बिहारमधील गोपालगंजमधील एका युवतीचे धड झाडाला टांगण्यात आले होते. यावेळी युवतीच्या निकटवर्तीयांनी आरोप केला की, गावातील युवकांनी मिळूनच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली. पीडितेने आत्महत्या केली असावी असा समज निर्माण व्हावा यासाठी तिला एका झाडाला टांगण्यात आले होते. संबंधित प्रकरण हे मांझागड ठाणे क्षेत्रातील आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत युवतीची हत्या करणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेप्रसंगी अनेक तपास करण्यात आले आहेत. या तपासातून संबंधि
Read More
सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली.
गीता केवळ श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शाब्दिक तत्त्वज्ञान नसून, जीवनातील अनंत गूढ तत्त्वांचे ज्ञान प्राप्त करून, प्रत्यक्ष जीवन जगण्याचे एक महान दिव्य शास्त्र आहे. यादृष्टीने हे महनीय शास्त्र जगासमोर आल्यास, सर्व जगच या महान ग्रंथाकडे मानवी जीवनाकरिता एक आवश्यक संहिता म्हणून बघेल. यामुळे भगवद्गीता केवळ हिंदूंचा धार्मिक ग्रंथ न राहता, अखिल विश्वाचा जीवन ग्रंथ बनेल.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभला ‘मृत्यूकुंभ’ म्हणून संबोधल्याने संत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून अनेक तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. ममतादीदींचे विधान सनातन धर्म आणि महाकुंभाच्या पावित्र्याचा अपमान असल्याचे संतांनी म्हटले आहे. महाकुंभ हा केवळ कार्यक्रम नसून तो सनातन संस्कृतीचा आत्मा आहे, त्यामुळे ममता बॅनर्जींनी जाहीर माफी मागावी अशी मागणी संतांनी केली आहे. Sant Mahant Comment on Mamata Banerjee
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे अडकणार?
हंस म्हणजे प्राण! प्राणशक्तीवर विजय मिळविणे म्हणजे हंसजय होय. हंसजयाची सिद्धी प्राप्त झाल्यावर, साधक कितीही काळ श्वासोच्छ्वासाशिवाय राहू शकतो. असेही साधक आहेत की, जे श्वासोच्छ्वासाशिवाय आपल्या रक्तवाहिन्या व हृदयस्पंदन व्यवस्थितपणे चालवू शकतात. शवासन साधनेकरिता हंसजय आवश्यक आहे. दीर्घप्राणायामाद्वारे केवल कुंभक लागून, हंसजय होऊ शकतो. केवल कुंभक व हंसजय यांमध्ये थोडा फरक आहे. केवल कुंभकाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाऊ शकतो. परंतु, हंसजयाद्वारे साधक समाधी अवस्थेत जाईलच, असे नाही. केवल कुंभक ही केवल अवस्था आहे.
राज्यात दिवसागणिक वाघांच्या मृत्यूचा आलेख चढत आहे (tiger death in Maharashtra). बुधवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी वर्धामध्ये वाघाच्या मादी बछड्याचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले, तर पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे (tiger death in Maharashtra). या प्रकरणामुळे नववर्षाच्या २२ दिवसांमध्येच ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. (tiger death in Maharashtra)
महाकवी कालीदासांचे अभिज्ञान शाकुंतलात एक श्लोक आहे, ‘आयुष्मन एष खलु हेमकूटी नाम किंपुरुष पर्वतस्तपः संसिद्धिक्षेत्रम’, स्वामी विवेकानंदांबद्दल रामकृष्ण परमहंस असेच सांगत असत. स्वामी विवेकानंद नारायणाचा अवतार आहेत, असे त्यांचे अनुभव मत होते. महाभारतातील द्रोणपर्वात एक कथा आली आहे. त्यात योगमार्गांतील गूढ अनुभवांचे निवेदन कथारुपाने आले. द्रोणपर्वांतील अध्याय 52 ते 55 पर्यंतच्या मृत्यू आख्यानात ती आली आहे. कथेतील नावेसुद्धा त्या अतिसूक्ष्म आणि दिव्य अवस्थांची बिनचूक वर्णने करणारी आहेत. प्रकृतीची मूलावस्था स्
गोंदिया वन विभागातील दासगाव वनपरिक्षेत्रामध्ये आज सकाळी एका नर वाघाचा मृतदेह आढळून आला (tigers died). प्रथमदर्शनी या वाघाचा मृत्यू अज्ञात संसर्गामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे (tigers died). मात्र, नववर्षाच्या गेल्या चौदा दिवसांमध्येच राज्यात सहा वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (tigers died)
Jhansi Hospital Fire उत्तर प्रदेशातील झाँशी येथील राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथील एनआयसीयू वॉर्ड येथे शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून १० नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ हून अधिक लहान मुले जखमी झाली आहेत. वॉर्डात ४९ मुले दाखल होती, त्यापैकी ३७ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते.
एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Uttarakhand bus accident) झाला असल्याची घटना उत्तराखंड येथील अल्मोडा येथे घडली आहे. या अपघातात ४० प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच्या सुमारास घडली आहे.
