( Sharad Pawar group join BJP in Thane ) भाजपाचा स्थापना दिन व श्री राम नवमीचा पवित्र योग साधत ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका छाया राव, मधुर राव, सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी, घोडबंदर भागातील लॉंड्री असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया आदींनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.
Read More
( BJP meeting thane ) भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खा. अरुण सिंह व राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी ठाण्यात येऊन भाजपच्या संघटन पर्वाबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीत आतापर्यंत झालेल्या संघटनात्मक निवडणुकीच्या कामांबरोबरच पक्षाच्या पुढील कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून २५० द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई म.न.पा मार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम दि.२० नोव्हे. ते ०२ डिसे. या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे, परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे.