...आणि ‘पीसमेकर’ तोफ मागच्या बाजूने फुटली. जहाजाच्या डेकवर अतितप्त लोखंडाचा वर्षाव झाला. धूर विरल्यावर असं लक्षात आलं की, गृहमंत्री एबल अप्शर, आरमारमंत्री टॉमस गिलमर आणि खासदार डेव्हिड गार्डिनरसह एकूण आठ जण जागीच ठार झालेत; तर ३०-३५ जण गंभीर जखमी झालेत. म्हणजे राष्ट्राध्यक्ष जर वेळेवर वर आला असता, तर तो साहजिकच गृहमंत्री आणि आरमारमंत्री यांच्यामध्ये उभा राहिला असता. आत्तापर्यंतचा निष्कर्ष असा होता की, राष्ट्राध्यक्ष खालच्या डेकवर गप्पा मारत थांबला, म्हणून बचावला. पण आता नव्या संशोधनानुसार तो जिन्यावर सामुदा
Read More