उद्धवजी, हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. गुरुवारी अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणांचा अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
Read More
"हनुमान चालीसा म्हटली म्हणून तुरुंगात डांबणारे सरकार आत गेले आहे आणि हे सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारे सरकार आहे" असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर प्रहार केला
मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसा पठणावरून अनेक वाद आपणास पाहायला मिळाले. परंतु आता पुन्हा हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कलमाबाबतीत दिलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इंग्रजांच्या विचारांवर चालत आहेत"असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे
मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याला मंजूर झालेला जामीन रद्द करण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे
"महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेत उतरावे, निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्या विरोधात लढेन" असे थेट आव्हान नवनीत राणा यांनी दिले आहे
मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे, हनुमान चालीसा पठणासाठी आग्रही असलेली मनसे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वादात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
"हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आलेल्यांना सरकारने तुरुंगात डांबले, या माफिया सरकारपासून महाराष्ट्राची सुटका कर अशी देवाकडे प्रार्थना करतो" अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात भेट घेतल्यानंतर सरकारवर टीका केली
आमदार नितेश राणेंचा राज्य सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचे आव्हान दिलेल्या राणा दाम्पत्याला अजूनही काही दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ‘एल्गार’ केल्यानंतर येनकेनप्रकारे भोंगे फारच चर्चेत आले आहेत.
“मागील काही दिवसांपासून राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जे काही प्रकार आणि हिंसाचार सुरू आहेत, ते थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच निर्देशानुसार सुरू आहेत,” असा गंभीर आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.
‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणासाठी आक्रमक पवित्रा घेणार्या अमरावतीतील राणा दाम्पत्याला वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने रविवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
“मी रामभक्त हनुमान आहे. मी हनुमान चालीसा वाचणे थांबवणार नाही. ठाकरेंची लंका मी जाळणारच! माफिया सेनेचा अंत करणारी ‘पोलखोल’ ही मी करणारच. ही ‘पोलखोल’ सभा फक्त अभियानाचा प्रारंभ आहे. गेल्या २५ वर्षांतील माफिया सेनेचा अंत आणूनच हे ‘पोलखोल अभियान’ संपणार आहे,” असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठणकावून सांगितले
" हिंदूंना पवित्र असलेली हनुमान चालीसा म्हणणे हा जर राजद्रोह असेल तर आम्ही तो रोज करू " असा इशारा देत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनवर टीकेचा आसूड ओढला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही वांद्रे महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
"हिंदू धर्मियांची पवित्र हनुमान चालीसा म्हणणे शिवसेनेच्या राज्यात राजद्रोह ठरले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवून टाकले" अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे
मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. शनिवारी (दि. २३ एप्रिल) राणा दांपत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांची मातोश्री बाहेर गर्दी जमली असून ठिकठिकाणी; 'हिम्मत असेल तर येऊन दाखवा. शिवसैनिक सज्ज आहे.', अशी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान चालिसेच्या पठणाला मुख्यमंत्र्यांचा एवढा विरोध का? असा प्रश्न स
"मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाहीत. त्याचे शिवसैनिक असते, तर त्यांनी आम्हाला नक्कीच हनुमान चालिसा म्हणण्यासाठी समर्थन दिलं असतं. मात्र आज मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत.", असे मत भाजप आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि. २३ एप्रिल) मातोश्री येथे जात असता पोलिसांकडून त्यांना दारतच अडवण्यात आले. त्यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.
सध्या संपूर्ण राज्यामध्ये भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असतानाच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले.
मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करुन दाखवणार, असा इशारा शिवसेनेला दिल्या प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलीसांनी अटक केली आहे.
आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवाहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत हे जबाबदार राहतील, अशी तक्रार खार पोलीसांत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात आवाज उठवताना त्याविरोधात हनुमान चालीसा म्हणण्यास सांगितले होते. मनसेच्या या भूमिकेवर टीका करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचेच हसे झाले
हनुमान चालीसा वाचून दाखवण्याच्या भरात संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत चक्क रामदास स्वामींनी रचलेले मारुतीस्तोत्र म्हणून दाखवले
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून मशिदीवर भोंगे वाजत असतील तर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा लावा असे मनसे कार्यकर्त्यांना सागितले होते
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा