गिनिज बुकमध्ये नोंद असलेला मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाच्या मालकाला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने मुच्छड पानावालाच्या खेतवाडीतील दुकानात छापेमारी केली छापेमारी दरम्यान पोलिसांना त्याच्या गोदामाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोदामातही छापा टाकला. या छापेमारीत 15 लाखाची ई-सिगारेट हस्तगत करण्यात आली आहे.
Read More
समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समाज सबलीकरणासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण काही ना काही कार्य करत असतो. अशातच येऊ घातलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून वनवासी विभागातील गरजू बांधवांसाठी हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र या संस्थेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या संस्थेमार्फत ज्यांच्या घरी गणपती बसतात अशांसाठी एक विशिष्ट 'दानपेटी' तयार करण्यात आहे. या दानपेटीत जमा होणारा निधी वनवासी विभागातील गरजूंच्या भवितव्यासाठी वापरला जाणार आहे.
सामाजिक कार्य करणे ही बरेचदा ‘फॅशन’ बनत चालली आहे की काय, इतकी ती सपक झालेली दिसते. सामाजिक कार्याच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या गोष्टी केल्या जातात. याच चुकीच्या गोष्टींना टाळून त्यातून सामाजिक संस्था आणि देणगीदार यांना एकत्र एका मंचावर आणून त्यांचे काम सुलभ करण्यासाठी, तसेच या संपूर्ण व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून देणगीदारांना त्यांनी दिलेल्या देणगीचे सार्थक होत आहे, हे समाधान मिळवून देण्याचे काम आपल्या ‘टेकपोज’ या ‘स्टार्टअप’मधून केले आहे सुश्मिता कनेरी यांनी. त्यांच्याविषयी...
कमांडर (नि.) प्रा. डॉ. सुनील कांबळे (पीपल्स एज्युकेशन सोसायटी) सिध्दार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य )यांना ‘पी. ए. सोसायटी’च्या ७७व्या वर्धापन दिनी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी प्रदान करण्यात आला. कमांडर(नि.) उपप्राचार्य सुनील यांचा सत्कार हा जणू डोंबिवलीकरांचाच सत्कार झाला, असे मानून डोंबिवलीतील विविध संस्थांनी एकत्र येऊन सरांचा एक छोटेखानी सत्कार रविवार, दि. १७ जुलै रोजी ‘कानविंदे क्रीडा भवना’त आयोजित केला होता. डोंबिव
जागतिक स्तरावर त्वचारोग निवारण तज्ज्ञ म्हणून लौकिक असलेल्या डॉ. दिप्ती देसाई. धर्म, समाज आणि देश या बांधिलकीतून वैद्यकीय सेवेला ईश्वरी सेवा मानतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा...
श्रद्धा सांगळे या एक अत्यंत अभिनव उपक्रम राबवित असून मोठ्या कल्पकतेने या उपक्रमातून त्यांनी समाजसेवा आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड घातली आहे. लहान मुले, त्यांचे बालपण, त्यांच्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी ही त्यांच्या बालपणातच होते. याची जाणीव असल्याने या मुलांचे बालपण जपले पाहिजे, याच भावनेतून ‘सवंगडी’सारखा उपक्रम त्या राबवितात. खेळ आणि संस्कार यांच्यामार्फत मुलांचे भावविश्व घडवणार्या श्रद्धा सांगळे यांच्याविषयी...
गणेश नाईक साहेबांच्या कामाचा मोठा प्रभाव गेल्या २० ते २५ वर्षांपासून माझ्यावर आहे. माझ्या भागातील नागरिकांची काम घेऊन मी नेहमी दादांच्या जनता दरबारासाठी जात असे. त्यावेळी नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर दादा उपाय सांगत. त्या समस्या भागातील विकासकाम पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ते मार्गी लावत. दादांच्या याच कार्यशैलीचा माझ्यावर प्रभाव पडला. मी राजकारणात सक्रिय झालो.
सरफराज अली जाफरी समाजसेवेच्या नावाखाली इस्लामी धर्मांतरण करायचा आणि मौलाना सिद्दीकी निधी द्यायचा
देश आणि समाजाने आपल्याला सर्वच दिले आहे. त्यांचे ऋण फेडायलाच हवे. या विचारांनी संपर्कात येणार्या प्रत्येक समाजघटकाच्या उत्कर्षासाठी कार्य करणार्या गीता मोघे. त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला आढावा.
