अलाहाबादच्या (आताचे प्रयागराज) ‘आनंदभवन’ या भव्य आणि राजेशाही वास्तूमध्ये सुरू असलेल्या पार्टीमध्ये आपल्या आईचा म्हणजेच कमला नेहरू यांचा आपल्या आत्याकडून-विजयालक्ष्मी पंडित यांच्याकडून झालेला अपमान लहानगी इंदिरा पाहते. त्याची तक्रार घेऊन राजकारणात व्यस्त असलेल्या आपल्या वडिलांकडे म्हणजे पं. नेहरू यांच्याकडे जाते. तेथे काही दाद मिळत नाही. मग ती जाते आपले आजोबा मोतीलाल नेहरू यांच्याकडे. तिथेही दाद मिळत नाहीच. तेथे आजोबा मोतीलाल नेहरू यांच्याकडून राजकारणाचे आणि सत्ता म्हणजे काय, ती मिळाल्यास कशी राबवावी, याचे
Read More
नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) शुक्रवारी धुक्याची दाट चादर ( Fog in Delhi ) पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊन रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. डॉ. सिंग यांनी अर्थमंत्री, विरोधी पक्षनेते यांसारख्या पदांबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद देखील भुषवले होते.
दुर्गाबाई भागवत या एखाद्या कडाडून कोसळणार्या विजेसारख्या इंदिराजींवर तुटून पडल्या होत्या आणि बंदी आलेल्या एका संघटनेने अतिशय शांतपणे, धीराने, अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते तुरुंगात असूनसुद्धा, नेटाने असे काही काम चालू ठेवले, की 19 महिन्यांनंतर का होईना, आणीबाणी उठवावी लागली. ‘क्या हार में, क्या जीत में, किंचित नही भयभीत मैं,’ हे त्या संघटनेच्या नेत्यांनी जगून दाखवले. त्या पे्ररणेतून अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या घरातल्या महिलांनी अचाट कामे करून दाखवली. संविधान आणि लोकशाहीवरचा जीवघेणा हल्
रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यांचा युनेस्कोच्या (UNESCO News) 'मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर'मध्ये समावेश करण्यात आला आहे. हा समावेश भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो देशाच्या समृद्ध साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक वारशाची पुष्टी करतो. जागतिक सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये हे एक पाऊल पुढे आहे, जे आपल्या सामायिक मानवतेला आकार देणाऱ्या वैविध्यपूर्ण कथा आणि कलात्मक अभिव्यक्ती ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
राहुल गांधी यांचे सल्लागार आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी 'इनहेरिटन्स टॅक्स'चा ( Inheritance Tax ) मुद्दा उपस्थित केला. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन देशातील जनतेकडुन त्यांनी कमावलेली संपत्ती हिसकावुन घेण्याचा काँग्रेसचा मानस आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस वारसा कर देशात लागु करणार आहे का असाही प्रश्न विचारला जात आहे.
"काँग्रेसने केवळ कच्छतीवु नाही तर भारताच्या अखंडतेमध्ये अनेक वेळा फूट पाडली आहे. आगामी निवडणुकीत भारतातील देशभक्त जनता अशा सरकारला निवडून देतील जे केवळ कच्छतीवु नाही तर भारत मातेची संपूर्ण हिसकावलेली भूमी मुक्त करून आपला राष्ट्रीय संकल्प पूर्ण करेल.", असे मत विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन व्यक्त केले. (VHP on Congress)
कॅनेडियन पंजाबी गायक शुभनीत सिंह एका हुडीमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्र असलेली हुडी त्याने आपल्या एका कार्यक्रमात दाखवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॅनडामधील खलिस्तानी समर्थकांचा हैदोस सुरूच आहे. आता तर कहर म्हणजे कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात काढण्यात आलेल्या खलिस्तान्यांच्या परेडमधील एका चित्ररथामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येचा प्रसंग या चित्ररथातून दाखविण्यात आला. या परेडमध्ये खलिस्तानी ध्वज फडकविण्यात आले, तर ’श्री दरबार साहिबवरील हल्ल्याचा बदला’ असे लिहिलेले पोस्टरदेखील परेडमध्ये झळकले. ‘१९८४ कधीही विसरू नका. शीख नरसंहार,’ असेही काही पोस्टरवर लिहिण्यात आले होते.
नुकतीच २२व्या विधी आयोगाने देशद्रोह कायदा कायम ठेवण्यासह, कायद्यातील शिक्षेची तरतूद किमान सात वर्षे तुरूंगवासासह जन्मठेपेपर्यंत वाढविण्याची शिफारस केली. त्यामुळे विधी आयोगानेही या कायद्याच्या वैधतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले असून, हा कायदा रद्द करण्याची मागणी करणार्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.
नवी दिल्ली : सीबीआयने काँग्रेस नेता जगदीश टायटलरविरोधात १९८४ सालच्या शिखविरोधी दंगलप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ साली दिल्ली येथे शिख समुदायाविरोधात दंगली झाल्या होत्या. या दंगली भडकविण्यामागे काँग्रेस नेता जगदीश टायटलर याचा प्रमुख समावेश होता, त्यासाठी त्यांच्याविरोधात विविध खटले दाखल आहेत. या दंगलीतील पुल बंगश गुरुद्वारा अग्निकांड प्रकरणात सीबीआयने त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी सध्या पाळीव हत्तींचा अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. संभाजी, महानायक, पानिपत अशा अनेक गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्यानंतर पुन्हा एकदा शिवकाल उभा करण्याचे विश्वास पाटील ठरवत आहेत. शिवकाल निर्माण करावा म्हणजे त्यांनी ज्या प्राण्यांसोबत काम केले होते त्या प्राण्यांना समजून घेणे व त्यांच्या अभ्यास करणे गरजेचे आहे असे पाटील म्हणतात.
नवी दिल्ली : पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना जनाधार असल्याने त्यांना धक्के पचविता आले. मात्र, सध्याच्या काँग्रेस नेतृत्वास अजिबात जनाधार नाही, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
जे.पी.नड्डा यांची भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाची मुदत जून, 2024 पर्यंत वाढविण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नुकताच घेण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या घटनेत अध्यक्षपदाची मुदत 3 वर्षाची निश्चित करण्यात आली आहे. नड्डा यांची मुदत संपल्यानंतर दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत 2024 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत नड्डा यांनीच पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा ठराव संमत करण्यात आला. नड्डा यांची सामाजिक जीवनातील कारकीर्द विद्यार्थी परिषदेचा क
धनुष्यबाणावर सुनावणीला सुरुवात झाली असताना, दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद वकीलांनी केला. सर्वप्रथम शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाकडे आमदार, खासदारांचे बहुमत असल्याचा युक्तीवाद केला. धनुष्यबाण चिन्हासाठी बहुमत असल्याचे ते यावेळी म्हणाले. तर, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस असल्याचा युक्तीवाद केला. यावेळी दोन्ही बाजूंनी १९७२ सालच्या सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोग या प्रकरणाचा दाखला वारंवार दिला गेला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधी केलेल्या वक्तव्याचा समाचार भाजप, मनसे कडून घेण्यात आला. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राहुल गांधी यांना वक्तव्य टाळता आलं असतं तर बरं झालं असतं. इतिहासामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी प्लस मायनस निघतंच." असे छगन भुजबळ म्हणाले.
भारताचे वय दहा हजार वर्षे आहे. माझे व्यक्तिगत वय एक दिवस ते 100 वर्षे असे असू शकते, पण राष्ट्रीय वय दहा हजार वर्षांचे आहे. हे जाणणे म्हणजे ‘स्व’ची ओळख होय. या दहा हजार वर्षांच्या असलेल्या माझी सांस्कृतिक ओळख आहे, तत्त्वज्ञानात्मक ओळख आहे, वैज्ञानिक ओळख आहे, राज्यशास्त्रीय ओळख आहे आणि ती फार श्रेष्ठ आहे.
यशस्वी राजकीय नेता होण्यासाठी राजकीय प्रतिभा, राजकीय निर्णयक्षमता, प्रचंड जनसंपर्क, नेत्याची प्रामाणिकता, सचोटी, कार्यकर्त्यांना मायेने जवळ करण्याची वृत्ती, भक्कम राजकीय वैचारिक अधिष्ठान असावे लागते. अशा क्षमता आपल्याकडे आहेत का, ते दाखविण्याची संधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेली आहे. या संधीचे ते सोने करतात की माती करतात, हे 2024ची निवडणूक सांगेल.तोपर्यंत आपण वाट बघूया.
गेहलोत विरुद्ध पायलट संघर्षही असाच खुर्चीसाठी उफाळून येणारा. तात्पर्य हेच की, जेव्हा काँग्रेसकडे थोडेसे का होईना, पण संख्याबळ असते, तेव्हा ही मंडळी आपापसात भांडूनच आपल्याच माणसांचा पराभव करतात, हाच काँग्रेसचा इतिहास.
नवी दिल्ली : देशभर कॉंग्रेसची वाताहत सुरु असताना गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या जेष्ठनेत्याने कॉंग्रेसला राम राम ठोकून पक्षाचा त्याग केला. माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रसकडून आपल्यावर होत असलेल्या टीकेचा समाचार घेत, "राहुल गांधींच्या नेतृत्वासाठी आम्ही प्रयत्न केले, पण ते ऐकतचं नाहीत. त्यांना पक्षात रसच नाही, ते एका जागी बसतच नाहीत!", असे वक्तव्य आजाद यांनी केले.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या जुन्याच गोष्टींकडे परत फिरायला लागली आहे. त्यामध्ये सर्वात वरची कडी केली आहे ती शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी
कंगना रणौतचा लूक बघून चाहत्यांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला, त्यांनंतर काही दिवसातच अभिनेता अनुपम खेर यांचा लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. त्यातच महत्त्वाची भूमिका असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोण साकरणार हा प्रश्न प्रेक्षक विचारात होते, याचेही उत्तर आता मिळाले आहे. ही भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकरणार आहे.
आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या एकूण १ लाख ३० हजार सत्याग्रहींपैकी एकूण १ लाखांहून अधिक जण हे संघ स्वयंसेवक होते. शाह कमिशनतर्फे आपला अहवाल प्रकाशित करण्यात आला. शाह कमिशनतर्फे प्रसारमाध्यमांवर लादण्यात आलेल्या सेन्सॉरशिपवर ताशेरे ओढले होते. ऑल इंडिया रेडिओतर्फे इंदिरा गांधींचे भाषण प्रसारित करण्याचे आदेश दिले होते. बहुतांश लोकांच्या तक्रारीत रा.स्व.संघाशी संबधित असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आणीबाणीच्या काळाला आज एकूण ४७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या तसेच लोकशाही प्रधान देशा
चंदीगढ पंजाबचे की हरियाणाचे, हा वाद ८० च्या दशकापासून जरा शांत झाला होता. मात्र, आता २०२२ सालात तो पुन्हा एकदा उफाळून आला आहे. चंदीगढमधील ६० टक्के कर्मचारी हे पंजाब, तर ४० टक्के कर्मचारी हे हरियाणा सरकारच्या नियमांतर्गत कार्यरत होते. मात्र, आता केंद्र सरकारने या नियमांमध्ये बदल केला असून, चंदीगढमध्ये काम करणार्या कर्मचार्यांसाठी केंद्राचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून दि. १ एप्रिलपासून सुमारे २२ हजार कर्मचारी केंद्र सरकारच्या नियमांतर्गत आले आहेत. त्यामुळे या निर्णयास प
जगभरच्या लोकशाही देशांना ‘आफ्स्पा’ किंवा ‘पॅट्रीयट’सारखे कायदे करावे लागतात आणि प्रसंगी ते निष्ठूरपणे राबवावेही लागतात. अशा कायद्यांच्या अंमलबजावणी दरम्यान अनेकदा बळाचा वापर होतो, हे जरी मान्य असले तरी हा कायदा काढून घ्या, हा कायदा रद्द करा वगैरे मागण्या समर्थनीय ठरत नाहीत.
आजपासून ७२ वर्षांपूर्वी दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण आपले संविधान स्वीकारले. शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर स्वतंत्र झालेल्या नवजात देशाने स्वत:साठी तयार केलेले लोकतांत्रिक, प्रजासत्ताक संविधान म्हणून या संविधानाची सर्वत्र व्यापक चर्चा झाली. अद्याप होत असते. या सात दशकांच्या काळात आपल्या संविधानात एकंदर १०४ दुरुस्त्या केल्या गेल्या. येणार्या काळात संविधानात दुरुस्ती करण्याची गरज वेळोवेळी निर्माण होऊ शकते, ही संभाव्यता घटनाकारांनी सुरुवातीलाच लक्षात घेतली होती व त्यादृष्टीने घटनादुरुस्तीची कार्यप
काँग्रेसचे ‘राष्ट्रीय’ म्हणविले जाणारे नेते राहुल गांधी यांनी संघ-भाजप हे काँग्रेसची विचारसरणी नष्ट करत असल्याचे म्हटले असल्याचे नुकतेच वाचनात आले. तसा हा वरवरचा विचार वाटू शकतो. पण, नुकत्याच झालेल्या नेहरु जयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांचे विधान मात्र नक्कीच विचार करण्याजोगे आहे.
शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष आता ‘पडकी हवेली’ असेल, तर कन्हैयासारखे ‘पोकळ वासे’ या हवेलीला वाचवू शकत नाहीत. मात्र, हवेली आणखी चार वर्षांनी कोसळणार असेल, तर ती दोन वर्षांतच कशी कोसळेल, याची तजवीज मात्र माजी कॉम्रेड करू शकतात.
भारताच्या राजकीय क्षितिजावर दीनदयाळ उपाध्याय यांच्या रूपाने एक नवा तारा उदयास आला होता. पण, दुर्दैवाने अवघ्या ४३ दिवसांतच उपाध्याय यांची हत्या झाली. इतिहासाच्या पानात आजही ती एक गूढ बनून राहिली आहे. आज पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या एकूणच घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा हा लेख...
'कलम ३५२'चा वापर करून इंदिरा गांधींनी 'अंतर्गत आणीबाणी' लागू केली आणि सर्व महत्त्वाच्या राजकीय विरोधकांना अटक केली होती. हे सर्व प्रकरण दि. १२ जून, १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुरू झाले. म्हणूनच आज सुमारे ४६ वर्षांनीसुद्धा मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांना 'त्या' खटल्याची आणि त्या निर्णयाची आठवण काढावीशी वाटली. आज यानिमित्ताने त्या खटल्याची उजळणी करणे गरजेचे आहे.
संजय राऊत ‘मातोश्री’तल्या मालकाऐवजी ‘सिल्व्हर ओक’मधल्या मालकाला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची भाषा करत आहेत. यावरून या माणसाचा अतिशयोक्ती करत फक्त खुशामत करण्याचाच उद्योग असल्याचे वाटते.
टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्या निःस्पृहतेचे हे किस्सेच फक्त वाचायचे आणि अनुभवायचे काय, तर निःस्पृहतेच्या, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे संपादक, शेटजींनी डोळे वटारले की अख्खा अग्रलेखसुद्धा मागे घेतात!
आंतरराष्ट्रीय नाणे निधी कर्ज द्यायला तयार होती. पण, त्यांच्या काही अटी होत्या. त्या अटी मान्य करणं हा राजकीय स्वरूपाचा निर्णय होता. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी पंतप्रधानपदी निवड झालेल्या नरसिंह रावांचा आदेश मागितला. नरसिंह रावांचा शपथविधी व्हायचा होता. नरसिंह रावांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना हिरवा कंदील दाखवला आणि भारतात ऐतिहासिक खा. उ. जा. (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणाला सुरुवात झाली.
राहुल गांधींनी आपल्या आजीने लादलेली आणीबाणी चुकीची असल्याचे म्हटले. मात्र, आणीबाणी अत्यावश्यक असल्याचे सांगण्यासाठी, आणीबाणीला योग्य ठरवण्यासाठी गांधी घराण्याची स्तुती करण्यात दंग झालेल्या, बौद्धिक कसरती केलेल्या राज्यसभा खासदार कुमार केतकरांचे काय? ते कधी आणीबाणीच्या चुकीची कबुली देणार नि त्याबद्दल माफी मागणार?
मिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलाईवी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना रानौत आता देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका ज्या चित्रपटात साकारणार आहे, तो बायोपिक नसणार आहे, अशी माहिती कंगनाने दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात लोकशाही कुठेय असा सवाल केला ? देशात लोकशाही नाहीच मग विरोधी पक्षातील खासदार राष्ट्रपतींना भेटून निवेदन देऊन सरकारवर टीका कसा करू शकला ?
