आज मोतीबागेचा जो कायापालट झाला आहे, तो काळानुरूप आवश्यक असल्याचे नमूद करताना या वास्तू अगोदरपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे आणि मोतीबागेची जडणघडण बघणारे श्रीधरपंत फडके यांनी मोतीबाग संघाकडे येण्यापूर्वी पुण्यात संघाची कार्यालये म्हणजे कार्यकर्त्यांची घरे होती, तेथूनच संघाचे काम चालायचे असे सांगितले.
Read More
संघ स्वयंसेवकाच्या दृष्टीने पुणे शहरातील मोतीबागेची वास्तू ही एक अत्यंत सन्मानाची जागा होती आणि आहे. मी शिवाजीनगर गावठाण भागात जुन्या काळापासून कार्यरत होतो. या मोतीबागेच्या वास्तूशी माझ्या अनेक आठवणी निगडित आहेत. त्यापैकी दोन आठवणी आज इथे सांगाव्याशा वाटतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लाभलेल्या कर्मयोगी पू. सरसंघचालकांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या आणि अगणित कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हिंदू राष्ट्र एकसंघ ठेवण्यामध्ये अमूल्य वाटा आहे.पू. डॉक्टरजी म्हणायचे की, “शरीर बलवान होण्यासाठी प्रतिदिन नियमितपणे व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे देशव्यापी प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी राष्ट्रदेवतेची व्यापक प्रमाणावर ‘दैनंदिन उपासना’ करावी लागते.”याच दैनंदिन उपासनेसाठी, संघाची दोन ठिकाणं आहेत पहिलं म्हणजे दैनंदिन शाखा आणि दुसरे ठिकाण म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची मोत
मोतीबाग संघ कार्यालयाच्या वास्तूत ‘समरसता मंचा’चे सर्व महत्त्वाचे निर्णय झाले. सेवाकार्य करणार्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, सामाजिक परिषदा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील अभ्यासवर्ग, पहिली समरसता यात्रा, सामाजिक समरसता पुरस्कार, समरसतेचे पंचक करण्याचा निर्णय, असे सर्व निर्णय मोतीबाग कार्यालयात झाले. म्हणून मोतीबाग कार्यालयाला ‘समरसता विचारांची जन्मभूमी’ असे म्हटले पाहिजे.
देशाला ‘परम वैभव’ मिळवून देण्यासाठी तेथे राहणार्या किंवा येऊन जाणार्या प्रत्येक व्यक्तीने पुण्यातील मोतीबाग संघकार्यालयाच्या जागेला मंत्राचे सामर्थ्य आणून दिले आहे.
पुण्यात तळजाईला २०१६ मध्ये विराट स्वरुपात झालेल्या ‘शिवक्ती संगम’चे नियोजन, पूर्वतयारी आणि सूत्रसंचालन हे मोतीबागेत कार्यालय स्थापन झाले होते. त्याच्या व्यवस्थापनात कैलास सोनटक्के यांच्यासह सह-महाव्यवस्थापक राहिलेल्या रवींद्र शिंगणापूरकर यांच्या आठवणी...
मोतीबाग हे नुसते कार्यालय नाही. मोतीबाग हे ‘संस्कार’ देणारे केंद्र आहे. वास्तू उत्तम असणे, तिथे सोयीसुविधा असणे यापेक्षाही त्या ठिकाणाहून जी निर्मिती होते आहे- संघकार्याची निर्मिती, समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मिती - ती अधिक महत्त्वाची आहे. भविष्यकाळात मोतीबागेच्या माध्यमातून अशाच प्रकारे काम सुरू राहील. कारण, मनुष्य निर्मितीचे आणि चारित्र्य निर्मितीचे काम ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे...
मोतीबाग वास्तूने आजतागायत जी स्थित्यंतरे अनुभवली, त्याचा मागोवा घेताना या काळातील मोतीबागेच्या वाटचालीचे महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेले वसंत दत्तात्रेय प्रसादे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना मोतीबागेच्या आठवणींना दिलेेला हा उजाळा...
ही दि. १ फेब्रुवारी, १९८६ची आठवण आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीला वादग्रस्त-विवादास्पद ठरवून डिसेंबर १९४९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिदीर्र्त कुलूप ठोकण्यात आले होते आणि सकल हिंदू समाजाला, रामभक्तांना कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरूनच रामललाचे दर्शन घ्यावे लागत होते. दरवाजाबाहेर एक छोटासा चौथरा-कट्टा बांधला होता व त्या कट्ट्यावर रामभक्त फुले, फळे अर्पण करून समाधान मानत होते. तब्बल ३५ वर्षांनंतर दि. १ फेब्रुवारी, १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने निर्णय दिला आणि अत्यंत अनपेक्षितपणे तो निर्णय हि
'मी मोतीबाग’.... ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ओळखतो आहेस ना? आता बघ ना, मी किती बदलले आहे... आधीचा तो वाडा, त्या खोल्या खोल्या, पत्र्याची शेड, नंतरच्या काळात दुमजली बांधकाम आणि आज तर विच्चारू नको. भली मोठी उंच इमारत!
मोतीबागेसंबंधी एक छोटासा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे, अर्थात फार जुनी गोष्ट आहे सुमारे ७० वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी मी दहावीत होतो आणि आमच्या शाखेवर निरोप आला. आपण प्रांतासाठी एक कार्यालय घेतलेले आहे. सरदार बिवलकर यांचा वाडा, तर त्यासाठी निधी जमा करायचा आहे. तेव्हा प्रत्येकाने पावती पुस्तक घ्यावे आणि घरोघरी जावे. मला एक पुस्तक देण्यात आले.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे मोतीबाग संघ कार्यालय येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनंतराव देशमुख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक प्रशांत यादव आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे सदस्य प्रकाशराव आठवले उपस्थित होते.
टप्प्याटप्प्याने बांधकाम करत आजची दिमाखदार वास्तू ‘भारतीय संस्कृती संवर्धक संस्था’ उभी आहे. या इमारतीसमोर ज्या छोट्याश्या वास्तूत संघाचे काम १९५१ साली सुरू झाले, ज्या वास्तूने संघाच्या अनेक प्रगतींचे टप्पे पाहिले, अनेक जुन्या-जाणत्या व्यक्तींचे पाय ज्या वास्तूला पवित्र करून गेले. ती इमारत मात्र आता मोडकळीस आली आहे, ती जीर्ण इमारत लवकरच पाडली जाणार आहे आणि नवीन रूपात, नवीन सोयीसुविधेसह सर्वांच्या दिमतीला हजर होणार आहे.