श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ लावण्याचे किंवा गीतामृतमंथनाचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींकडून अव्याहतपणे सुरुच आहे. त्यात व्यावहारिक जगात वावरणार्या पण, श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सोप्या, सुलभ शब्दांत मांडणार्यांचाही समावेश होतो. प्रल्हाद नारायणदास राठी यांनी आपल्या ‘ब्राह्ममुहूर्त’ काव्यसंग्रहाद्वारे श्रीमद्भगवद्गीतेतील हेच तत्त्वज्ञान अगदी मोजक्या व नेमक्या शब्दांत सादर केले आहे
Read More
“श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी,” अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत केली. शिक्षणमंत्र्यांच्या विधानाचा संदर्भ देत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “शिक्षण व्यवस्थेअंतर्गत शाळेतील अभ्यासक्रमात सरकार बदल
ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते, असा विश्वातील एकमात्र धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता! आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला म्हणजेच मोक्षदा एकादशीला ‘गीता जयंती’ साजरी केली जाते. त्यानिमित्ताने...
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी ‘अटल गीता जयंती’ दिन साजरा करणार आहे.“स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ‘गीता जयंती’ आल्याने, हा सुवर्णयोग आपण सर्वांनी साजरा करावा,” असे आवाहन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. या दिवशी ‘श्रीमद्भगवद्गीते’चे सामुदायिक पठण केले जाणार आहे.
महात्मा गांधी हे स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत असत. भगवान श्रीकृष्णाने अजुर्र्नाला कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचे महात्मा गांधींच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान होते. सोबतच वेद, उपनिषदे आदींवरही त्यांची आस्था होती. महात्मा गांधींचे हिंदू जीवन दर्शन आध्यात्मिक अंगाने जाणारे होते. सदर लेखात गांधीजींच्या याच पैलूचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे.