पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
Read More
ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमात्मस्वरुपाचे आकलन होऊ लागते. ते स्वरुप सर्वत्र भरून राहिले आहे. त्या व्यतिरिक्त अन्य दुजेपण नाही, असे मनाला वाटू लागते. पुढे नंतर ही जाणीवही मावळल्यावर मनाची उन्मनी अवस्था होते. या तुर्यातीत अवस्थेत, शब्द किंवा भाषाही उरत नाही. सर्वत्र रामाचे दर्शन होऊ लागते, असे स्वामींनी मागील श्लोकात सांगितले आहे. ही परमात्मस्वरुपाची अनुभूती येऊ लागल्यावर मन त्याला कसे सामोरे जाते, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत. ही अनुभूतीची प्रक्रिया असल्याने, मागील श्लोकातील विचाराचा हा पुढील भाग आ
Punyashlok Ahilyadevi Holkar भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, सुराज्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या इतिहासाच्या पानातील एक नक्षत्र म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. देदीप्यमान ज्योती म्हणून अहिल्यादेवीचे नाव चिरस्थायी आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्ताने गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांतून त्यांचे प्रेरणादायी चरित्र आणि अलौकिक योगदानाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच मालेतील एक प्रकट कार्यक्रम राजा शिवाजी विद्यालय प्रांगण, दादर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील. Dattatray Hosbale in Mumbai
मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. त
मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे,
राजयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग असे एकुण चार मार्ग आहेत. केवळ भारत मातेची साधना करायचा ज्यांचा संकल्प होता, ज्यांच्या भक्तीमध्ये संघ आणि भारतभूमी होती, ते जामसाहेब मुकादम संघसमर्पित योगीपुरुष होते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. Bhaiyyaji Joshi Ghatkopar News
विश्वातील अगम्य घटनांच्या न समजणार्या कार्यकारणभावाच्या अथवा निमित्तकरणाच्या जिज्ञासेतून, ‘देव’ कल्पना उदय पावली. लोक आपण शोधलेल्या देवाला श्रेष्ठ मानून, त्याची पूजा, उपासना करू लागले. त्यात वेदात वर्णन केलेल्या, कुलपरंपरेनुसार अथवा भीतीपोटी आलेल्या, अनुकरण करण्यातून आलेल्या अनेक देवदेवतांना लोक भजू लागले. त्यामुळे ‘जगी पाहता देव कोट्यान्कोटी’ अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला आपापल्या देवाचा, भक्तीचा वृथा अभिमान होऊन, गर्व निर्माण झाला. इतरांच्या देवकल्पनेला तो तुच्छ मानू लागला. पुढे क्षेत्रदेवाची कल्प
मुंबई विद्यापीठाच्या बाळ आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी समारंभाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात ‘अहिल्यादेवी होळकर : एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने परिसंवादातील विचारमंथन मांडणारा हा लेख...
आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरर
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ( Punyashloka Ahilyabai Holkar ) यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या मुंबई येथील कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन शुक्रवार, दि. १० जानेवारी व शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
कविता विभावरी लिखित व दिग्दर्शित ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ या हिंदी नाटकाचा शनिवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘विष्णु अँड लक्ष्मी पार्क, महाराजा अग्रसेन मार्ग, बन्गुर नगर, गोरेगाव वेस्ट, मुंबई – ४०००९०’ येथे प्रयोग होणार आहे.
मनाच्या श्लोकांतील श्लोक क्रमांक १६३ पासूनच्या पुढील काही श्लोकांची शेवटची ओळ ‘सदा संगती सज्जनाची धरावी’ अशी आहे.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा ( Sadhvi rutambhara ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी दुपारी ३ वाजता तब्बल ३ हजार महिला व तरुणींच्या भव्य संचलनातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राणी दुर्गावती
पारमार्थिक आचरणात तर अहंभाव हानिकारक ठरतो. यासाठी स्वामी, ‘अहंतागुणे सर्वही दु:ख होते’ असे म्हणतात. हे आपण मागील तीन, चार श्लोकांतून पाहिले. या पुढील श्लोकात स्वामी देहबुद्धी कशी घातक आहे, यावर भाष्य करीत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या त्रिशताब्दी आणि राणी दुर्गावती जयंतीच्या पंचशताब्दीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनी व मातृशक्तीच्या वतीने (कोकण प्रांत, मुंबई विभाग) 'मानवंदना संचलन' आयोजित करण्यात आले आहे. साध्वी ऋतंभरा यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे मुख्य कार्यक्रम संपन्न होईल. साधारण ६ हजार दुर्गांचे भव्य संचलन यावेळी राजा शिवाजी विद्यालयाच्या मैदानात होणार आहे. Sadhvi Ritambhara at Dadar
शिवशंभू विचार मंच कोकण प्रांत आयोजित "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित व्याख्यान आणि हेमाद्री अंक - १३ मोडी हस्तलिखिताचे प्रकाशन" शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमाद्री अंकच्या सह संपादिका अश्विनी सुर्वे यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले. यावेळी मंचावर शिव शंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप, इतिहास अभ्यासक व मोडी लिपी प्र
सद्वस्तू, परब्रह्म यासंबंधी विचार करताना, ते निर्गुण निराकार आहे. ब्रह्मदेवादी देवांचा आधार आहे, त्यांचा ऊर्जास्रोत आहे, असे स्वामींनी श्लोक क्रमांक १४८ मध्ये सांगितले आहे. सद्वस्तू एकमेव असल्याने, त्यासारखी दुसरी वस्तू दाखवता येत नाही. नित्याच्या व्यवहारात आपण साधारणपणे कोणतीही दृश्यवस्तू तिच्या आकारावरुन व गुणावरुन ओळखतो. तशी आपल्या मनाला सवय झालेली असते. तसे पाहिले तर आकाश, ऊर्जा, वीज, उष्णता यांनाही आकार नसतो. पण, त्यांना सद्वस्तूचा दर्जा देता येत नाही. कारण, वीज, उष्णता हे जरी निराकार असले, तरी निर्गुण
समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी- राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा आणि राज्य अशा दोन स्तरांवर होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांतून जिल्हास्तरीय विजेते निवडले जातील.
समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना 'ॲड फिज' या संस्थेतर्फे दिले जाणारे ‘ध्यास सन्मान’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" या सेवाभावी संस्थेला तर “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसते आहे. कारण येथील मुस्लिम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर नको, अहमदनगरच हवं, अशी मागणी केली आहे. Sharad Pawar Ahmednagar
"शिवछत्रपतींच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा मराठेशाहीतच नव्हे तर सबंध भारतवर्षात सर्वार्थाने कुणी चालवला असेल, तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांनीच " अशा शब्दांत इतिहास अभ्यासक व कार्यक्रमाचे प्रमुख रविराज पराडकर यांनी रविवारी १८ ऑगस्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे नाटयसंकुलातील ज्ञानविहार ग्रंथालय येथे पार पडलेल्या ‘इतिहास कट्टा’ कार्यक्रमाच्या 'गोष्ट ती ची' या पर्वात अहिल्यादेवींचा गौरव केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीतर्फे प्रबुद्ध मातृशक्ती परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व आदर्श समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जोधपूर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलो होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोधपूरच्या माजी महाराणी साहिबा हेमलता राजे होत्या. त्यांनी आपल्या उद्बोधनातून राणी अहिल्यादेवी यांचा संघर्ष आणि योगदान अधोरेखित केले.
मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील वंदना कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक म्हणण्यापासून रोखल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सक्षम दुबे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याची माहिती मिळत आहे. (Sanskrut Shlok News)
"प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहित सर्वोच्च मानून नागरी कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला संकल्पबद्ध समाज घडवायचा आहे आणि त्यासाठी काम वाढवायचे आहे.", असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. (Rashtra Sevika Samiti)
"देवी अहिल्याबाई (Devi Ahilyabai RSS) होळकर या मातृशक्तीच्या संभाव्य क्षमतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. मातृशक्तीच्या सक्षमीकरणाबद्दल आज आपण बोलत असतो. परंतु मातृशक्ती किती सशक्त आहे आणि काय काय करू शकते, याचे अनुकरण करण्याचा आदर्श आपल्या सर्वांसमोर अहिल्याबाईंनी ठेवला आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar Trishatabdi) यांचे ३०० वे जयंती वर्ष दि. ३१ मे पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी साजरी होणार आहे. यासाठी 'लोकमाता अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समारोह समिती' स्थापन करण्यात आली आहे. या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता अभय प्रशाल, इंदूर येथे होणार आहे. इंदूर महानगरपालिका या भव्य सोहळ्याचे सहआयोजक आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचे ३०० वे जयंती वर्ष सुरु होत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात त्रिशताब्दी साजरी होणार आहे. मुंबई विद्यापीठ लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ४.४५ वा. सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह, मुंबई विद्यापीठ, फोर्ट येथे स
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय ईश्वराच्या आज्ञेने आणि ईश्वराप्रति समर्पित होती. कोणत्याही प्रकारचा भेद, विषमता न बाळगता, त्यांनी निःस्वार्थी भावनेने राजकार्य आणि त्याचबरोबर समाजकार्यही उभे केले. या सगळ्याला धर्माचे अधिष्ठान होते. त्यांच्या नावाने आणि विचाराने समाजात काम करतो, असे म्हणणार्या अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यातील काही संघटनांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
अहिल्याबाई होळकर यांची केवळ उत्तम प्रशासक म्हणूनच नव्हे, तर एक मुरब्बी मुत्सद्दी आणि कुशल युद्धनीतीतज्ज्ञ म्हणूनही इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये नोंद आढळते. मल्हाररावांनी वेळोवेळी केलेले दिगादिग्दर्शन, युद्धाचे डावपेच, युद्धभूमीवरील कामगिरी, दारुगोळा आणि युद्धसाम्रगीचे व्यवस्थापन यांसारख्या बाबींतही अहिल्याबाई तरबेज होत्या. त्यांच्या याच मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीमुळे होळकरशाहीची विजयी घोडदौड झाली. त्याविषयी सविस्तर...
अहिल्यादेवी या सर्वगुणसंपन्न प्रशासक होत्या. राजकीय मुत्सद्देगिरीसह धर्माचे ज्ञान आणि समाजमनाची जाण, हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या 28 वर्षांच्या राज्यकारभारात अनेक प्रसंगांनी अहिल्यादेवींची परीक्षाही पाहिली. परंतु, ध्येयव्रती आणि मुत्सद्दी अहिल्यादेवींनी सर्व आव्हानांवर आपल्या चाणाक्ष बुद्धीने लीलया मात केली. अशा या कर्तव्यपरायण राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा समग्र परिचय करुन देणारा हा लेख...
कामंदक हे इसवी सनाच्या सातव्या शतकांत जन्मले, असे पुराण व इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. आर्य चाणक्यांच्या ग्रंथांत कालमानानुसार फेरबदल करून कामंदकांनी आपला ग्रंथ लिहिला. वरील श्लोकांत राज्याची सात अंगे निवेदिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य व छत्रपतींचे पश्चात पाव शतकभर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धांचे सूत्रधार रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेला (आज्ञापत्र) ग्रंथ हा कामंदकांचेच प्रतिबिंब आहे.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या औचित्यावर राज्य सरकारच्या वतीने आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
मुंबई : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७ हजार ८९७ ग्रामपंचायती मधील ५५ हजार ७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, या उक्तीनुसार अनंत दुःखांना सामोरे जात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लोकराज्ञीने, लोकमातेने लोकात्तर कार्य केले. बुधवार, दि. ३१ मे रोजी या धर्मनिष्ठ लोकमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती. त्यानिमित्ताने प्रखर जाज्वल्य हिंदूधर्मसंस्कृती निष्ठ कार्याचा इथे घेतलेला सारांश रूपातला मागोवा.
मुंबई : मुंबईतील महिलांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक नवा पर्याय आणण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर अर्थात सरकार आपल्या दारी या उपक्रमाला सरकारकडून सुरुवात करण्यात आली आहे. महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोबाईल व्हॅनचा उदघाटन सोहळा सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला.
रामावर, परमात्म्यावर विश्वास असणार्याच्या मनात खात्री असते की, राम माझा पाठीराखा आहे. तो शांत मनाने सकारात्मकतेने संकटाला सामोरे जातो व योग्य उपाययोजना करून त्यातून बाहेर पडतो. रामाच्या विश्वासाच्या आधारावर तो निर्भय जीवन जगतो. त्याला माहीत असते की, राम कैवल्यदाता आहे. मग सध्या संकटांची चिंता कशाला?
"मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा (रघुनाथ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावाचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्य
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.
