खगोलशास्त्र म्हटले की, हा विषय जरा सर्वांना किचकटच वाटतो. पण लहान वयातच खगोलशास्त्राशी गट्टी जमलेल्या अर्चित मंदार गोखले यांच्याविषयी...
Read More
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथे २६ फेब्रुवारी रोजी साप्ताहिक विवेकनिर्मित कालजयी सावरकर हा चरित्रपट दाखविण्यात येणार आहे.
साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांना डॉ. भीमराव गस्ती समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार डॉ. हेडगेवार रुग्णालयातर्फे देण्यात येतो. सावित्रीबाई फुले एकात्म समाज विकास मंडळ म्हणजेच डॉ हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी रवींद्र गोळे यांना जाहीर झालेला आहे.
विवेक दीपावली विशेषांक - सा. विवेक दीपावली विशेषांकाचे गुरुवार दि. २१ आॅक्टोबर रोजी ज्येष्ठ कवी व ललित साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सा. विवेकच्या सानपाडा कार्यालयात छोटेखानी व अनौपचारिक स्वरूपात हा प्रकाशन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे व विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची विशेष उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या परराष्ट्र धोरणास नवी दिशा दिली आहे.
“भारतीय वेदांमध्ये, तत्वज्ञानामध्ये ,ग्रंथांमध्ये असलेली समरसता पद्मश्री गिरीश प्रभुणेंनी चिंचवड येथे उभारलेल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये प्रत्यक्ष आचरणात आणली जात आहे.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले
'साप्ताहिक विवेक'तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची सखोल माहिती देणारा 'लोकनेता ते विश्वनेता' ग्रंथ सोमवारी देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सादर करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाचा सखोल आढावा घेणारा 'लोकनेता ते विश्वनेता' या ग्रंथाची निर्मिती 'साप्ताहिक विवेक'तफे करण्यात आली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडवून आणणार्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहासही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. सानेगुरुजींनी आपल्या प्राणांची बाजी लावून दहा दिवस हा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचा सविस्तर इतिहास विद्याधर ताठे यांनी 'भेटवा विठ्ठला' पुस्तकात शब्दबद्ध केला असून सा. ‘विवेक’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ९ मे रोजी पंढरपूर येथे तनपुरे महाराजांच्या मठात सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व माध्यम सल्लागार मकरंद मुळे यांना यंदाचा 'ठाणे गुणीजन' पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी मुळे यांना गडकरी रंगायतन येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
चिपळूणमधील महापूराच्या घटनेला आता सहा महिने लोटले. सा. ‘विवेक’ आणि ‘महाएमटीबी’च्या टीमने त्यावेळी देखील पूरपरिस्थितीचे आणि तेथील मदतकार्याचा सविस्तर आढावा घेतला होता. पण, गेल्या सहा महिन्यांत चिपळूणमधील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झालेले दिसते. याचं श्रेय जेवढं तिथे तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल, तितकंच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करण्याच्या चिपळूणकरांच्या चिवट वृत्तीलाही द्यावं लागेल. चिपळूण इतक्या अल्पावधीत महापुरातून कसं सावरलं, याविषयीचं कुतूहल पुन्हा एकदा आमच्या टीमला चिपळूणला घेऊन ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचे विविध पैलू उलगडणारा ’लोकनेता ते विश्वनेता’ हा सा. ‘विवेक’चा भव्य ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘विवेक’द्वारे ’राष्ट्रजागरण व्याख्यानमाला’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २९ ऑक्टोबर रोजी आयोजित या व्याख्यानमालेत डॉ. अशोकराव कुकडे, विक्रम गोखले, सुनील देवधर आदींसह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
रवींद्र गोळे यांचा अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
दैनिक मुंबई तरुण भारत आणि साप्ताहिक विवेक आयोजित मराठीतील पहिली जागतिक कोव्हिड परिषद शनिवारी पार पडली.
साप्ताहिक ‘विवेक’चे माजी कार्यकारी संपादक आबासाहेब तथा श्रीपाद वामन पटवारी यांचे मंगळवार, दि. २० एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी शुभदाताई, तीन पुत्र-सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सा. 'विवेक'च्या विशेष कार्यक्रमात आ. अनंत गाडगीळ, केशव उपाध्येंचा सहभाग
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त ‘साप्ताहिक विवेक’तर्फे शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी ‘कोण तळ्यात, कोण मळ्यात’ या विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निस्वार्थी दानाची परंपरा जपणाऱ्या मोजक्याच अपवादापैकी मोहनराव सोमन होते. संघकार्यासाठी राहते घर त्यांनी दान केले होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना वंदन.
सर्वसामान्यांचं मन जपणारा नेता