(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण
Read More
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होत असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी दूर होणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटक सरकार विरोधात महाराष्ट्र सरकारचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. बेळगाव कारवार निपाणीसह इतर ८६५ गावांना कर्नाटकात जाऊ न देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, सीमा प्रश्नी विधीमंडळात मांडण्यात आलेल्या ठरावात अनेक चुकीची मराठी शब्दरचना करण्यात आली आहे. व्याकरणाच्या अनेक चुका आहेत. मराठीची दुर्दशा करणारा ठराव मांडून सरकार सीमा भागातील बांधवांची थट्टा करत आहे का ? असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुरुस्ती करुन ठराव मंजूर करावा, अशी मागणी पवार यांनी आज विधीमंडळात केली.
बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केल्याच्या घटनेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे, वेळ पडल्यास प्रकरण केंद्राकडेही नेऊ शकतो, अशी भूमिका मांडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. "मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून नाराजी व्यक्त करून संबंधित प्रकरणांवर तत्काळ कारवाई केली जाईल. त्यांनीही आमचं सरकार कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.", अशी माहितीही त्यांनी दिली.
Sanjay Raut ; वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेले खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा कोठडीत रवानगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावले आहेत. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात भाषण केल्याप्रकरणी राऊतांना हे समन्स बजावण्यात आले आहे.
सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकातील सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या गावांना पाणीपुरवठा होत नसल्याने २०१२ साली ग्रामस्थांनी तसा ठराव केला होता. त्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय स्त्रियांचा ‘वीकपॉईंट’ म्हणजे साडी. प्रत्येकीला नटायला आवडतेच. आजच्या फॅशनच्या युगातही स्त्रियांची पहिली पसंती असते ती साडीलाच. साड्यांच्या पारंपरिकतेला एक वेगळा साज देऊन आजच्या स्त्रीला आवडेल, अशा गोष्टींचा मिलाफ साधून ‘अनीक सारीज्’ हा ब्र्रॅण्ड नावारुपाला आणणार्या अनुजा काकतकर यांच्याविषयी...
भाजपकडून निवडून आलेल्या 35 पैकी 16 मराठी भाषक नगरसेवक
आठ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने मारली बाजी ; शिवसेनेचा सुपडा साफ
संज्या, शिवसेना तोंडावर पडले, तुमची औकात काय आणि बोलता किती!
बेळगाव महापालिका विजयानंतर भाजपकडून शिवसेनेला थेट इशारा
महाराष्ट्रातील तमाम विद्वान राजकीय विश्लेषकांना या दोन जागांच्या पराभवाचा विचार करायला वेळ मिळाला नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही याचा आनंद इतका होता की विश्लेषकच काय; पण तथाकथित बिगर राजकीय ‘पुरस्कारवापसी’ गँगच्या सदस्यांनी मोदी-शाहांचे राजीनामेही मागितले.
कर्नाटकचा वादग्रस्त भाग केंद्रशासित करा : उद्धव ठाकरे
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करणे सध्या गरजेचे आहे. परंतु, ज्यांना मुळात मुद्दा हा केवळ जनतेच्या अस्मितांना कुरवाळून मते पदरात पाडण्यापर्यंत मर्यादित असतो, त्यांना त्याचे कसले सोयरसुतक? जनमताचा अनादर करून सत्तेची खुर्ची मिळविणार्या शिवसेनेला अस्मितांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘हीच ती वेळ आहे’ असे का वाटू नये? की, ज्यांनी ‘झोपेचे सोंग’ घेतले आहे, त्यांना जागे करण्याचा जनतेचा अट्टाहासच चुकीचा?
पंतप्रधानांसह मान्यवरांनी अर्पण केली श्रद्धांजली
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात.
जे छगन भुजबळ आज समतेचा नारा देत मनुस्मृती जाळण्याचा तमाशा मांडू इच्छितात, त्यांच्या मनातल्या जातीयवादाचे काय करायचे? आज बहुतेकांच्या विस्मरणात गेलेली वा जाणूनबुजून सांगितली न जाणारी एक घटना मुंबईत घडली होती, ज्यात छगन भुजबळांच्या मनातल्या जातीयवादाचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला आणि अनुसूचित जाती-जमातीतील समाजाला झाले होते.
कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारची अवस्था एवढी नाजूक झाली आहे की, कोणत्याही क्षणी हे सरकार अखेरचा श्वास घेईल अशा अवस्थेत आहे.
१२ मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. आता कर्नाटनकात विविध राजकीय पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे.