उत्तराखंडच्या धामी सरकारने रमजान ईदच्या दिवशी औरंगजेबपुरचे नामांतर शिवाजी नगर करत धाडसी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तराखंडमधील ४ जिल्ह्यांतील १७ ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या ठिकाणांची यादी शेअर केली आहे. भारतीय संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन ही नावे बदलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. Aurangzebpur becomes Shivaji Nagar
Read More