प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यास
Read More