स्त्री म्हणून जन्म घेतल्यावर माणूस म्हणून त्या व्यक्तीची जबाबदारी आणखीनच वाढते. मानवी शाश्वत मूल्य जगताना त्या स्त्रीशक्तीला जगण्याची आणि जगवण्याची पराकाष्ठा करावी लागते. मळलेल्या वाटेवरून न जाता, स्वत:चा प्रकाशमान मार्ग तयार करणार्या समाजात काही दैवीस्वरूपी स्त्रीशक्ती आहे. या स्त्रीशक्तीचे वास्तव रूपच राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारक, गृहिणी विद्यालयाच्या व्यवस्थापिका कुंदा फाटक आपल्या मनोगतातून मांडत आहेत.
'नाही रे' गटाचे जगणे आयुष्याचा प्राणच, पण परिस्थितीवर मात करत डॉ. रघुनाथ केंगार यांनी वंचिततेचा गाळ तुडवत स्वत:च्या आणि समाजाच्या आयुष्यालाही अर्थ आणला आहे. त्याचा हा मागोवा...
दि कल्याण जनता सहकारी बँकेचा ४६वा वर्धापन दिन साजरा
१९७० मध्ये ‘ठाणे जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. साधारणतः १९७१ साली ‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’ची, तर २३ डिसेंबर, १९७३ साली ‘दि. कल्याण जनता सहकारी बँके’ची स्थापना झाली. मध्यंतरी लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “सहकार हा एक मंत्र व संस्कार आहे.” त्याच ध्येयाने ‘दि कल्याण जनता बँके’ची स्थापनेपासून वाटचाल सुरु आहे.
सध्या जगासमोर उभी असलेली गंभीर समस्या म्हणजे पाणीटंचाई व प्रदूषण होय. 'वृक्ष लावा वृक्ष जगवा' या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी 'दि कल्याण जनता सहकारी बँक कल्याण' आणि 'दि ठाणे भारत सहकारी बँक लि' या ठाणे जिल्ह्यातील दोन शेड्युल्ड सहकारी बँकांनी 'संचालक समाजसेवा पुरस्कार निधी' या अशासकीय संस्थेच्या सहकार्याने प्रकल्प राबविला.
उल्हासनगरचे नामवंत उद्योजक अशी महेशभाई (खैरारी) अग्रवाल यांची ख्याती. 'रिजन्सी ग्रुप'च्या नावे संपूर्ण महाराष्ट्रात गृहसंकुलांची शृंखला त्यांनी उभारली आहे. रिजन्सी समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची ख्याती जितकी दूरवर परसलेली, तितकेच त्यांच्या विनम्रतेचे आणि साधेपणाचे किस्से सांगितले जातात. त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
‘दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यास’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून २०१७ साली लक्ष्मीकांत उपाध्याय यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली तीन वर्षे त्यांनी ही धुरा लीलया पेलली. संस्थेच्या अनेक उपक्रमांना त्यांच्या नेतृत्वात दिशा मिळाली. यंदाच्या ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्याच्या निमित्ताने दै. मुंबई तरुण भारतशी त्यांनी केलेली ही खास बातचित...
एका हॉटेलमध्ये काम करणारा साधा मुलगा आज कल्याणमध्ये 'भास्करशेठ' म्हणून अगदी सुपरिचित. आपल्या विनम्र स्वभावामुळे समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा मान लाभलेले संचालक समाजसेवा पुरस्कारार्थी भास्कर शेट्टी यांचा उद्योजकीय प्रवास...
सहकारी तत्त्वामध्येच नि:स्वार्थ व प्रामाणिक भाव अनुस्यूत आहे. त्यामुळे वरील नियम म्हणजे काही फार मोठा त्याग वगैरे, असेही नाही.
“चांगल्या विचारांच्या चांगल्या व्यक्ती एकत्रित आल्या की, परिणाम चांगलेच होतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘दि. कल्याण जनता सहकारी बँक.” दि कल्याण जनता सहकारी बँके’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक अतुल खिरवडकर यांनी ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्यानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख प्रस्तुत केलाच, पण बँकेच्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी सहकारीवर्गालाही दिले. मुलाखतीतून त्यांनी व्यक्त केलेले विचार...
