कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सात टक्क्यांच्या जादुई आकड्यापर्यंत निर्यातीतील वाढीशिवाय पोहोचू शकत नाही आणि गेल्या आठ वर्षांत प्रथमच २०२१ साली भारताच्या निर्यातीत प्रचंड तेजी आल्याचे दिसते.
Read More
आयकर विवरणासाठीची (आयटीआर रिटर्न) मुदत पुन्हा एकदा वाढवत केंद्र सरकारने करदात्यांना बुधवार, दि. ३० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने ‘आयटीआर रिटर्न’ भरण्याची मुदत दहा दिवस वाढवली आहे. आता करदात्यांना दि. १० जानेवारी, २०२१ पर्यंत ‘आयटीआर रिटर्न’ भरता येईल. दरवर्षी दि. ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे दोन वेळा मुदत वाढवण्यात आली.
देशभरात वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे गतवर्षी आजच्या दिवशी निधन झाले. भारतीय अर्थकारणातील एक आमुलाग्र बदल म्हणून या कायद्याकडे पाहिले जाते. १ जुलै २०१७ रोजीच्या मध्यरात्री संपूर्ण देशाने अकल्पित असा क्षण अनुभवला. देशभरातील विविध बाजारपेठा, उद्योगधंदे यांची गुंतागुंतीच्या करप्रणालीतून मुक्तता झाली. एक देश एक कररचनेमुळे मिळालेल्या नव्या संधी आणि फायदे पुन्हा देशासमोर ठेवणे ही जेटलीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
पंजाब नॅशनल बँकने १ जुलैपासून बँक बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. आता या बँकेत बचत खात्यावर जास्तीत जास्त ३.२५ टक्के व्याज मिळेल. ५० लाखापर्यंत बँलेन्सवर ३ टक्के तर ५० लाखांवरील बॅलेन्सवर ३.२५ टक्के व्याज देण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असल्याने जुलै महिन्यात होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी आयोजित करण्याचा निर्णय जागतिक ऑलिम्पिक समितीने घेतला.
१ जुलैपासून दैनंदिन व्यवहारांत अनेक बदल होणार आहेत. त्यातील काही बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.