जपान देशाच्या जपान मिंट (टांकसाळी) या प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित 'आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना 2023' स्पर्धेत 'कोकणातली अश्मयुगीन कातळशिल्प' या विषयावर आधारित नाणे डिझाईन सादर करणारे शिल्पकार मुकेश पुरो यांना 'फाईन मास्टर आर्टिस्ट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला 'फाईन आर्ट' म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुकेश पुरो यांनी कातळशिल्पांची छबी रत्नागिरीची अजून एक खास परिचित ओळख असलेल्या हापूस आंब्याच्या पार्श्र्वभूमीवर साकारली आहे.
Read More