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून स्टील उद्योगक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कृष्णलाल धवन यांच्या व्यावसायिक कारकिर्दीलाही आता ६० वर्षं पूर्ण झाली. व्यवसायाला समाजसेवेची जोड देत सर्वार्थाने 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी'ही त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणली. त्यांच्या या कार्याचा गौरव 'दि कल्याण जनता सहकारी बँक लि. संचालक समाजसेवा पुरस्कार निधी विश्वस्त संस्थे'तर्फे केला जाणार आहे. त्यानिमित्त धवन त्यांच्या कार्यक्षेत्राचा घेतलेला हा आढावा.
मोहन आघारकर हे कल्याण जनता सहकारी बँकेत कार्यरत असल्यापासूनच ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ या संस्थेच्या कार्यात आपल्यापरीने हातभार लावत आहेत. संस्थेचे अनेक समाजहित उपक्रम असो किंवा कुठलाही अन्य कार्यक्रम, संस्थेच्या मंचावरील त्यांचे स्थान हे त्यांच्या कार्यामुळे, संघटनकौशल्यामुळे लक्ष वेधून घेत असते. गेली सहा वर्षे ते या संस्थेच्या सचिवपदाची धुरा सांभाळत आहेत.
मुंबईतील भांडुप उपनगरात ‘सावली फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या गणेश जाधव या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनप्रवासाविषयी...
एका खोलीमध्ये सुरू झालेल्या या संस्थेचा गेल्या ३० वर्षांत लक्षणीय विकास झाला
रवींद्र गजानन कर्वे, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या सेवाकार्यांत अग्रणी असलेले नाव. नि:स्वार्थी नि:स्पृह समाजसेवा करणारे रवींद्र कर्वे यांच्या जीवनाचा संक्षिप्त आलेख...
समाज पुरुषाशी विद्रोह नव्हे, तर समन्वय आणि निष्ठा राखली तर स्वत:सोबतच समाजही घडत जातो, हे सांगणारे डवरी गोसावी समाजाच्या कांता शिंदेंचे जगणे...
हरिभाऊ भडसावळे उर्फ काका भडसावळे यांनी १९४७ मध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील यांच्या स्मरणार्थ कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना केली.
‘अनाथ बालकांचा प्रश्न’ हा समाजापुढील मोठा प्रश्न आहे. ही बालके जीवंत समाजाचा भाग असतात. मात्र, या बालकांची काही चूक नसतानाही त्यांना आयुष्यात विनाकारण आणि सातत्याने गंभीर परिणाम भोगावे लागतात. सर्वच अनाथ बालकांच्या समस्या सोडवू शकत नाही. मात्र, बदलापूर येथे ‘सत्कर्म बालकाश्रम’ आपल्यापरीने या बालकांच्या प्रश्नावर काम करत आहे.
नाना ढोबळेंच्या संघ, समाजसेवेच्या कार्याचे निरंतर स्मरण राहावे म्हणून बदलापूरवासीयांनी १९९३ साली त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपल्या हातूनही स्थानिक नागरिकांची अल्प-स्वल्प का होईना सेवा घडावी, या उद्देशाने ‘नाना ढोबळे स्मृतिसेवा प्रतिष्ठान’ची नोंदणी करून सुरुवात केली. या प्रतिष्ठानच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
अमेरिकेत मोठे नाव कमावूनही बाळासाहेबांची मातृभूमीशी नाळ जोडलेली होतीच. अखेरीस बाळासाहेब स्वदेशी परतले आणि समाजसेवेसाठी स्वत:चे जीवन त्यांनी समर्पित केले.
शिक्षणापासून ते स्वच्छतेपर्यंत विविध समाजकार्यांमध्ये अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतो. असाच एक अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेची तातडीने सेवा पुरवून जीवनदान देणारा माणूस म्हणजे संजय कोठारी.
हे कर्तृत्वत्वान व्यक्तिमत्व दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ नेतृत्व म्हणून उदयास आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात संकट निर्माण झाल्यास त्या ठिकाणी सर्वप्रथम धावून जाणारे, आ. प्रशांत ठाकूर हेच आहेत.
भारती यांनी 2009 साली नर्मदा परिक्रमा केली. अवघ्या पाच महिन्यांत त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आणि त्यांना त्यांच्या कामाची दिशा उमगली.
गरजुंना तुम्ही कितीही पैसे द्या, त्यांच्यात बदल होणार नाही, मात्र शिक्षण दिलं तर त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबाचा उद्धार होणार आहे