटील असो की, राजकारणात पवारांसोबत सावली सारखे राहणारे प्रफुल्ल पटेल. शरद पवारांना सोडून अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्यांची यादी मोठी आहे. पण काही नेते असेही आहेत. ज्यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आपण अशाच ५ नेत्यांची माहिती घेणार आहोत. ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. काय आहे या नेत्यांच राजकारण शरद पवार यांच्याविषयी असलेली निष्ठा की आणखी काही! हेचं आपण या लेखातून पाहणार आहोत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा आज निर्णायक दिवस असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मेळावे बोलवण्यात आले आहेत. यात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला अवघ्या १२ ते १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या बैठकीला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला. पण अजितदादासोबत गेलेले दोन आमदार आता शरद पवारांच्या गटात परतले आहेत.
शरद पवारांविरुद्ध बंड करत अजित पवार फडणवीस- शिंदे सरकारमध्ये दि.२ जुलैला सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर दि. ५ जुलै रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाने बैठकीचं आयोजन केले होते. त्या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ पसरवणारी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधी ३० जून रोजी अजित पवारांना पक्षाचा अध्यक्ष करावे , अशी याचिका अजित पवार गटाकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.
'लोक माझे सांगाती' या पुस्तकात ठाकरेंबाबत लिहिलं ते दोषारोप करण्यासाठी नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यंत्रणांचा गैरवापर कसा राज्यात होतोय हे दिसतयं. अत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या १० नेत्यांची चौकशी झाली. अनिल देशमुखांवर अतिरंजित आरोप झाले. देशमुखांच्या चौकशीतुन काहीही निष्पन्न झाले नाही. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवाल झाला. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांचा नामोल्लेख न करता त्यांना फटकारलं. यावर, मी फक्त शरद पवारांचं ऐकतो. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असा पलटवार राऊतांनी केला आहे.
महाविकास आघाडीची नागपूरात दि.१६ एप्रिल रोजी दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. दरम्यान,अजित पवार या सभेत बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. अशातच अजित पवारांनी माध्यमांसमोर भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
असंगाची गत उद्धव ठाकरेंना इतकी भोवली की त्यांचे मुख्यमंत्री पदही गेले आणि पक्षही! आता ते काय बरळतात आणि त्याचा काय अर्थ असतो, हे गंभीरपणे घ्यायचे नसते. पण, परवा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून केल्यामुळे त्यांचा समाचार घेणे क्रमप्राप्त आहे.
घाऊक बाजारात कांद्याचे दर पडल्याने विरोधकांनी तोच मुद्दा पुढे करत मंगळवारी विधिमंडळात जोरदार गोंधळ घातला. कांद्यावरुन विरोधकांची रडारड सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवेदन करत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने विरोधक शांत झाले.
राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. सर्वप्रथम अनिल देशमुख यांनी पत्र लिहून मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं असून, मतदारसंघातील मागणीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. तर, छगन भुजबळ यांनी बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सीबीआयने 6 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयने 12 जुलै रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. देशमुख यांचा जामीन अर्जावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निकाल राखून ठेवला होता. अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी EDने कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती.
बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्या संगनमताने उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेले ट्वीन टॉवर्स रविवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात आले
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या खळबळजनक ट्वीटमुळे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत, भ्रष्टाचारी नेत्यांना गजाआड करण्याचे सत्र सुरु झाले असतानाच एक नवीनच माहिती समोर आली आहे. १९२६ साली उभारण्यात आलेल्या आर्थर रोड जेलमध्ये नवीन ९ व्हीआयपी बराक तयार करण्यात आल्या आहेत
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याने सकाळचा भोंगा शांत झाला, असे म्हणत राऊतांच्या विरोधकांनी आनंद व्यक्त केलाय. कारण राऊत जरा फाटक्या तोंडचेच आहेत, मागे एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना जाहीरपणे शिव्या घातल्या होत्या, त्यावेळी एका वृत्तपत्राच्या संपादकाला हे शोभत का ? असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांचा समाचार घेतला होता. दुसरीकडे जेलमध्ये राऊतांच्या सोबतीला नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन बडे नेते आहेत, त्यामुळे सध्या महाराष्ट्राला एक गहन प्रश्न पडल
कसा आहे देशमुख,मलिक आणि राऊतांचा जेलमधील दिनक्रम
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.
सध्या देशभरात ईडीच्या धसक्याने भाल्याभाल्यांची झोप उडवलीये. महाराष्ट्रात तर सत्तेच्या अहंकाराचा दर्प चढलेल्या अनेक वाचाळवीरांना या ईडीने गुढघे टेकायला लावलेत. आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात पी चिदंबरम यांनी पीएमएलए कायद्यात बदल करून तो लागू केला आणि आज त्याच कायद्याने कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराची लक्तरे देशभर टांगून ठेवलीत. पण असं कोणत कारण आहे ज्यामुळे ईडीच्या जाळ्यात सापडलेला माणूस सहजा सहजी सुटत नाही?