नातेवाईकांचा प्रशासनावर गंभीर आरोप
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अयोध्येत राममंदिराच्या बांधकामापूर्वी जमिनीत ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार आहे, अशी अफवा उठली होती. मात्र, विश्वस्त मंडळाकडून याविषयीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे. राममंदिराच्या बांधकामापूर्वी कोणतीही ‘टाईम कॅप्सूल’ ठेवली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द इंदिरा गांधींनी ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे घुसडले. त्याविरोधात नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
राजकीय मतभेद असले तरीही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मोदी सरकारविषयी सर्व पक्षांना विश्वास वाटतो, हेदेखील अधोरेखित झाले आहे. मात्र, काँग्रेसने या प्रश्नावर जे काही राजकारण केले ते पाहता देशातील सर्वांत जुन्या आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या पक्षाचा बेजबाबदारपणा संपणार कधी, हा प्रश्न निर्माण होतो.
आपण कितीही कर्तृत्वहीन असलो, तरीही आपल्या कर्तबगार पूर्वजांच्या पुण्याईवर अनेक पिढ्या नुसती चैन करणे, त्याचा भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी मारणे इतकाच त्या तनख्याचा अर्थ होता. इंदिराजींनी त्यावरच हल्ला केला. अध्यादेश काढून तनखे रद्द केले आणि ते विधेयक राज्यसभेत नापास झाल्यावर पुन्हा आणून तो निर्णय अंमलात आणला होता. बाकीची आजी आठवते, तर अशा वडिलार्जित पुण्याईवर सर्वात आधी कोणी कुर्हाड चालवली, ते प्रियांका-राहुलना का आठवत नाही?
गृहमंत्री अमित शाह यांनी भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसी नेत्यांक़डून होणाऱ्या विधानांचा समाचार घेतला. या मुद्द्यावर आम्ही संसदेत चर्चा करण्यासाठी तयार आहोत, तिथे प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ, १९६२ ते आत्तापर्यंत झालेल्या घटनाक्रमांवर दोन हात क
अमित शाह यांचा काँग्रेसवर घणाघात
काँग्रेसवर निशाणा साधताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, '४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एका कुटुंबाच्या सत्तेच्या लोभामुळे देशात आणीबाणी लागू झाली.
आणीबाणीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची काँग्रेसवर जोरदार टीका
दि. २५ जून, १९७५ या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली आणि 1947 पासून देशात असलेली लोकशाही जणू स्थगित केली आणि जनतेची विचार, लेखन, अभिव्यक्ती, भाषण, मुद्रण, अशी सर्व प्रकारची घटनादत्त स्वातंत्र्ये हिरावून घेऊन, आपल्या विरोधकांना तुरूंगात डांबून जवळजवळ दोन वर्षे पर्यंत सर्व देशाचाच एक मोठा तुरूंग बनविला होता. या घटनेला आता ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आणीबाणीच्या काळातील संघबंदी आणि स्वयंसेवकांच्या मनोधैर्याच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
जेलमध्ये अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या घरची मंडळी भेटण्यात येत असत. परंतु, एक औरंगाबादचे स्वयंसेवक कार्यकर्ते होते, त्यांना जवळजवळ एक वर्ष होत आले. परंतु, त्यांच्या घरून त्यांना भेटण्यास कोणीच आले नव्हते. शेटे सरांनी त्या कार्यकर्त्यास सहज विचारले, “वर्षभर तुम्हाला कोणीच भेटण्यास का नाही आले?” त्यावेळी त्या औरंगाबादच्या स्वयंसेवकाने सांगितलेले उत्तर हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांनी सांगितले की, “घरून नाशिकला येण्यासाठी एका माणसास एका बाजूने २५ रुपये भाडे लागते. येऊन जाऊन ५० रुपये आणि पत्नीला यायचे तर अजून
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या भाळी आणीबाणीच्या रूपाने काळा कलंक लागला होता. विचार, आचार यांचे स्वातंत्र्य नागरिकांच्या जीवनातून हद्दपार करण्यात आले. तेही केवळ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक अहंकार जोपासणे कामी आणि सत्तालोलुपपनासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी अनुभवलेली आणीबाणीची दाहकता आणि नाशिकमध्ये आणीबाणी विरोधी झालेले कार्य, याची आज आणीबाणीला ४५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रमेशदादा गायधनी यांनी आणीबाणी काळातील व्यक्त केलेले अनुभव...
आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा ५ ते १० पुरुषांची नसबंदी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी जोरदार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर हल्ला चढवला.