दिल्लीतील रेखा गुप्ता सरकारने रमजानच्या काळात होणाऱ्या इफ्तार पार्टीच्या धर्तीवर फलाहार पार्टी आयोजित करण्याचे योजीले आहे. दिल्ली सरकार पुढील दोन आठवडे हिंदू नववर्ष साजरे करणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच ३० मार्च रोजी हिंदू नववर्षानिमित्त विधानभवन परिसरात संध्याकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासून त्याची सुरुवात होईल आणि १४ एप्रिल आंबेडकर जयंतीला त्याची सांगता होईल. दिल्लीतील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होतील. विशेष म्हणजे कला आणि संस्कृती मंत्रालयच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More