देशातील गिग कामगारांच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच एक महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या गिग कर्मचाऱ्यांना लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून पेन्शन योजना लागू केली जाणार आहे
Read More
मुंबई : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. त्यामुळे मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे ( Ek Khidki ) तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६,००० घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २२६४ सदनिकांच्या विक्रीकरिता जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ०६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
सिडकोच्या बहुप्रतिक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेसाठी केवळ चोवीस तासात बारा हजार अर्ज प्राप्त झाले आहे. दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू झालेल्या या योजनेच्या पहिल्या २४ तासांतच १२,४०० ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ११ ऑक्टोबर रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटासाठीच्या या या योजनेचे उदघाटन करण्यात आले.
संगणकापासून ते अगदी भाजीपाल्यापर्यंत ऑनलाईन वस्तूंची खरेदी ही आता भारतीयांच्या सवयीचा एक अविभाज्य भाग. त्याच पठडीत पुस्तकांचीही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री जगासह भारतातही होताना दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी ‘ऑनलाईन सेल’ झळकणार असून, यादरम्यान पुस्तकांवरही मोठ्या प्रमाणात सवलती पाहायला मिळतात. त्यानिमित्ताने भारतातील ऑनलाईन पुस्तक खरेदी-विक्रीच्या वाढत्या प्रमाणाविषयी विविध पुस्तके विक्री करणारी संकेतस्थळे, काही प्रकाशन संस्था आणि वाचक यांच्या प्रतिक्रियांचा घेतलेला हा कानोसा...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून त्यासाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी गर्दी केलीये. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणं आणि त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीये. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया.
मुंबईकरांना तात्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी टाटा पॉवरने संपूर्ण डिजिटलाईज्ड सेवा सुरु करून ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्याच्या प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. या नव्या प्रक्रियेमुळे आता नवीन वीज जोडणी केवळ ७ दिवसांमध्ये मिळू शकते.
गर्दीच्या काळात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ऑनलाईन आरक्षण सुविधा सुरु केली आहे. या अदयावत आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. ही प्रणाली सुरू झाल्यापासून पाच महिन्यात १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची ऑनलाईन विक्री झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
दि. ०१ नोव्हेंबर २०२३ ते दिनांक ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणा-या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सोमवार, दिनांक ०६ मे पर्यंत हयातीचे दाखले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन – आय.बी.) विभाग येथे ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत अथवा, केंद्र शासनाच्या ‘जीवनप्रमाण'या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
विश्व मराठी परिषद आयोजित नुवादकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा सुप्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी घेणार आहेत. दिनांक 22 ते 25 एप्रिल या कालावधीत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. वेळ संध्याकाळी ८ ते ९ अशी एक तास असणार आहे. या कार्यशाळेत प्रश्नोत्तरासाईट अनुवाद प्रत्यकशिके करून दाखवली जाणार आहेत. या ४ दिवशीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ प्राप्त होणार आहे.
ऑनलाईन लॉटरीचे हफ्ते सरकारला जात आहेत की, संजय राऊतांना मातोश्रीसाठी हफ्ते जमा करायचे आहेत याबद्दलचे पुरावे माझ्याकडे येत आहेत, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना ऑनलाईन लॉटरी आणि जुगारासंदर्भात पत्र लिहीले. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT), दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बी.ए., बी.कॉम., एम.ए. आणि एम.कॉम. या दूरस्थ शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी शुक्रवार, दिनांक २३/०२/२०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी ऑनलाईन गेमिंग ॲपवर चर्चा पार पडली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भुमिका स्पष्ट केली. यावेळी ऑनलाईन गेमिंग प्रकरणी स्वतंत्र कायदा तयार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
डीजिटल लॉकर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र मोबाईलमद्धे डिजीटल लॉकरच्या माध्यमातून ऑनलाइन स्वरूपात ठेवता येणार आहेत.
देशात ईकॉमर्स क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने या क्षेत्रासाठी एक नवीन फीचर आणले आहे. ईकॉमर्स क्षेत्रात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे ऑर्डर ट्रॅकिंग. गुगलने याच महत्वाच्या प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून हे नवीन फीचर डिझाईन केले आहे. या नव्या फीचरनुसार आपण आता जी - मेल इनबॉक्स मधून आपण बुक केलेली ऑर्डर आपल्या जीमेल वरून ट्रॅक करू शकतो. लवकरच आपल्या जीमेल इनबॉक्समध्ये हे फीचर ऍड झालेले आपल्याला दिसेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याचा अंतिमतः ग्राहकांना फायदाच होणार आह
‘सायबर क्राईम’पासून नागरिकांनी सुरक्षित राहावे, यासाठी आतापर्यंत दीड हजारांहून अधिक मोफत सेमिनार घेणार्यार आणि दीड कोटींहून अधिक नागरिकांना सायबर सुरक्षेविषयी जागृत करणार्याद सायबरतज्ज्ञ शैलेश जारीया यांच्याविषयी.