भक्ताने संकटसमयी उगीच धावाधाव करण्यापेक्षा रामावर विश्वास ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवावेत. रामभक्ताचे संकट निवारण्यासाठी योग्यवेळी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने मदत करतो. हा या मागील भावार्थ आहे. अध्यात्मासाठी हा विचार उपयुक्त आहे. हे स्पष्ट करण्यासाठी स्वामींना कविकल्पनेतील चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा दृष्टांत घ्यावा लागला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त दि. ३१ मे रोजी जन्मस्थळी चौंडीत कार्यक्रम संपन्न झाला. आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात हा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादीतर्फे हा कार्यक्रम 'हायजॅक' करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडी येथे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चौंडीचे प्रशासन प्रस्थापितांच्या पवार घराण्याच्या दबावाखाली आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी देत नाही.
गेल्या जवळपास काही महिन्यांपासून ज्ञानवापीचे नाव चर्चेत आहे आणि नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे ते प्रामुख्याने पुढे आले. वाराणसीत असलेल्या मूळ काशिविश्वेश्वराची ही जागा, ती मुघल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली असे काहीसे हे प्रकरण. अर्थात, या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध फार जवळचा आहे, हे बर्याच मराठी लोकांना माहीत नसेल. म्हणूनच, एकंदरीतच ही ज्ञानवापीच्या वादाची गोष्ट काय आहे, ते थोडक्यात पाहू.
समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
रामाच्या अंगी असलेले गुण सर्वश्रेष्ठ असल्याने त्याची कीर्ती वर्णन करुन लोकांना राघवाचा पंथ दाखवावा. स्तुती करायची, तर राघवाची करावी, त्याच्या गुणांची करावी. इतर मानवी व्यक्तींची स्तुती करणे, त्यांची कीर्ती वर्णन करणे, हे योग्य होणार नाही, असे स्पष्ट उद्गार स्वामींनी काढले आहेत
स्वामींनी मनाच्या श्लोकांतून या विषयाचा उपोद्घात केला आहे. त्यातून समर्थकालीन महंताचे, शिष्यांचे, कार्यकर्त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे सुधारले गेले असेल, याची कल्पना करता येते. समर्थांचे स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने शिवरायांनाही त्यांच्याविषयी आदर होता, याला इतिहास साक्ष आहे. स्वामींनी हे सद्गुण सदाचार चारित्र आचरून दाखविले. स्वामी कधीही आत्मप्रचितीशिवाय बोलत नाही.
मनाच्या श्लोकांचा साकल्याने अभ्यास करताना लक्षात येते की, तिसर्या श्लोकांत सांगितलेला ’प्रभाते मनीं राम चिंतीत जावा’ हा विचार समर्थांना महत्त्वाचा वाटल्याने त्यांनी तो विचार श्लोक क्र. 67 ते 76 या दहा श्लोेकांत पुन्हा नव्याने मांडला आहे. अर्थात, त्या ठिकाणी हा विचार वेगळ्या संदर्भात येतो. या दहा श्लोकांतून राम कसे आहेत, याचे वर्णन समर्थ देत आहेत. श्रीराम हे पूर्णप्रतापी, पराक्रमी असे आहेत. सेवकांवर कुठलेही संकट आले, तरी ते त्यांचे त्या संकटांपासून रक्षण करतात. तथापि भावी काळात येणार्या संकटांना घाबरून आपण
पूर्वापार परंपरेला अनुसरून मनाच्या श्लोकातील पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे. निर्गुण परमात्म्याचे दृश्य स्वरुप, असा जो श्री गणेश आणि ‘वैखरी’, ‘मध्यमा’, ‘पश्यंती’, ‘परा’ या चारही वाणींच्या रुपात प्रगट होणारी शक्तिशाली शारदा यांना या श्लोकात वंदन केले आहे.
मनाच्या श्लोकांतही फलश्रुती सांगताना स्वामी श्रवण करणे म्हणजे ऐकणे, असा शब्दप्रयोग करतात. या ठिकाणीही श्रवण करणे म्हणजे अभ्यासपूर्ण श्रवण करणे, असा अर्थ घ्यावा लागतो आणि समर्थांना तोच अपेक्षित आहे. मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला, तर आपल्यात असलेले सर्व दोष नाहीसे होतात, असे स्वामींनी म्हटले आहे, दासबोधाच्या फलश्रुतीतही स्वामी ‘नाना दोष ते नासती’ असे म्हटले आहे. एकंदरीत पाहता मनाच्या श्लोकांची फलश्रुती आणि दासबोध ग्रंथाची फलश्रुती यात बरेच साम्य आढळते.