Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
Read More
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मध्यप्रदेश सरकारने इंग्रजी भाषेच्या बेड्या तोडून वैद्यकीय शिक्षण हिंदी माध्यमातून ( Medical Course in Hindi) सुरु करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते दि. १६ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्यांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुधारीत मसुदा मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केला