मणिपूरमधील ११ मोठी मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. मणिपूरमधील हिंसाचारात मंदिरांप्रमाणेच अनेकांची घरेदारे नष्ट करण्यात आली. जाळून टाकण्यात आली. हिंसाचाराची झळ पोहोचलेल्यांना विश्व हिंदू परिषदेकडून अन्नधान्य, आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. मणिपूरमधील शांतता बिघडविण्याचे प्रयत्न ज्या असामाजिक तत्वांकडून केले जात आहेत, त्यांचा कठोरपणे बिमोड करावा, अशी मागणीही विहिंपने केली आहे.
Read More
मणिपूरमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवा वादंग आणि गृहयुद्धजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून आता कुकी आमदार स्वतंत्र राज्य किंवा स्वतंत्र प्रशासकीय प्रदेशाची मागणी करू लागले आहेत. आता अशी आततायी मागणी मैतेई समाजाचे लोक मान्य करणे शक्यच नाही. यानिमित्ताने गेल्या रविवारच्या लेखात आपण मैतेई समाज आणि संस्कृतीची माहिती करुन घेतली होती. आजच्या लेखात कुकी समुदायाविषयी जाणून घेऊया.