Hezbollah Deaths लेबनॉन येथे पेजर स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटाबाबत एका मोठा खुलासा झाला. हिजबुल्लाहच्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून मृतांच्या संख्येची माहिती आढळून आली आहे. दळणवळण उपकरणांच्या स्फोटात एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत. ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत.
शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात तीन वाघांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी सावली वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. गेल्या दीड महिन्यात चंद्रपूरात सात वाघांचा मृत्यू झाला असून यंदा राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या वाघांची संख्या ५० वर गेली आहे.
ट्रॅक्टरने स्टंट करत असताना पंजाबमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. सुखमनदीप सिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून स्टंट करत असताना त्याच ट्रॅक्टरखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ३७ वाघांचा ( tigers) मृत्यू झाला आहे. यामध्ये नैसर्गिक कारणांनी मृत्यूमुखी पडलेल्या वाघांच्या संख्येनंतर सर्वाधिक संख्या ही विजेच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या वाघांची आहे. याविषयी वनमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन झाले आहे. गुरुवारी रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
राजस्थानमध्ये दोन गटांतील वादामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
इस्त्रायल आणि हमासमध्ये अजूनही युद्घ सुरुच आहे. इस्त्रायलकडून गाझावर हल्ले सुरुच आहेत. या युद्धामध्ये हजारों निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. दरम्यान, आतापर्यंत गाझामधील मृतांची संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे.
इस्त्रायल आणि हमासमध्ये अजूनही युद्ध सुरुच आहे. दरम्यान, इस्त्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. तर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या असंख्य लोकांना ओलिस ठेवले आहे. यातच गुरुवारी एका १२ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता चांगलेच चिघळले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर केलेल्या हवाई हल्ल्यात ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. १७ ऑक्टोबर रोजी अल-अहली हॉस्पिटलवर हा हल्ला करण्यात आला आहे. इस्रायलच्या सैन्याने हे आरोप फेटाळले आहेत.
सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत. या पुरात भारतीय लष्कराचे २३ जवानही बेपत्ता झाले होते. अद्याप त्यांचा शोध सुरुच आहे.
नांदेड दुर्घटनेचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले असून शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीत शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांबाबत सरकारने काय केलं असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.
नांदेड दुर्घटनेचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले असून शुक्रवारी राज्य सरकारकडून याबाबत उत्तर दाखल करण्यात येणार आहे. यावेळी नेमके कशामुळे मृत्यू झाले याबाबतची माहिती राज्य सरकाकडून देण्यात येणार आहे.
सिक्कीममध्ये बुधवारी अचानक ढगफुटी झाल्याने तिस्ता नदीला पूर आला. या घटनेत आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १०२ लोक बेपत्ता आहेत. यात २३ लष्कराच्या सैनिकांचाही समावेश आहे. सिक्कीममधील विवध भागांतील आठ पुल उध्वस्त झाले आहेत.
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. गुरुवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार आहे.
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. अजूनही हा मृत्यूचा तांडव सुरु असून मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे. या सगळ्या प्रकारावर आता भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये २ नवजात बालकांचाही समावेश आहे.
हिमाचलमधील शिमला येथील शिव बावडी मंदिरातून आणखी एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे प्राध्यापक पीएल शर्मा यांचा आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या बचावकार्यात आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.
राज्यात अनेक दिवसांनंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी एका ३२ वर्षीय महीलेचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला असून या प्रकरणी चारकोप पोलिसाकडून संबंधित डंपर चालक राहुल यादव यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
Bharat Jodo Yatra : वायनाडचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दक्षिण तेलंगणातुन महाराष्ट्रात दाखल झाली. पण या यात्रेत दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवार ( ७ नोव्हेंबर २०२२) रोजी काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हि घटना ताजी असतानाच गुरुवार ( १० नोव्हेंबर २०२२ ) रोजी भारत जोडो यात्रेतील गणेशन (६२) आणि सायकुल (३०) या दोघांना आयचार ट्रक ने उडवले. त्यातील गणेशन यांचा मृत्यू झाला आहे. तर सायकुल यांची प्रकृत
कप्पन सिद्दीकी याला सर्वोच्च न्यायालयातून नुकताच जामीन मिळाला. 2020 साली हाथरसमध्ये दोन समाजात विद्वेष पसरवण्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. त्याला जामीन मिळाल्यामुळे तथाकथित विचारवंत आणि पुरोगाम्यांमध्ये एक आनंदाची लाट उसळली. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी असे मत मांडले आहे की, कप्पन सिद्दीकी हा ‘पीएफआय’ या कट्टरतवादी संघटनेशी संबंधित असून तो ‘सीएए’ तसेच राममंदिर विरोध संदर्भातील देशविरोधी कारवायांशी निगडित आहे. या अनुषंगाने कप्पन सिद्दीकी आणि ‘पीएफआय’च्या दहशतवादी मनसुब्यांचा आढावा घेणारा हा लेख...
