वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीच्या भुखंडाबाबत निकष निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय असून ही समिती लवकरात लवकर गठीत करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी दिल्या.
Read More
मुंबई मेट्रो ३ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे-बीकेसीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. भूमिगत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुलभ करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्ट प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आशिष शेलार आघाडीवर असून त्यांनी २ हजार २१२ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आसिफ झकेरिया मैदानात होते. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, महायूती १७३ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी १०१ जागांवर पिछाडीवर आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
वांद्रे टर्मिनसवर पहाटे ६च्या सुमारस चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसच्या प्रतीक्षेत असताना हा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ जणं जखमी झाली असून, त्यांना जवळच्या भाभा रूगणालयात दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु आहे. अशातच मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. याठिकाणी वरुण सरदेसाई यांना तिकीट देण्यात येणार असल्याचे उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी एका मेळाव्यात जाहीर केले.
मुंबईकर लवकरच 'आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स'पर्यंत शहराच्या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रणालीमध्ये प्रवास करू शकतील. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या योजनेनुसार या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील व्यावसायिक ऑपरेशन्स जुलैपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी-सान यांच्या शिष्टमंडळाने सोमवार, दि.२७ रोजी हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी एमएमआरसीद्वारे करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले आणि पहिला टप्पा सुरू करण्यासाठी शुभेच्छा
एसव्ही रोडवरील वांद्रे रेल्वे स्टेशन ते लकी जंक्शन पर्यंत स्कायवॉक पाडण्याचे काम पुन्हा सुरू होणार आहे. मेट्रो लाईन २ब (डी एन नगर ते मंडाले)पर्यंत जाण्यासाठी सात महिन्यांपूर्वी स्कायवॉकचा एक मोठा भाग पाडण्यात आला होता. स्कायवॉकच्या बाजूचे संरक्षक कवच काढण्यात आले असले, तरी त्याच्या आजूबाजूचे खांब, पदपथ आणि धातूचे रॉड शिल्लक राहिले आहेत. अशातच वांद्रे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकांच्या सौंदर्यात वाढ झाली असून ते आता मूळरूपात परत आले आहे.
मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारा पहिला बो आर्च स्ट्रिंग गर्डर आज पहाटे प्रवाहकीय हवामानानुसार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा अवधी लागणार असून यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते वेरावळ रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे सुरू केल्याची घोषणा शुक्रवारी (२० ऑक्टोबर) केली. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने ही नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन २१ ऑक्टोबर २०२३ पासून धावेल.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. अनिल परब यांचे ज्या सोसायटीत घरं होतं त्या सोसायटीत अनिल परब आमदार झाल्यानंतर सोसायटीच्या मालकी जागेत जनसंपर्क कार्यालय करावे अशी इच्छा येथील रहिवाशांनी केली होती.
मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वांद्रे - वरळी सागरी सेतू यांना जोडणाऱ्या उन्नत मार्गिकेतील अडथळे दूर होण्यास सुरुवात झाली आहे. या उन्नत मार्गिकेत परळ आणि प्रभादेवी स्थानकांना जोडणारा उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. ४.५ किमी लांबीच्या या उड्डाणपुलाच्या कामाला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे. अद्याप पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसी) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने पूल उभारला जाणार आहे
वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाचा मालकीचा जी-९ हा प्राईम लोकेशनला असलेल्या भूखंडाबाबत म्हाडा अनभिज्ञ होते. सदर भूखंडाचा कथित बिल्डराने बेकायदा ताबा घेऊन लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड बांधून अतिक्रमण केल्याची तक्रार म्हाडाला स्थानिकांकडून प्राप्त झाल्याने या भूखंडाचा ताबा पुन्हा म्हाडाने घेतला आहे.
२ जानेवारीपर्यंत महोत्सव नागरिकांसाठी बंद
मुंबईतल्या समुद्रकिनार्यांपैकी वांद्रे (पश्चिम) भागातील चिंबई आणि वारिंगपाडा तसेच मार्वे किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी ११ कोटी, २१ लाख, ५८ हजार रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
कोर्टाने कंगनाला तपासात पोलीसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगनाला आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चाैकशासाठी उपस्थित राहवे लागणार आहे.
ठाकरे सरकारला सल्ला
अभिनेता शेखर सुमन यांनी केली सीबीआय चौकशीची मागणी दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांची अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलीसांकडून चौकशी केली जाणार आहे. यशराज फिल्ससह केलेल्या करारामुळे दोन सिनेमे भंसाळींनी नाकारले होते, याच पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी केली जाणार आहे.
वांद्रे टर्मिनस येथून दुपारी १२ वाजता बिहार-पुरनियासाठी सुटणाऱ्या श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी साधारणपणे १७०० जणांनी बुकिंग केले होते
IFSC केंद्र गुजरातला उभारण्याचा निर्णय हा आत्ताचा नसून २०११ मध्येच तत्कालीन युपीए सरकारच्या काळात सोनिया गांधींच्या आदेशाने घेण्यात आल्याची माहिती निर्मला सितारामण यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला देण्यात आलेल्या उत्तरात दिली होती. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार सभागृहात नव्हते का, असा प्रश्न भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबेवर लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल तसंच गर्दी जमविल्याचा आरोप
वांद्रे पूर्व म्हणजे ‘मातोश्री’चे अंगण आणि शिवसेनेसाठी एक महत्त्वाचा मतदारसंघ. येथे शिवसेनेशिवाय कोणालाही विजय मिळणे कठीण होते. पण, मुळातच महाडेश्वर यांना उमेदवारी अखेरच्या क्षणी दिली गेली. त्यामुळे ‘नाईलाजाने दिलेली उमेदवारी’ असा त्याचा अन्वयार्थ घेण्यात आला.