अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी आम्ही नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
Read More
अयोध्या : अयोध्येतील संत महातांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहाती प्रभू श्रीरामाचे आयुध असलेला धनुष्यबाण विधिवत सुपूर्त करून धर्माचे राज्य निर्माण करण्याचा आशीर्वाद देण्यात आला. लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अयोध्येतील महंतांचा यथोचित सन्मान करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शुभआशिर्वादही घेतले.
रश्मी उद्धव ठाकरे जेव्हा सामनाच्या संपादकपदी नियुक्त झाल्या त्यावेळी त्यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही संजय राऊतांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या होत्या. ही गोष्ट राऊत विसरले असतील पण विसरलेलो नाही, असा गौप्यस्फोट माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.
"उद्धव ठाकरे यांनी आपला शिवसेना पक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधला, अशी टीका माजी आमदार आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात जामगे या गावातील आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांचे पुत्र योगेश कदम आमदार असताना अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी पुरवला, असा आरोपही त्यांनी केला.
"उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या बडव्यांनीच त्यातही मिलिंद नार्वेकरांनीच अर्धी शिवसेना संपवली, कशी संपवली हे उद्धव यांना कळले सुद्धा नाही" अशा शब्दांत आरोप करत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर निशाणा साधला आहे
शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची अधिकृत हकालपट्टी झाली. शनिवारी दि. २३ जुलै रोजी खेड तालुक्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची महत्वाची बैठक भरणे नाका येथील हॉटेल बिसू या ठिकाणी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
"बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे मी लवकरच माध्यमांसमोर उघड करणार आहे. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली हेही स्पष्टपणे लवकरच सांगणार आहे. आदित्य यांचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा आम्ही राजकारणात जास्त वर्ष घालवली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नाही.", अशी बोचरी टीका करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी (दि. २२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकार परिषदेत ढसाढसा रडणाऱ्या माजी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी कदमांनी केलेल्या सर्वच आरोपांना प्रत्युत्तर देत घणाघात केल्याचे समजते आहे. रामदास कदमांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोपही ठाकरेंनी केला आहे. "त्यामुळे ाता तुम्ही रडण्याची ढोंगंसोंगं करू नका,", असेही ठाकरे म्हणाले. "शिवसैनिक तुम्हाला पुरते ओळखून आहे," असा पलटवारही त्यांनी केला आहे.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर केले आरोप
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा कोकण दौरा सुरू आहे. पाटील दापोलीत येण्यापूर्वीच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोकणातील नेते रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजीनंतर आता त्याचे पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. रामदास कदम यांच्या विधान परिषद आमदारकीचा कालावधी लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना पुन्हा एकदा खेडच्या मतदार संघातून जागा मिळेल, अशी शाश्वती नाही.
दसरा मेळाव्यात भाजप विरोधाचे प्रवचन पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांनी झोडल्यानंतरही शिवसेनेत मात्र पक्षांतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पार पडणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना नेते रामदास कदम हजर राहणार नाहीत. रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपनंतर शिवसैनिकांमध्ये कदमाविरोधांत संतापाचे वातावरण आहे. मात्र, रामदास कदम यांनी एक पत्र लिहून प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आपण दसरा मेळाव्याला उपस्थित न राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याना दिली आहे.
ठाकरे सरकारला मुद्दाम अडचणीत आणण्याचा रामदास कदमांचा प्रयत्न?
रामदास कदम यांना मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे निलेश राणे यांनी केली त्यांच्यावर टीका
कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील या 'जादुई' राज्यकर्त्यांकडे आता शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना वेळीच आवरणे आवश्यक झाले आहे.
अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. तसेच अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.
राज्यात प्लास्टिक बंदीचे धोरण स्विकारले असल्यामुळे प्लास्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरात असलेले प्लास्टिक निरूपयोगी होणार
पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी परदेशात पलायन केलेला उद्योगपती नीरव मोदी याचा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिल्या.
तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबईकरांना प्लास्टिक पिशव्या वेगळ्या ठेवायला सांगून, ही प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पालिका सोडवू शकली असती!
केवळ आपल्या शुभेच्छा आणि ‘करून दाखवलं’ या सदरातील विविध कार्यांची प्रसिद्धी करताना अनेकविध अडथळे आले असते, त्यामुळे कदाचित ‘आदित्य’ला ‘अर्घ्य’देताना ‘दासां’ना बॅनरवरील बंदीचा विसर पडला असावा...
'आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि शिवसेनाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजपने संगनमताने शिवसैनिकांची हत्या केली आहे.' असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज केला आहे. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
प्लास्टीक बंदी हवी हे अगदी खरं असलं तरी ज्यांना मुंबई बाहेरील जगचं ठाऊक नाही त्या युवराजांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी हा निर्णय घेणे नक्कीच व्यवहार्य नाही. कारण प्लास्टीकला अद्याप अन्य पर्याय उपलब्ध नाही, त्यातच कोणत्याही जनजागृतीशिवाय ही बंदी लादली गेली