इतिहासातील साधने ही अभ्यासाच्या दृष्टीने ( Pune Currency ) फार महत्त्वाची, इतिहाच्या साधनांमुळे त्याकाळातील अनेक घटकांचे पुरावेच अभ्यासकासमोर येत असतात. त्यातूनच काळाचा पट अभ्यासकासमोर उभा राहून, त्यातून सत्य समोर येत असते. अशा इतिहासाच्या साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व फार. मराठ्यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र असलेल्या पुण्यातील नाण्यांचा घेतलेला हा आढावा...
Read More
१६० वर्षे शतकोत्तर अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कल्याण डोंबिवली महनगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘अनंत कथा-कविता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१६० वर्षे अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘वर्दीतील विनोद व कविता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याण : गेली १६० वर्षे अविरत वाचनसेवा देणारे सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत ‘विद्यार्थी चालवितात वाचनालय’ हा एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
१६० वर्ष अविरत वाचनसेवा देणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने ‘कथा/कविता लेखन स्पर्धा २०२४’ आयोजित करण्यात आली आहे. कथा-कवितेला विषयाचे बंधन नाही. कथा/ कविता ही स्वलिखित व अप्रकाशित असावी. कथा १५०० ते २००० शब्दांची आणि कविता १६ ते २० ओळींची असावी.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक मुखपृष्ठासह ‘साप्ताहिक विवेक’ने सादर केलेला दिवाळी अंक हा दर्जेदारच म्हणावा लागेल. ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांच्या कुंचल्यातून साकारलेले देवी सरस्वतीचे मनमोहक आणि जिवंत भासणारे चित्र, हे सर्वस्वी लक्षवेधी. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची संघशताब्दीनिमित्त घेतलेली विस्तृत मुलाखत आणि त्यांनी मांडलेली पंचसूत्री, ही सर्वस्वी समाजाला दिशादर्शक ठरावी. त्याचबरोबर रमेश पतंगे यांनी अतिशय सोप्या शब्दात, महाराष्ट्रातील संतपरंपरेची शिकवण समाजात रुजवण्यासाठी काय कराय
ठाण्यातील ग गप्पांचा समूह, ठाणे नगर वाचन मंदिर आणि ब्राह्मण शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवधूता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १९ ऑक्टोबर रोजी बब्राह्मण शिक्षण मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालय सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील तमाम मराठी माणसांसाठी लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पुस्तक विकत घेताना त्यांच्या विषयांचा अभ्यास करतो का आपण? मुळात पुस्तके वाचण्यासाठी आज वाचनालये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना सुद्धा काही पुस्तके आपण संग्रही ठेवण्यासाठी घेतोच. तसेच संग्रही असावे असे हे लहानसे पुस्तक. डॉ. सुधाकर आगरकर यांनी लिहिलेले हे पुस्तक मुंबईच्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाने प्रकाशित केले आहे. खरेतर त्यांचा हा प्रवास केवळ संग्रहालये पाहण्यासाठी नव्हता तर नवनवे प्रांत, विविध देश पाहताना तेथील संग्रहालये शोधून आपल्या कामातून वेळ काढून ते त्या स्थानांना भेटी देत. तिथल्या लोकांशी बोल
एक काळ होता जेव्हा ग्रंथालयं गर्दीने फुलून गेलेली असायची, ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर बसून वाचक वाचत असायचे; आता मात्र ही ग्रंथालयंच वाचकांविना ओस पडताना दिसत आहेत. काळाच्या ओघात घडलेला हा बदल सुखावणारा अर्थातच नाही. परंतु ग्रंथालयाकडे पावलं वळत नसली तरी सध्याची वाचनसंस्कृती बदललेल्या स्वरूपात का असेना, अस्तित्वात आहेच हे निश्चित. कोणत्याही भाषेतील साहित्य हे त्या विशिष्ट भाषक समाजाचे भरणपोषण करण्यास उपयुक्त ठरत असते.
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.
साहित्य संस्कृती वाढीस लागावी त्याचबरोबर वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यात मेहता पब्लिशिंग हाऊस नेहमीच प्रयत्नशील असते. उत्सव पुस्तकांचा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. प्रदर्शनाचे उदघाटन दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होईल. यावेळी जेष्ठ पत्रकार आणि लेखक संजय सिंह उपस्थित असतील. तर समारोप रविवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. यावेळी पत्रकार लेखक जितेंद्र दीक्षित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
अंबरनाथ : ग्रामीण भागातील शाळांमध्ये लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तितीक्षा फौंडेशनच्या माध्यमातून पायल कबरे यांनी सुरु केलेल्या वाचन चळवळीचे कार्य कौतुकास्पद आहे , वाचनासाठी पुस्तके कमी पडणार नाहीत यासाठी भरीव पाठबळ देण्याचे आश्वासन भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिले.
भाषा सल्लागार समितीची बैठक तब्बल एक वर्षाच्या काळानंतर १२ एप्रिल ला होत आहे. या बैठकीची विषयपत्रिका नुक्तीच जाहीर झाली. मात्र विषयपत्रिकेतील विषयांवर अनेक सदस्य नाराज असल्याचे समजते. भाषा धोरण, अभिजात दर्जा अशा अनेक विषयांवर चर्चा होणारच नसल्याचे विषय पत्रिकेतून समोर आले आहे.
ठाणे : सण-उत्सवाच्या माध्यमातुन संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच ज्ञानदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानने हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ सुरु केली आहे. ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात गुरुवारी (दि.६ एप्रिल रोजी) हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अतिथी भाविकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.
वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील चित्रकार सुभाष गोंधळे यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आयोजित ग्रंथोत्सव दिनांक १६ व् १७ नोव्हेम्बर रोजी दादर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, वक्ते व संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले उपस्थित होते. प्रथम दिवशी ग्रंथदिंडी पाठोपाठ प्रसिद्ध लेखक प्रवीण दवणे व निवेदिका दीपाली केळकर यांची व्याख्याने आयोजित केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी डॉ. राजेंद्र कुंभार यांचे वाचनसंस्कृती- काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होते, त्यानंतर
वाचन संस्काराचं महत्त्व समाजाला कळायला हवं, अभ्यासू-जिज्ञासू आणि महत्त्वाकांक्षी यांच्यासह इतर अनेक सजग-जाणकार देशाच्या समस्त-सन्माननीय नागरिकांना पटावं, यासाठी आपल्या राज्य सरकारच्या दक्ष अशा संवेदनाक्षम विभागाने मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासकीय भवन ८वा मजला, मुंबई येथे ‘वाचन प्रेरणा दिना’चं औचित्य आणि मुहूर्त साधून एका प्रेरणादायी उपक्रमाचं स्तुत्य आयोजन केलं आहे. त्याविषयी सविस्तर....
उद्यान वाचनालय : मुंबईच्या उद्यानात आता वाचनालये सुरु होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये वाचनालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
‘वृंदावन फाऊंडेशन’, ‘विवेक व्यासपीठ पुणे’ यांचा ‘गुरुजन गौरव पुरस्कर’ यंदा प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा लेख...
विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी शैलजा बेडेकर या ‘मनोरंजन वाचनालय’ चार दशके यशस्वीपणे चालवणार्या म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत.
सामाजिक समरसतेचा वसा घेऊन आयुष्य व्यतित करणारे शेगावचे दामोदर परकाळे. त्यांच्या आयुष्याचा आणि विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडून त्या तितक्याच ताकदीने यशस्वी करण्याचे काम डॉ. योगेश विजय जोशी करीत आहे. त्यांनी कोणकोणत्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविल्या आहेत यावर टाकलेला प्रकाश.
दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे २ मे ते ११ जून य कालावधीसाठी लहान मुलांसाठी मोफत बालवाचनालय चालवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ य वेळेत हे वाचनालय सुरु असणार आहे
सार्वजनिक वाचनालय नाशिक(सावाना)तर्फे दिल्लीत गुरुवार, दि.१० फेब्रुवारी रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा ऑनलाईन पध्दतीने पार पडला. 'नाशिक जिल्ह्यातून एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य', असे म्हणत गडकरींनी नाशिककरांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.
वाचन संस्कृती जपण्यासाठी कल्याणमध्ये युवा उद्योजकांचा पुढाकार
राज्य सरकाराने अनलॉक पाच मध्ये हॉटेल, रेस्टारंट आणि बार सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर आता ग्रंथालये सुरू करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रंथालये सुरू करण्याबाबत कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयासह इतर प्रमुख वाचनालयाच्या पदाधिका:यांनी गुरूवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.
तत्त्वज्ञ, भाष्यकार, संशोधक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन
ग्रंथसंकलन आणि त्याचे वाचन शांततामयी आणि विवेकी समाजाचे द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ग्रंथालयाच्या कपाटात असणारी ही संपदा वाचकांच्या हातात असणे, हेदेखील वाचनसंस्कृतीची वाढ होण्यासाठी आवश्यक असेच आहे. याच जाणिवेतून नाशिकमधून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या संकल्पनेच्या प्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाचकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येमुळे ग्रंथांच्या जवळ येणे शक्य होत नाही. तेव्हा ग्रंथच वाचकांच्या दारी पोहोचवले तर, समाजात वाचन संस्कृती वाढण्यास मदतच होईल, या हेतूने ग्रंथपेटीच्या माध्यमातून ‘ग्रंथ तु
नाशिक सार्वजनिक वाचनालय भारतातील सर्वात जुने असे तिसर्या क्रमांकाचे वाचनालय आहे. भारतातील कोलकाता येथील आणि मुंबई येथील एशियाटिक लायब्ररीनंतर ‘सावाना’चा भारतात असणारा तिसरा क्रमांक ही नाशिककर नागरिकांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
काहीं व्यक्तींचे मित्रत्वाच्या, वडिलकीच्या नात्याने मिळणारे मार्गदर्शन आयुष्यात अत्यंत मोलाचे ठरते. असेच एक मार्गदर्शक, वाचक, लेखक, समाज जागरुक व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्र मालुसरे...
दिग्गज साहित्यिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये वाचनसंस्कृती, वेगाने फोफावली आहे. ही चळवळ व्यापक करण्यामागे डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचा मोठा वाटा आहे.
‘विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटण्यामागील मूळ कारण म्हणजे समाजात वाचनसंपदा वाढावी; असे मला वाटते. अवांतर वाचनामुळे माणसाला चार चांगल्या गोष्टींचे ज्ञान होते.’
’इंटरनेट, गॅजेट्सचे मुलांमध्ये वाढणारे वेड’ असा विषय असलेल्या या सत्राची सुरुवात तर छान सकारात्मक झाली होती.
‘एकटाच लढतोय...’ असे म्हणणारे नाशिकचे ७४ वर्षीय ‘अँग्री ओल्ड मॅन’ रमेश विश्वनाथ जुन्नरे... का आणि कशाविरोधात आहे त्यांचा लढा, ते जाणून घेऊया...
पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती हा नक्कीच मनाला आनंद देणारा सोहळा आहे. मात्र, त्याचबरोबर जिल्हास्तरापर्यंत सक्षम वाचनालये उभी करण्याची गरजदेखील मोठी आहे.