राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
Read More
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांची बदली कोणत्या ठिकाणी केली याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा कणा मानल्या जाणार्या तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये आता पारदर्शकता येणार आहे. या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे.
सरकारी नोकरीमध्ये आपल्या मनमर्जीप्रमाणे वागणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने जोरदार झटका दिला आहे. बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या ११ अधिकाऱ्यांना महसूल विभागाने थेट निलंबित केले आहे. या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
वर्षानुवर्षे एकाच खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करा, अशी मागणी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे आयुक्त काय भूमिका घेतात, अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात की त्यांची उचलबांगडी करतात याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपा आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांची टीका
ही घ्या उत्तरे : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे आरोपांना प्रत्युत्तर
वन विभागाच्या 'अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम' (वन्यजीव) या रिक्त पदावर वनाधिकारी सुनील लिमये यांची बदली झाली आहे.
नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची चर्चा बुधवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांवर पसरली होती.
राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयातील नव्य शिक्षक बदली धोरणाला आता आता सर्वोच्च न्यायालयाने देखील आपला पाठींबा दिल्यामुळे लवकरच हे धोरण राज्यात लागू करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.