महिलांनी आता खुल्या पार्कमधील रेस्तराँमध्ये जाणेही गुन्हा. कारण काय तर म्हणे लोकांनी आणि मुख्य म्हणजे धार्मिक गुरूंनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, महिला या रेस्तराँमध्ये डोकं आणि चेहरा झाकलेला पोशाख घालत नाहीत. आपला चेहरा किंवा केस इतरांना दिसू नयेत, यासाठी विशेष लक्ष देत नाहीत. इतकेच नव्हे, तर पुरूषांना त्या दिसू शकतात तरीसुद्धा त्या तिथे बसतात, नाश्ता करतात किंवा जेवतात. भयंकर पाप आहे. या पापाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी मग अफगाणिस्तानातील हेरात प्रांतामध्ये महिलांना खुल्या रेस्तराँमध्ये प्रवेश करण्यास
Read More
आपल्या सत्ताकाळात रोजगाराची विविध पर्यायी क्षेत्रे निर्माण केली गेली नाहीत, याचे भान विरोधकांना नव्हते. त्यांनी बेरोजगारीचा सामना करण्यासाठी कधीच पाठपुरावा केला नव्हता. उलट सरकारी नोकर्यांमध्ये, भरत्यांमध्ये वशिलेबाजी, भ्रष्टाचाराचा पायंडा विरोधकांतील काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष वगैरेंनी पाडला होता. तो प्रकार पूर्णपणे बंद व्हावा, म्हणून मोदी सरकार प्रयत्नरत होते.
कोरोनाच्या तडाख्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मिती जवळपास ठप्पच झाली होती. उद्योगधंद्यांचे चक्र ठप्पच झाल्याने अनेक क्षेत्रात कामगार कपातीचे धोरण हातात घेतले गेले होते. फक्त भारतीय अर्थव्यवस्थाच नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत अशीच परिस्थिती होती. या कोरोनाच्या तडाख्याला दोन वर्षे उलटून गेल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. उत्पादन, निर्मिती, कृषी, सेवा या सगळ्याच मोठ्या क्षेत्रांत समाधानकारक प्रगती होत असताना आता रोजगार निर्मितीच्या पातळीवरही आनंदाची बातमी आली आहे
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वृद्धीसाठी ‘प्रांगण फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. डोळखांबसारख्या परिसरात मुलांना रेनकोट, दप्तर, चप्पल नसल्याने पावसाळ्यातील चार महिने शाळेला सुट्टी द्यावी लागत असे. पण, ‘प्रांगण फाऊंडेशन’च्या माध्यमातून साहित्य पुरविले जात असल्याने विद्यार्थी ‘स्कूल चले हम’ म्हणत शाळेत जाऊन शिकण्याचा आनंद लुटतात. त्याविषयी...
रम्य ही स्वर्गाहून लंका, म्हणवली जाणार्या श्रीलंकेची अवस्था अशीही होऊ शकते याबद्दल एव्हाना खंत वाटू लागली आहे. गेल्या १२ आठवड्यांपासून सरकारविरोधात निदर्शने अद्याप सुरू आहेत. महागाई, बेरोजगारी, इंधनटंचाई या सगळ्यात हा संपूर्ण देश होरपळून निघालेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशवासीयांसाठी भोंग्याच्या मुद्द्यावरुन पत्र लिहीले आहे. मशिदींवरील बेकायदा भोंग्याचा विषयाचा प्रश्न कायमचा मिटवण्याच्या दृष्टीने एकाचा काय तो या विषयाचा तुकडा पाडूनच टाकूयात, असे आवाहन त्यांनी राज्यातील मनसैनिकांना केले आहे. तसेच या पत्रात हा विषय सामाजिकच आहे, असा पुनरुच्चार राज यांनी केला आहे.
सध्या जातीय दंगलींनी गाजणार्या राजस्थानमध्ये प्रत्येक दुसरी पदवीधर व्यक्ती बेरोजगार असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आह.
बुधवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील एका निर्णयाच्या पोस्टरवर तुरुंगात अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचे नाव आणि छायाचित्र झळकले होते. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला.
कधी काळी ’सोन्याची लंका‘ म्हणविल्या जाणार्या या देशाच्या दारिद्य्र कहाण्या दररोज कानावर पडतात. परंतु, मायभूमीशी केलेली गद्दारी कशारितीने अंगलट येते, याचे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण श्रीलंकेच्या निमित्ताने जगापुढे आले
परळच्या ८० वर्षीय शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची सहकुटुंब भेट घेतली. शिवसेनेसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या या आजींनी मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्याकडे आपल्या नातवासाठी नोकरी आणि राहायला घर मागितले
कोरोना साथीच्या जबरदस्त धक्क्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आता हळू हळू पूर्वपदावर येते आहे असे चित्र निर्माण होते आहे
बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. अशातच मुंबई पोलिस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे
सरकारकडून वेळेवर न होणाऱ्या नोकर भरतीमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे अडचणीत सापडलेल्या तरुणांची व्यथा मांडणारे पत्र वाशिमच्या एका तरुणाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र गजानन राठोड या तरुणाने उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
कोरोनाच्या या महामारीत अर्थचक्र मंदावल्यामुळे विविध क्षेत्रांत नोकरदारांवर पगारकपात आणि बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. तेव्हा, या निमित्ताने पुन्हा एकदा रोजगारक्षम शिक्षणाची गरज आणि कौशल्य विकासातून स्वयंरोजगाराची निर्मिती याचा पुनर्विचार करावाच लागेल.
कोरोनासंकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता नव्याने आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. तेव्हा, विविध क्षेत्रातील या व्यावसायिक अडचणींबरोबर नेमक्या सरकारला काय काय उपाययोजना करता येतील, याचा ऊहोपोह करणारा हा लेख...
जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हा आज दारिद्य्र, कुपोषण, महागाई, बेरोजगारी यांच्यासह एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून जगासमोर उभा ठाकला आहे. पर्यावरण ही आपली सर्वांची संपत्ती आहे. त्यामुळे या संपत्तीचा आपल्याला हवा तसा वापर करणे, हे आपले कामच आहे. असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे पर्यावरण रक्षण आणि हवामान बदल यासाठी चिंता करणारे आणि काम करणारे नागरिक जगाच्या पाठीवर आज नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. Article on Greta Thunberg and real environment atavist
सध्या कलम ३७०रद्द केल्यापासून पाकिस्तान जगाच्या पटलावर मिळेल त्या ठिकाणी आणि अयोग्य ठिकाणी फक्त काश्मीर मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दस्तुरखुद्द पाकिस्तानच्या जनतेची काश्मीर मुद्दा चर्चिला जावा, ही मनीषाच नाहीये. त्यामुळे सरकारी अभिलाषा आणि जनतेची मनीषा यात आता द्वंद होण्याची शक्यता आहे.