शिक्षण आणि व्यक्तिविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने एक अभिरुची जोपासना कार्यशाळा’ आयोजित केली आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत म्हाळगी प्रबोधिनीच्या केशवसृष्टी, उत्तन येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात ही कार्यशाळा होणार आहे. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, चित्रकला, शिल्पकला इत्यादी कलांचा जागर या निमित्ताने होणार आहे.
Read More
"कलेचे रसग्रहण करण्याच्या दृष्टीने केवळ कलाकारानेच नव्हे, तर रसिकांनीही रियाज करायला हवा.", असे मत सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित अभिरुची जोपासना कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी अंबरीश मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासक प्रा. केशव परांजपे उपस्थित होते. (Abhiruchi Jopasna Karyashala RMP)
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा भाग असलेल्या आयआयडीएल इंडियन इन्स्टिटयूट ऑफ डेमॉक्रेटिक लीडरशीप (IIDL) या संस्थेने नुकतीच आपली पाच वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने आयआयडीएलच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे.
“घराणेशाही ही राजकारणाला लागलेली कीड असून, यामुळे पक्षातील कार्यकर्त्यार्ंचा विकास आणि संघटनेची प्रगती खुंटत जाते. एखाद्याच्या कर्तृत्वासमोर अडथळे आणि आव्हान निर्माण करण्याचे काम हे घराणेशाही करत असते,” असे मत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले. ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’तर्फे गुरुवार, दि. २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ’गुरुवार सभा’ या बौद्धिक मंथन उपक्रमात ते बोलत होते.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक-आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केशव सृष्टी, भाईंदर येथील प्रशिक्षण व संशोधन संस्थेसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासन प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, मार्केटींग ऑफिसर, संशोधन प्रमुख आदी पदांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.
भारताच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमूलाग्र बदल घडविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
परिषदेमध्ये ‘मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ या प्रवासातील वैशिष्ट्ये, योजनांची यशस्वी अंमलबजावणी, मोदी सरकार आणि सामाजिक, शैक्षणिक विकास, ‘मोदीनॉमिक्स’ संकल्पनेची वैशिष्ट्ये, नवीन शिक्षण धोरण, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पर्यावरणीय समस्यांविषयी मोदी सरकारची दृष्टी, परराष्ट्र धोरणातील यश, कृषी क्षेत्रातील सुधारणा, सामाजिक न्याय व महिला सक्षमीकरण आदी विषयांवर चर्चा तसेच ‘पेपर प्रेझेंटेशन’ होणार आहे. यामध्ये अर्थतज्ज्ञ, लेखक, विविध माजी राजदूत, सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. यापैकी तीन ठिकाणी सत्ताधारी पक्ष सत्तेत कायम राहिले, तर दोन ठिकाणी सत्तापालट झाला. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणत्या एका राजकीय पक्षाचे झाले असेल, तर ते भारतीय ‘ग्रॅण्ड ओल्ड पार्टी’चे म्हणजे काँग्रेसचे!
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यकारणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे (RMP) ऑगस्ट महिन्यात महाMTB, ऑप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने #Tweet4Bharat नामक पहिली ट्विटर थ्रेड स्पर्धा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर ट्विट करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ज्यात सर्वोत्कृष्ट ट्विटला विषयानुसार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे 'न्यु इंडिया स्टार्टअप कॉनक्लेव्हचे आयोजन
मायानगरी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हजारो मुले महाराष्ट्रातून तसेच परराज्यांतून विविध कारणांसाठी दाखल होतात. त्यांची न कुठे दखल, ना कुणाला चिंता...
काही कथित पुरोगामी, उदारमतवादी पत्रकारांनी आणि त्यांच्या माध्यमसमूहांनी संघाला खलनायक ठरवायचेच आणि ते नाही जमले तर किमान संघाभोवती अकारण संशयाचे धुके निर्माण करून आपला अजेंडा पुढे रेटायचा, हे धोरणच आखले आहे. त्यामुळे नसलेला मुद्दा उकरून काढणे माध्यमांना जमले.