अँप आधारीत शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या बायजू ( byju's) कंपनी सध्या प्रचंड आर्थिक तोट्याचा सामना करत आहे. या तोट्यावर बायजूने कर्मचारी कपातीची शक्कल लढवली आहे. २०२३ पर्यंत बायजू कंपनीच्या २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. ही कर्मचारी कपात करून बायजू आपला तोटा कमी करणार आहे. सध्या बायजू कंपनी ४ हजार कोटींहून अधिकच्या तोट्याचा सामना करत आहे. अँप आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या ऑनलाईन प्लँटफॉर्म्समध्ये बायजूने गेल्या काही वर्षात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. सुरुवातीला फक्त श
जुलै महिना संपण्याची वेळ आली तरी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सीबीएसईच्या निकालामुळे अकरावी प्रवेश रखडलेले असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन सप्टेंबरअखेरपर्यंत कॉलेज सुरू झाल्यास
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबई भाजपच्यावतीने कोंकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमानी आणि गणेशभक्तांसाठी विशेष मोदी एक्सप्रेस धावणार आहे.
संगणक, मोबाईल, ऑनलाईन व्यवहार या साधनांचा उपयोग हल्ली मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.
शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा.
‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन्स’ (पीएम केअर) या योजनेअंतर्गत सोमवार, दि. ३० मे रोजी अनाथ बालकांना लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘वेबकास्ट’/‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे देशभरातील निवडक अनाथ बालकांशी संवाद साधणार आहेत.
‘लॉकडाऊन’मध्ये आपण नोकरी-व्यवसायात जशी लवचिकता आणली, ‘डिजिटल’ पार्श्वभूमी मजबूत केली, ऑनलाईनची नवी लवचिक ‘मॉडेल्स’ वापरली, तसेच काही नवीन नियोजन स्त्रियांसाठी करायला पाहिजे, तरच त्यांना विधायकदृष्ट्या जगता येईल.
रोखीने व्यवहार करायचे नसतील, तर ‘डेबिट कार्ड’, ‘के्रडिट कार्ड’ व ‘पे-लेटर कार्ड’ हे पर्याय उपलब्ध आहेत. या तिन्ही कार्ड्सचे वेगळेपण काय व कुठले कार्ड चांगले, याविषयीची माहिती देणारा आजचा लेख...
भारतीय संस्कारासाठी वेगळ्या आयामाने कार्य करणार्या स्वाती इंदुलकर. तंत्रज्ञान ते संस्कृती-संस्कार असा दिप्तीमान प्रवास असणार्या स्वाती इंदुलकरांच्या जीवनकार्याचा मागोवा इथे घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यसराकरकडून ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेत आहेत असे अभिमानास्पद वक्त्व्ये शिक्षण मंत्र्यांकडून वारंवार करण्यात आली. पण आता राज्यातील तब्बल ६७ टक्के मुली ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयीन परीक्षांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेईल याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असतील की ऑफलाईन स्वरूपात याबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. सोमवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कार्तिक नावाच्या एका अंधविद्यार्थ्याने ऑफलाईन परीक्षेदरम्यान लागणाऱ्या मदतनीसाच्या मागणीसंदर्भात ठाकरे सरकारकडे विनंती केली आहे.
आधुनिक काळात सार्वभौम व्यवस्थेने लागू केलेले (केंद्रीय म्हणजेच रिझर्व्ह बँक हे त्या सार्वभौम व्यवस्थेचे प्रतीक) चलन हेच अधिकृत चलन या व्याख्येत बसते, हे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. हे डिजिटल सार्वभौम चलन असेल.
शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते. सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या वादाबद्दल विद्यार्थांकरीता त्यांनी आपलं मत पत्रकारांसमोर मांडलं. "ऑनलाईन परीक्षा म्हणजे कायमस्वरूपी उपाय नव्हे.", असं वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
मुंबई विद्यापीठाने एप्रिल - मे दरम्यान होणाऱ्या बहुतेक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबईतील बऱ्याच महाविद्यालयांनी त्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरु केले आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण अचानक बंद करून ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाणे महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प १० फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात सादर झाल्याने सादरीकरणात गोंधळ उडाला असून यावर काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आपण १५-२० वर्षे वयाच्या तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी खेळतो आहोत, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. सवलती मागणारे विद्यार्थी, त्यांना चिथावणी देणारे पुढारी अन् घरात मूग गिळून बसलेले अस्वस्थ पालक यातून निर्माण होणारे भवितव्य, हे कोरोनापेक्षाही अधिक गंभीर असणार, हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही.
