भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या एक्स मिडीया हँडल वरुन समस्त भारतीयांना बैसाखीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. उत्तर भारतामध्ये बैसाखीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला हत्याकांडाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की " हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे.
Read More
भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केले. भारतीय स्वातंत्र्य लढा हा जागतिक इतिहासातील एक सुवर्णाध्याय आहे
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. भारताचे पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची पंतप्रधान मोदींची ही नववी खेप ठरली
देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उत्सवात दंग झाला असताना देशाला मिळालेले हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. याच भावनेतून आज जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीत आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना, हे स्वातंत्र्य चिरकाल टिकण्यासाठी आपलेही योगदान आवश्यक आहे आणि ते आपले कर्तव्यच आहे हे सांगणारा हा लेख....
सावरकरांच्या कादंबर्या, लेख, भाषणे ऐकून फक्त त्यांनी केलेला त्याग आणि त्याचा त्यांना मिळालेला मोबदला यांच्यासाठी फक्त दुःख होणार असेल तर उपयोग नाही. अर्थात, आपण संवेदनशील माणसे आहोत. त्यामुळे दुःख नक्कीच होईल. पण, त्यामुळे प्रेरणा मिळाली तर ते त्यांचं खरे यश असेल.
ओवी हे महाराष्ट्राच्या स्त्री साहित्याचे वैभव. स्त्रियांनी केलेल्या या ओव्या म्हणजे स्त्री साहित्य निर्मितीचा आरंभ आहे. या ओव्या म्हणजे स्त्री मनाचा हुंकार आहे. स्त्री जीवनाच्या प्रत्येक पैलूवर, पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर या ओव्या रचल्या गेल्या. या ओव्या काही फक्त सणवार, लग्नसोहळे यापुरत्याच मर्यादित नसून त्यात दैनंदिन सामाजिक घटनांचे पडसादही उमटलेले दिसतात. त्या घटना या ओव्यांमध्ये स्त्रियांनी नोंदवून ठेवल्या आहेत. त्याचे हे शब्दचित्रण...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख नसणे यामध्ये आश्चर्य असे काहीच नाही. याउलट रा. स्व. संघाने ब्रिटिशांना मदत केली, असा आरोप कोणताही पुरावा न देता अनेकांनी केला आहे. मात्र, १९२५ साली स्थापना झाल्यापासूनच आपल्या मातृभूमीला ब्रिटिशांच्या मगरमिठीतून सोडविण्यासाठी रा. स्व. संघाने काम केले होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक (सदस्य) म्हणून हिंदूराष्ट्रास स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,’ असे संघाच्या शपथेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
युद्ध करताना हरप्रकारे शत्रूची संख्या कमी करायची असते, ती वाढवून आपला फायदा नसतो. शत्रू वाढला तर आपले नुकसानच होते, हे टिळकांनी पुरेपूर हेरलेले दिसते. मुस्लिमांना आणि मुस्लीम लीगला काँग्रेसच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांच्या बाजूने उभे करण्यापेक्षा त्यांना आपणच सवलती देण्याचा पर्याय टिळकांना निवडावा वाटला, कारण इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी पुकारलेल्या युद्धात त्यांना शत्रूची संख्या वाढवायची नव्हती. टिळकांचा झगडा ब्रिटिश साम्राज्यशाहीशी होता, ब्रिटिशांमुळे आपल्यावर आलेल्या पारतंत्र्याशी होता, मुसलमानांशी नाही. ह
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गुप्त क्रांतिकारक कार्यरत होते. गावोगावी त्यांची मंडळे होती. सावरकर कुटुंब या चळवळीचे अग्रणी! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ संस्थेशी टिळकांचा जवळचा संबंध होता, पण पडद्यामागून! टिळक विचाराने झपाटलेल्या सावरकरांनी महाराष्ट्रात क्रांतीची गुप्त केंद्रे स्थापिली. बहुत लोक एकत्र केले. सावरकरांचे विचार हे टिळक विचारांची पुढची आवृत्ती आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक क्रांतिकारकांचा आणि त्य
महाराष्ट्रात क्रांतिकारकांची चळवळ घडली, वाढली ती टिळकांच्या काळात. देशपातळीवर टिळकांचे नेतृत्व ‘लोकमान्य’ होण्याचा तो काळ! ब्रिटिशांना जमेल त्या मार्गाने खिंडीत गाठण्याचे प्रयत्न टिळक करत होतेच. मात्र, सगळेच प्रयत्न त्यांना अगदी जाहीरपणे करता येत नसत. अशावेळी ‘क्रांती’च्या वाटेवरून चालणार्यांना टिळक आधार देत, त्याचे बळ वाढवत आणि काही सूत्र टिळकांना पडद्यामागून हलवावी लागत असत. ब्रिटिशांना जरब बसवण्यासाठीचा हा लपंडाव होता. क्रांतिकारकांच्या साथीने ब्रिटिश सरकारविरुद्ध हा लपंडाव टिळक कसे खेळले आणि कसे जिंकले
गदर पार्टीचा इतिहास भारतात नाही तर अमेरिकेत शिकवला जाणार आहे ही समाधानाची, आनंदाची की आणखी कसली गोष्ट म्हणायची, हा प्रश्न मात्र पडतोच.