२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
Read More
Tahawwur Rana काँग्रेसी कार्यकाळात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताविरोधात युद्धच पुकारले होते. तथापि, काँग्रेसने आपले अपयश झाकण्यासाठी दहशतवादी घटनांचा वापर राजकीय स्वार्थासाठी करण्याचे मोठे पाप केले. यातूनच, ‘भगवा दहशतवाद्या’चे कुभांडही रचले गेले. मात्र, 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या तहव्वूर राणाला भारतात आणून, केंद्र सरकारने काँग्रेसी मुखवटा फाडला आहे.
(Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने अम
(Mumbai Police) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र वाहिले.