मुंबई महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरूवार, ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी तो सादर केला. मात्र नेहमी होणाऱ्या सभांप्रमाणे हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात न घेता तो प्रत्यक्षात सादर केला गेला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात होणे हे मुंबईकरांचे दुर्दैव असल्याची टीका भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली हाती. त्यामुळे मुंबई महापालिकेला प्रत्यक्षात अर्थसंकल्प सादर करणे भाग पडले.
भारत आणि इस्राएल यांच्यात असलेल्या मैत्रीच्या संबंधांना सोमवारी ३० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून एका विशिष्ट लोगोचे अनावरण यादिवशी करण्यात आले.
“भारतीय युवकांमधील उद्योजकता, नवोन्मेष, नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याची क्षमता आज वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. ही परिस्थिती जागतिक भागीदारांनाही नवी ऊर्जा देणारी आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगासाठी भारतात गुंतवणूक करण्यासाठी अतिशय योग्य काळ आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ला ‘ऑनलाईन’ पद्धतीने संबोधित करताना केले.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक-आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते.
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
कॅशलेसच्या जमान्यात अनेक जण ऑनलाईन ट्रानझॅक्शन करणे पसंद करतात. मात्र देशात गेल्या तासाभरापासून यूपीआय सर्व्हर डाऊन झाले असून पेमेंट सुविधा ठप्प झाली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाने new education policy विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक कौशल्याचा विकास होऊन तो नोकरी मागणारा नाही, तर इतरांना नोकरी देणारा होईल व भविष्याचा वेध घेण्याच्या त्याच्या दृष्टीचा विकास होईल असे मला वाटते. भारत जगाचा नेता व्हावा असा धोरण ठरविण्यामागे दृष्टिकोन आहे. हा शिक्षणातील क्रांतीचा आराखडा आहे. याची अंमलबजावणी जर ठरल्याप्रमाणे झाली तर आपण निश्चितच जागतिक दर्जा गाठू याची मला खात्री आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१-२२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा
मोबाईल, संगणकाचा वापर करुन ऑनलाईन बँकिंग व्यवहार ही आता नित्याची बाब झाली असली तरी असे डिजिटल व्यवहार करताना फसवणुकीचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यामुळे वारंवार ग्राहकांना विविध माध्यमातून यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येते. तेव्हा, आज ‘भारतीय ग्राहक दिना’निमित्त ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाच्या छोट्या-मोठ्या खबरदारीच्या उपाययोजनांविषयी... banking fraud
एकविसावे शतक उजाडले आणि देशाच्या गावपाड्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने पकड मजबूत केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये संगणकापासून ते ‘५जी’ पर्यंतच्या प्रवासाची प्रक्रिया या देशाने अनुभवली आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात शेतीमध्ये स्वयंपूर्ण होण्याची स्वप्न बघणारा आपला देश एकविसाव्या शतकामध्ये जागतिक पातळीवर सर्वात जास्त मोबाईल आणि समाजमाध्यमांचा पगडा असणारा आणि त्याची मोठी बाजारपेठ असणारा देश ठरला आहे. ही मुळात या देशाच्या विकासप्रक्रियेची आणि आपल्या देशाच्या प्रगतीची खूणगाठ आहे. आपला देश विकास आण
राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा अहवाल
तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे नागरिकांसाठी लस उपलब्ध होण्यात अडचणी असताना शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत श्वानांच्या लसीकरणासाठी दीड कोटी रुपयांची मंजुरी घेण्यात आली.
आजच्या डिजिटल युगात आपले बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन पार पडतात. पण, हल्ली या ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढलेले दिसते. तेव्हा, या सायबर गुन्ह्यांपासून एकूणच सावध कसे राहायचे, नेमकी काय खबरदारी घ्यायची, यासंबंधीची माहिती आजपासून दर रविवारी आपण ‘सायबर सुरक्षा’ या नवीन लेखमालिकेतून वाचकांसमोर मांडणार आहोत. आज या लेखमालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेऊया 'फिशिंग’विषयी...
सध्याच्या काळात जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष संपर्कात येऊन शिकणे शक्य नाही तेव्हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म संस्थेचा मुले मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेत आहेत. दिल्ली किंवा पुण्याला जाऊन अभ्यास करण्यापेक्षा घरी बसून अभ्यास करणे हे अधिक सोयीस्कर आणि स्वस्त झाले आहे .
मुंबई शहरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यात मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी ही आंदोलन केले.यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विद्यार्थ्यांवर ही दडपशाही का असा सवाल यावर विद्यार्थी व विरोधकांनी विचारला.
नोव्हेंबरमध्ये चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार धक्का दिला, त्यांच्या अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ निलंबित केला
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे.