‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
Read More
राष्ट्रासाठी आपल्या प्राणांच्या अंतिम श्वासापर्यंत झटत राहणार्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक ओजस्वी आणि बाणेदार चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रांतिवीर बाबाराव सावरकर. त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाविषयी...
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील दै. ‘मुंबई तरुण भारत’चा ‘कालजयी सावरकर‘ हा विशेषांक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. यावर्षी सावरकर जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि ‘विवेक व्यासपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’वीरभूमी परिक्रमा’ हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ निर्माण करण्यात येणार आहे. तसेच, स्वा. सावरकरांचे जन्मस्थान भगूर, जि. नाशिक येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने याकरिता पुढाकार घेतला असून येत्या दि. २६ फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अ
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कालखंड, त्यांनी केलेले साहित्य क्षेत्रातील कार्य, सामाजिक कामे, त्यांचे जागतिक स्तरावरील स्थान, नाशिकमधील सहवास व कार्य या सर्व गोष्टींचा विचार केला तर यामधील कोणत्याही गोष्टीत सावरकरांची इतरांशी तुलनाच होऊ शकत नाही व त्यांचे श्रेष्ठत्व पुन्हा सिद्ध करण्याची आवश्यकतादेखील नाही, असे असतानाही व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही, साहित्य संमेलन नगरीला सावरकरांचे नाव देण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आलेले आहे.
नाशिक ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्यासंदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात संमेलन नगरीस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा स्तरावर जिल्हा सहकार्यवाह पदाचे दायित्व समर्थपणे सांभाळलेले, शिक्षण मंडळ भगूर या संस्थेचे संस्थापक सदस्य, रामदास मुरलीधर आंबेकर (७४) यांचे दि. १९ जानेवारी रोजी भगूर येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेता यावेत त्यांच्या कार्याची माहीती व्हावी, त्यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरचीही माहिती व्हावी या हेतूने सावरकर समूहाच्या वतीने भगूर दर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त वीर सावरकर यांच्याशी निगडीत वास्तूंच्या मदतीने माहिती दिली जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दिनांक २८ मे रोजी सर्वत्र साजरी केली जाते. याच दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नाशिक जवळील भगूर येथे जन्म झाला.