रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ईडीने कारवाई करत त्यांच्या विरोधातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. मुंबईसह पुणे आणि मुरुड येथेही ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. आता या संबंधात भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांनी ज्या विभास साठेंकडून जमीन विकत घेतली होती, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी केली आहे.
Read More
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते, जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, त्या अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरूवारी पहाटे ६.३० वाजल्यापासून धाडसत्र सुरू केले. यात पुणे येथील दोन घरांवर देखील धाड टाकून ‘ईडी’ने तपास सुरू केला.