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात २६ जानेवारी २०१८ रोजी काढण्यात आलेल्या 'तिरंगा यात्रे'वर इस्लामिक कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात चंदन गुप्ता उर्फ अभिषेक ठार झाला. तिरंगा यात्रेत सहभागी असलेल्या लोकांवर गोळीबार करण्यात आला, दगडफेक झाली. चंदनच्या वडलांनी त्यांची व्यथा मांडली आहे.
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गव्हा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपी ला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
राजुरा विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर बुधवारी दि. १० ऑगस्ट रोजी पाहटे एका सब अडल्ट वाघाचा मृत देह आढळून आला. पहाटेच्या सुमारास या वाघाला भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने धडक दिली. बल्लारशाह-काझीपेठ सेक्शनवरील राजुरा-कन्हाळगाव दरम्यानच्या रूळाजवळ सुमारे दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला. ही धडक इतकी भीषण होती की वाघाचे शरीर अर्धवट उरले. डोके आणि पाय नाहीसे झाले होते.
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील एका कारखान्यात बुधवारी दि. ३ ऑगस्ट रोजी टाकी साफ करताना विषारी वायू घेतल्याने उत्तर प्रदेशातील चार कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन बेशुद्ध पडले, असे पोलिसांनी सांगितले. बेशुद्ध पडलेल्या दोन कामगारांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते झज्जरच्या बहादूरगडच्या रोहाड येथील औद्योगिक परिसरात असलेल्या युनिटमध्ये कचरा टाकी साफ करत होते. हा कारखाना वाहनांसाठी गॅस किट बनवतो, असे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. ट्रक एका गर्भवती महिलेच्या अंगावरून गेला. या अपघातात महिलेचे पोट फाटले. तिच्या पोटातील चिमुरडी ५ फूट दूर गेल्यावर रस्त्यावर पडली. ज्याने ही घटना पाहिली त्याचा आत्मा हादरला. महिलेच्या शरीराचे तुकडे झाले. लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता मुलगी सुखरूप होती.
मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. नदी पात्रातून आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्वांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये एसटीचे चालक आणि वाहक यांचाही समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
राजस्थानच्या बिकानेर येथील एका सेवानिवृत्त पोलिसाने ढगफुटीमुळे आलेल्या पूरमध्ये बुडण्यापासून अनेकांना वाचवले, परंतु स्वतःचे प्राण गमावले आहेत. दक्षिण काश्मीर हिमालयातील अमरनाथ गुहेच्या मंदिराजवळ वाहत्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुशील खत्री हे बिकानेर येथील गंगानगर वाहतूक पोलिस स्टेशनचा माजी प्रभारी होते. दुर्घटनेच्या अवघ्या नऊ दिवस आधी ते सेवेतून निवृत्त झाले.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवार दि. ०८ रोजी संध्याकाळी निधन झाले. आबे यांच्यावर नारा शहरात शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी गोळीबार करण्यात आला होता. आबे हे पश्चिम जपानमध्ये भाषण करत असताना त्यांच्यावर मागून हल्ला करण्यात आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांचे निधन झाले आहे
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची आज नारा शहरात एका प्रचार कार्यक्रमात भाषण करत असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ४० वर्षीय हल्लेखोराने जपानच्या पश्चिम भागात माजी पंतप्रधानांवर दोन वेळा गोळ्या झाडल्या. त्यांच्या निधनावर जागतिक नेते शोक व्यक्त करत असताना, पंतप्रधान मोदींनी शनिवारी दि. ९ जुलै रोजी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. शिंजो आबे यांचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळचे नाते होते.
लाल डोंगरमधील नागरिक भीतीखाली ; पुनर्वसनासोबत स्थलांतरणाची मागणी
महाराष्ट्रातील अमरावतीच्या उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेताच या भीषण हल्ल्याचे नवे तपशील समोर आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
कोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी वनपरिक्षेत्रात आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. हा वाघ ५ ते ६ वर्षांचा असून मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कळु शकले नाही असे वन विभागाने सांगितले. यंदा राज्यात १५ वाघांनी आपला जीव गमावला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी २२ जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौक आणि इतरांविरुद्ध आरोपपत्राचा मसुदा दाखल केला. विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी विशेष न्यायालयासमोर ही बाजू मांडली. ते म्हणाले की, विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील सर्व आरोपींविरुद्ध फिर्यादीने आरोप कायम ठेवले आहेत. विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.
गेल्या दहा वर्षात रेल्वे गाड्यांच्या धडकेमुळे जवळपास 186 हत्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे.अशातच आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नवीन उपाययोजनांचा शोध घेत आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये तुटपुंज्या उपाययोजना केल्या जात आहेत. अलीकडील काळात, महाराष्ट्रातही रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता.
सह्याद्री वाहिनीचे सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या.
नुकतेच बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाच्या बातमीमुळे सर्वांना धक्का बसला असतानाच त्याच्या चेहऱ्यावरील जखमेमुळे हा मृत्यू अनैसर्गिक आहे असे म्हणणे होते.