"भक्तिभावाचे नाव आध्यात्म आहे आणि संवेदना, करुणा हे अध्यात्माचे मूळ आहे. नुकताच प्रयागराज येथे झालेला महाकुंभ हेही अध्यात्मभावाचेच प्रगटीकरण आहे. करुणा, प्रेम, समर्पण हे भाव कुंभामध्ये दिसले. कुंभ हा ऐक्याचे प्रतीक आहे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'तर्फे आयोजित 'पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार' प्रदान समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. Shri Guruji Puraskar 2025 Pune
Read More
पुणे भारत गायन समाज संस्थेतर्फे दिला जाणारा कै. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार यावर्षी रत्नागिरीतील गायिका सौ. श्वेता जोगळेकर यांना बहाल करण्यात आला आहे. रोख रक्कम आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ गायिका मधुवती दांडेकर यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रापंचिक जबाबदार्या सांभाळत असतानाच स्वत:ची कला जोपासत एकपात्री संगीत नाट्य जगलेल्या कलाकार सुनीता गुणे यांच्याविषयी...
“ ‘आत्मनिर्भर भारत’ ज्यांच्या नेतृत्वाखाली घडवायचे आहे, त्या नेतृत्वाचा हा सत्कार आहे. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधानांचे लक्ष्य आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी औद्योगिक उत्पादन दुप्पट केले पाहिजे. निर्यात वाढवावी लागेल. उद्यमशील कर्तृत्वे सर्वांसमोर आली पाहिजे. उद्यमशीलता वाढली पाहिजे. औद्योगिक राष्ट्रवाद महत्त्वाचा असून बाबा कल्याणी त्याचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संगीत नाटकाला ध्यास व श्वास मानून आपल्या अलौकिक स्वरांच्या जादूने गेली ६० वर्षे अव्याहतपणे रंगभूमीची सेवा करणार्या ज्येष्ठ रंगकर्मी, गायिका कीर्ती शिलेदार यांचे शनिवार, दि. २२ जानेवारी रोजी पुणे येथे निधन झाले. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक नाटकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख...
ब्रिटिशांनी जसं प्रदर्शनरुपात आपल्या नाटक आणि संगीताच्या प्रेक्षक-श्रोत्यांचा इतिहासच लोकांसमोर मांडला, तसं आपल्याला करता येईल का? याचा विचार करताना असं आढळतं की, अशा प्रकारची संग्राहक वृत्ती आपल्याकडे अभावानेच आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. या महत्त्वपूर्ण घटनेला तेव्हा व आज देण्यात येत असलेले राजकीय रंग बघता हा चित्रपट केवळ एक ‘कलाकृती’ नसून, यामागे वेगळ्या प्रकारचे ‘राजकारण’ आहे आणि त्याची चर्चा करणे गरजेचे आहे.
बालगंधर्वांच्या आयुष्यातील कित्येक प्रसंग वाचताना डोळे भरून आले. हे पुस्तक माझ्या आयुष्याचे मोठे संचित असेल असेही थोरात यांनी सांगितले.