स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक त्यांच्या बलिदानस्थळी मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे उभारण्यात येणार असून, सदर स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी केली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५ -२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
Read More
“महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी प्राणार्पण करणार्या छत्रपती संभाजी महाराजांना राज्यातील फडणवीस-शिंदे सरकारकडून मानवंदना देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित असलेल्या वढु बुद्रुक आणि तुळापूर या दोन ठिकाणांसाठी राज्य सरकारच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याचे अंतिम सादरीकरण मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत करण्यात आले असून या कामासाठी प्रस्तावित असलेला 397 कोटींचा