अभिनेता भरत जाधव यांनी नुकतेच नाट्यगृहांतील दुरावस्थेवर आसूड ओढले आणि त्यानंतर प्रेक्षकांची माफी मागत पुन्हा रत्नागिरीत प्रयोग ठेवणार नसल्याची माफी मागितली. त्यानंतर, नाट्यगृहाच्या सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दरम्यान जिगीषा निर्मित चारचौघी या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या नाट्यगृहाचे कौतुक करताना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडीओ केला आहे.
Read More
महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा तशी फार पूर्वीपासूनच लाभलेली. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःख जशी वेगळी, तशीच तिची सुखसुद्धा अनाकलनीय! १९८४च्या काळात गाजलेलं महिला दिनाचं नाटक म्हणून ‘चारचौघी’ला मिळालेली लोकप्रियता आता स्त्रीभावविश्वाची तरल मांडणी म्हणून प्रसिद्ध होते आहे. स्त्रीमनाचा आणि एकूणच समाज मानसिकतेचा वेध घेताना काळाशी त्याचा फारसा संबंध नसतो, हे त्यातून अधोरेखित होते. प्रशांत दळवींनी लिहिलेले हे नाटक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले. आता तब्बल ३० वर्ष
महाराष्ट्राला समर्थ स्त्री व्यक्तिरेखांची सशक्त परंपरा फार पूर्वीपासून लाभली आहे. स्त्रीच्या मनाचा थांग लावता येत नाही, तिची दुःखं जशी वेगळी तशीच तिची सुखं सुद्धा अनाकलनीय. या अशाच इतरांसारख्या चारचौघी. प्रत्येकीची स्वप्न वेगळी, प्रत्येकीची कथा वेगळी आणि जगही वेगळं. पण एकमेकींसोबतचं नातं मात्र एकदम घट्ट.